साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी (विजय चौधरी) वेचणी करून घरात साठविलेल्या कापसाला अचानक आग लागून साठविलेला पाच क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी माळेगाव-पिंप्री येथे घडली या आगीत शेतकऱ्यांचा पाच क्विंटल कापूस जळून खाक झाल्याने पन्नास हजार रु चे नुकसान झाले आहे.रात्री उशिरापर्यंत घटनेचा पंचनामा करण्यात आलेला नव्हता. माळेगाव-पिंप्री येथील अल्पभूधारक शेतकरी वीरेंद्र आनंदा अहिरे यांनी वेचणी करून ठेवलेला कापूस विना वापरातील घरात साठवून ठेवला होता या घराला अचानक आग लागल्याने आगीत पाच क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना शेतकरी पुन्हा नवीन कापूस वेचणी करण्यासाठी शेतात असताना घडली दरम्यान सायंकाळी नविन कापूस वेचणी करून आणल्यावर त्यांना ही घटना…
Author: Saimat
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी सातपुडा जंगलात तथा यावल तालुक्यातील पैझरीरीपाडा, काळा डोह भागात अनधिकृत वृक्षतोड करणारे आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर ऑगस्ट 2022 मध्ये हल्ला करण्यात आला होता.या प्रकरणातील 12 पैकी तीन चार आरोपींना अटक करण्यात आली होती तर बाकीचे फरार आरोपीना अद्याप अटक न झाल्याने तसेच कस्टडीत असलेले 3 आरोपी वन कर्मचारी यांच्या समक्ष आणि यावल पोलीस स्टेशन आवारातून गेल्या पंधरा दिवसांपूर्वी फरार झाले आहेत त्या आरोपींचा शोध यावल पोलीस आणि यावल वन कर्मचाऱ्यांना लागत नसल्याने या प्रकरणांबाबत तसेच फरार झालेल्या आरोपीच्या चौकशीबाबत यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. पोलीस अधीक्षक जळगाव यांनी यावल…
साईमत लाईव्ह एरंडोल प्रतिनिधी (समाधान वाघ) “क. ब. चौ. उमवी विद्यापीठ जळगावच्या समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी राबवले स्वच्छता अभियान कढोली ता. एरंडोल गावात ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर, बाजार पट्ट्यात तसेच गावातील मुख्य चौकात प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक बॉटल्स जमा करण्यात आल्या. व स्वच्छते विषयी गावात जनजागृती करण्यात आली. यावेळी गावातील ग्रामस्थ देखील या उपक्रमात सहभागी झाले. सदर कार्यक्रमाचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यानी केले होते. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश:- गावात ग्रामस्वच्छते विषयी जनजागृती व जाणीवजागृती निर्माण करणे हा होता. यावेळी कढोली गावातील ग्रामसेवक पंकज पाटील, ईश्वर कोळी, ज्योती कोळी, माझी उपसरपंच भूषण भोई.…
साईमत लाईव्ह प्रतिनिधी (प्रेरणा पाटील) : भारतीय तंत्रज्ञान संस्था,गांधीनगर (आयआयटीजीएन) व जपान जपान ऍडव्हान्सड इन्स्टिट्युट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अर्थात जेएआयएसटीच्या संशोधकांच्या चमूने एका नव्या वस्तूचा शोध लावला आहे . या संशोधनांमुळे लिथियम ची बॅटरी काही कालावधीतच चार्ज होऊ शकते असा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे . आयआयटीजीएन व जेएआयएसटीच्या चमूने अत्यंत कमी कालावधीत बॅटरी चार्ज करणारी व ती जास्त काळ टिकून ठेवणारी वस्तू विकसित करण्याच्या उद्देशाने हे संशोधन सुरू केले होते. या दरम्यान हि वस्तू तयार करण्यात त्यांना यश आले आहे. टायटॅनियम डायबोराईडद्वो (टीआय बी-2) प्राप्त झालेल्या न्यानोशिटचा वापर करत या संशोधकांनी नवी ‘तुडी’ म्हणजेच द्वि-आयामी वस्तू तय्यार केली…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. यापार्श्वभूमीवर पक्षाच्या बळकटीसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहे. आगामी निवडणुकीच्या (Election) दृष्टीने ठाकरे राज्यभर दौरे करणार आहेत. कालपासून (31 ऑक्टोबर) मातोश्रीवर मॅरेथॉन बैठकांना ठाकरेंनी सुरुवात केली आहे. यात आजी माजी खासदारांसह स्थानिक जिल्हाप्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान, या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 26 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे बुलढाण्यातील चिखलीत शेतकरी मेळावा घेणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे शिंदे सरकारला घेरणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा अधिवेशनाच्या आधी उद्धव ठाकरेंच्या या मेळाव्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबरपासून 14 नोव्हेंबरपर्यंत मातोश्री…
साईमत लाईव्ह उमाळे प्रतिनिधी समाधान वाघ उमाळे येथे नागरिकांसाठी रोटरी क्लब इलाईटच्या वतीने विविध आजारांवरील मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये नेत्ररोग, स्त्रीरोग, हाडांचे आजार, बालरोग, मधुमेह, दातांचे आजार, शल्य चिकित्सा अशा आजारांवर मोफत सल्ला व उपचार तसेच मोफत औषधीचे वाटप करण्यात आले. तसेच महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया व उपचार गोल्ड-सिटी हॉस्पिटल मध्ये उपचार केला जाईल असे आव्हान नागरिकांना करण्यात आले गावातील पिवळे, केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबाना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. याप्रसंगी सरपंच संगीता खडसे,…
साईमत लाईव्ह एरंडोल प्रतिनिधी (समाधान वाघ) कवयित्री बहिणाबाई चौधरी महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव सामाजिक शास्त्रे प्रशाळा, समाजकार्य विभागाचे द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वैजनाथ ता. एरंडोल येथे आदिवासी समाजातील लहान मुलांसोबत दिवाळी साजरी केली. व त्यांना दिवाळी निमित्ताने फराळ वाटप करण्यात आला, यावेळी त्या मुलांचा चेहेऱ्यावर आनंद बघायला मिळाला. ते पाहून सगळ्या विद्यार्थ्यांचा उपक्रम करण्या मागचा हेतू साध्य झाला. हा उपक्रम बघून अनेकांचा मनात समाजसेवे विषयी जागरूकता निर्माण झाली. ह्या उपक्रमाला गावातील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. समाजकार्य विभागाचे विद्यार्थी प्रविण देशमुख, निलेश्वरी पवार, अक्षय महाजन, गोरख माळी, प्रविण शिंदे, निलेश लोहार यांनी ह्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे…
साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र वैश्विक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या अनुषंगाने आज स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या वास्तुविशारद सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून सोमवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत भाविक, पुजारी, व्यापारी, शहरवासीय यांच्या समवेत मंदिर विकासाच्या मुद्यां संदर्भात श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालय, तुळजापूर येथे बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. सदरील बैठकीत भाविक, पुजारी, शहरवासीय व व्यापारी या सर्वांची मते व सूचना जाणून घेण्यात येणार आहेत. विकास कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी वास्तुविशारद सल्लागार संस्थेला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. चांदी सोन्याचा गाभारा…
साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील जळकोट ग्रामपंचायत कार्यालयास जालना येथील विधान परिषद आमदार राजेश राठोड यांनी भेट दिली प्रथमतः ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी जळकोट व परिसरातील तांडा वस्तीसाठी व आमदार निधीतून विकास निधी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आमदार राठोड यांनी निधी साठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीनिवास पाटील, ग्रामपंचायत सदस्य कल्यानी साखरे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शंकर वाडीकर,गोर सेनेचे तालुकाध्यक्ष राजु चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य कुमार राठोड, विठ्ठू कदम, प्रा.संतोष कदम, श्रीकांत कदम, डॉ.सौरभ कदम,पवन जाधव, किरण चव्हाण, सुनील चव्हाण, अभिषेक पवार, विश्वास…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी जि.प.प्रशाला शाळेची स्थापना इ.स.1916 साली झाली . 2005पासुन च्या ते 2022 पर्यंत म्हणजेच 17 वर्षातील शाळेचे माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते. प्रशालेतील माजी विद्यार्थी या मेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा आलेले सर्व माजी विद्यार्थी जुन्या आठवणीत हरवुन गेले होते ‘प्रत्येक जण आपली शाळा कशी आहे हे डोळ्या मध्ये साठवून घेत होता वर्ग मित्रमैत्रिणी भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री एल.एस.रोकडे सर होते तर प्रमुख अतिथी ई.ए.महाजन, के.के.फुसे, आर.जे.नाईक, जे.व्हि.जगताप, श्रीमती मंगला बोरसे मॅडम हे होते, या मेळाव्यात माजी विद्यार्थांनी आपल्या मनोगता मध्ये शाळेविषयी व शिक्षकांबद्दल ची भुमिका आपल्या मनोगतातुन व्यक्त…