सोयगाव जि.प.प्रशाला शाळेतील आठवणींना उजाळा देत सोयगाव च्या जि.प.प्रशाला, सोयगाव शाळेच्या माजी विद्यार्थांचा स्नेह मेळावा उत्साहात

0
1

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

जि.प.प्रशाला शाळेची स्थापना इ.स.1916 साली झाली . 2005पासुन च्या ते 2022 पर्यंत म्हणजेच 17 वर्षातील शाळेचे माजी विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते. प्रशालेतील माजी विद्यार्थी या मेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा आलेले सर्व माजी विद्यार्थी जुन्या आठवणीत हरवुन गेले होते ‘प्रत्येक जण आपली शाळा कशी आहे हे डोळ्या मध्ये साठवून घेत होता वर्ग मित्रमैत्रिणी भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री एल.एस.रोकडे सर होते तर प्रमुख अतिथी ई.ए.महाजन, के.के‌.फुसे, आर.जे.नाईक, जे.व्हि‌‌.जगताप, श्रीमती मंगला बोरसे मॅडम हे होते, या मेळाव्यात माजी विद्यार्थांनी आपल्या मनोगता मध्ये शाळेविषयी व शिक्षकांबद्दल ची भुमिका आपल्या मनोगतातुन व्यक्त केल्या. या नंतर शिक्षकांनी विद्यार्थांमध्ये समवाय हा मैत्री तुन जागृत व्हावा मैत्री चे नाते हे श्री कृष्ण सुदामा सारखे असावे असे प्रतिपादन श्रीमती मंगला बोरसे मॅडम यांनी केले या स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थी अक्षय काळे, प्राजक्ता कुर्लेकर ,अंजली मापारी, अमोल मापारी, सुनिल दामधर ,महेबुब खाटीक, ज्ञानेश्वर एलीस,निलेश गाडेकर, शिवाजी अस्वार रुपाली चौधरी, किरण चौधरी, नयना विसपुते, राजु घनघाव, रोहण बिर्ला, उमेश वामने मंगेश चौधरी, शोभा नगरे ,अर्चना जैस्वार, जया कदम , अमोल आगे ,सरला साळवे ,भाऊसाहेब काळे, वैभव काळे, संध्या एलीस, नीता वाघ,आशा जोहरे, अतुल सोनवणे, राजु इंगळे, अमोल बागले, सुदाम वाघ,योगेश पाटील, विपिन काळे,लक्ष्मण बोडखे, बबन रोकडे, योगेश झिंजे, अमोल चौधरी, मोहन तेलंग्रे, भगवान जोहरे, आदी माजी विद्यार्थी उपस्थित या मेळाव्याचे सुत्रसंचालन सुमेेधा कुर्लेकर यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर एलीस यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here