आरेच्या तुम्ही ऐकलं का ? आता चार्ज होईल बॅटरी काही मिनिटातच…

0
1

साईमत लाईव्ह प्रतिनिधी (प्रेरणा पाटील) :

भारतीय तंत्रज्ञान संस्था,गांधीनगर (आयआयटीजीएन) व जपान जपान ऍडव्हान्सड इन्स्टिट्युट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अर्थात जेएआयएसटीच्या संशोधकांच्या चमूने एका नव्या वस्तूचा शोध लावला आहे .

या संशोधनांमुळे लिथियम ची बॅटरी काही कालावधीतच चार्ज होऊ शकते असा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे .
आयआयटीजीएन व जेएआयएसटीच्या चमूने अत्यंत कमी कालावधीत बॅटरी चार्ज करणारी व ती जास्त काळ टिकून ठेवणारी वस्तू विकसित करण्याच्या उद्देशाने हे संशोधन सुरू केले होते. या दरम्यान हि वस्तू तयार करण्यात त्यांना यश आले आहे.
टायटॅनियम डायबोराईडद्वो (टीआय बी-2) प्राप्त झालेल्या न्यानोशिटचा वापर करत या संशोधकांनी नवी ‘तुडी’ म्हणजेच द्वि-आयामी वस्तू तय्यार केली आहे .हि वस्तू सँडविच वर असणाऱ्या पापुद्र्या सारखी दिसते.

यात धातूंचे आण्विक बोरोन आहेत. सध्या ग्रेफाइट व लिथियम टायटेनवर आधारीत व व्यवसायिक दृष्ट्या सहज उपलब्ध होणाऱ्या लिथियम-आयन बॅटरी मध्ये ॲनोड सामग्रीचा वापर होतो. हि बॅटरी मोबाइल,लॅपटॉप,तसेच इलेक्ट्रिक वाहनानंमध्ये वापरली जाते..
ग्रेफाइट ॲनोडयुक्त लिथियम-आयन बॅटरी पासून एकदा चार्ज केलेले इलेक्ट्रॉनिक वाहने शेकडो किलोमीटर पर्यंत चालू शकते मात्र आग लागण्याची भीती असते व सुरक्षेच्या दृष्टीने ही बॅटरी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here