Author: Saimat

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगावं परिसर ग्रुप चा असाही आदर्श कजगाव ता भडगाव सोशल मीडिया म्हणजे फक्त मेसेज देवाण घेवाण व एक मौज मजेचा विषय म्हणून पहिला जातो बऱ्याच वेळेस सोशल मिडीयावर विविध अफवेला उत आलेला दिसून येतो मात्र जर फेसबुक व्हाट्सप ट्विटर आदी सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर कोणाला तरी आधार मिळू शकतो असाच अनुभव कजगाव येथे आला आहे कजगाव येथील अविनाश नवगिरे यांच्या चार महिन्याच्या मुलाला जळगाव येथील एका खाजगी डॉक्टरकडे वैद्यकीय कारणास्तव दाखल करण्यात आले डॉक्टरांनी सांगितलेली फी अंगाला काटे येणारी होती खिशात दमडी शिल्लक नाही आता करायचे काय असा प्रश्न नवगिरे यांना पडला व त्यांनी…

Read More

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव येथील कजगाव पारोळा रस्त्यावरील रेल्वे पूलाचे काम हे निकृष्ट दर्जाच्या असल्याचे परिसरातील नागरिकांची तक्रार आहे महिन्याभरापूर्वी पुलाचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले यावेळी मोठा गाजावाजा करण्यात आला तसेच प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या मोठ्या जाहिराती देऊन कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले अनेक राजकीय मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली पण या कामाच्या दर्जा विषयी कोणीही बोलले नाही. यासंदर्भात माहिती अशी की कजगाव पारोळा रस्त्यावर रेल्वे रुळावरून फुलाचे बांधकाम लाखो रुपये शासनाचे खर्चून करण्यात आले बांधकाम विलंबाने का होईना पूर्ण झाले पण हे काम थातूरमातूर पद्धतीने व निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला जात आहे. उद्घाटन होऊन महिन्याभरातच या पुलावरूनरस्त्यावर मोठमोठे खड्डे…

Read More

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव तालुका भडगाव येथे राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ व गटनेते संजय नाना वाघ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन करतो की कृषिमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी आमच्या नेत्या तसेच लोकसभा खासदार संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे बद्दल गालीच्छ वक्तव्य केले आहे , हा प्रकार प्रोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे हनन करते , या वक्तव्याबद्दल मंत्री अब्दुल सत्तार राज्याचे कॅबिनेट मंत्राने एका महिले बद्दल केलेले विधान अतिशय निषेधार्ह , करणाऱ्याला मंत्र्याला तात्काळ मंत्री पदावरून निलंबित करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भडगाव तालुक्यातर्फे करण्यात आली , व यामंत्राच्या आम्ही जाहीर निषेध करतो अशी प्रतिक्रिया भडगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी तर्फे करण्यात…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रातील शिक्षण विभाग वगळता इतर सर्व विभागात अधिकारी,कर्मचारी यांच्या प्रशासकीय कामकाजामुळे तसेच काही एक दोन अधिकारी गेल्या पाच-सात वर्षापासून यावल पंचायत समितीत विविध पद सांभाळून एकाच ठिकाणी ठाण मांडून सोयीनुसार गैरप्रकार, भ्रष्टाचार,निकृष्ट प्रतीची कामे केल्याने पंचायत समितीच्या मासिक सभेत अनेक वेळा लेखी तोंडी तक्रारी केलेल्या असताना सुद्धा तक्रारीची दखल न घेतल्याचे आरोप यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. काल गुरुवार दि.10 नोव्हेंबर 2022 रोजी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि यावल पंचायत समिती कार्यालयाचा भोंगळ कारभार जनतेसमोर आणण्याच्या दृष्टिकोनातून यावल पंचायत समिती सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करून गेल्या पाच…

Read More

साईमत लाईव्ह कुहाड प्रतिनिधी   जळगाव येथील लोणी कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १० वी, १२ वी व पदवीधर, पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. आमदार राजूमामा भोळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी उपमहापौर तथा नगरसेवक सुनील खडके, नगरसेवक डॉ. विरेंद्र खडके, सामाजिक कार्यकर्ते भरत कोळी, जीवन विकास केंद्राचे डॉ. विकास निकम, शिक्षक संजय सावळे, नगरसेवक अमित काळे, सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे, शंकर पाटील, महिला बाल कल्याण समिती सभापती मलकापूर छाया पाटील, बी. टी. पाटील,कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने करण्यात आली. त्या वेळी उत्कृष्ठ फोटोग्राफीबद्दल शिंदाड येथील छायाचित्रकार संदीप बोरसे…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जरंडी येथे राष्ट्रीय स्वयंवसेवक संघ व श्री बाळासाहेब संस्थानच्या मार्फत रविवार दि.६ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी दत्ताजी भाले रक्तपेढी यांच्यावतीने रक्त संकलन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगेश चौधरी,बालाजी संस्थानचे सुधीरनाना कुलकर्णी, सचिन चौधरी,रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील,दिलीप पाटील सुशांत पाटील, लोकेश पाटील, यांच्या इतर जणांनी परिश्रम घेतले यावेळी जरंडी ग्रामपंचायत सरपंच वंदनाताई पाटील,उपसरपंच संजय पाटील, सदस्य मधुकर पाटील ,प्रकाश पवार,बबन चौधरी,दत्ताची भाले रक्तपेढीचे प्रशांत चिटणीस,सौ रेवतीताई, हूमरे ताई आदींनी सहकार्य केले.

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल  वडिलोपार्जित शेतजमीन नावावर करण्यासाठी म्हणजे वारस लावण्यासाठी महसूल मधील एका कर्मचाऱ्यांने आपल्या ओळखीच्या मध्यस्थी दलाला मार्फत अर्जदाराकडून ‘फोन पे’ च्या माध्यमातून वेळोवेळी 55 हजार रुपये घेऊन वारस नोंद न करता पुन्हा 2 लाख 47 हजार रुपयाची मागणी केल्याची तक्रार यावल तालुक्यात फैजपुर पोलीस स्टेशनला देण्यात आली.प्रकरण गंभीर असले तरी फैजपूर पोलिसांनी मात्र गुन्हा नोंद करणे संदर्भात नकार दिल्याचे तक्रारदारास सांगितले. याबाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवार दि.4 नोव्हेंबर 2022 रोजी फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात दिगंबर रामदास भोगे वय 50 धंदा शेती रा. निंभोरा ता.रावेर यांनी जमिनी नावावर करण्यासाठी फसवणूक…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हयात PWD विभागासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत आज ; शासकीय कंत्राटदार संघटनेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत निवेदन दिले. याबाबत योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन ना. पाटील यांनी दिले. शासकीय कंत्राटदार संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात सा.बां. विभाग अंतर्गत रस्ते मजबुतीकरण व दुरुस्ती करणे, पुल क्रार्कीट रस्ते, शासकीय इमारती बांधकाम व इतर कामे केली जातात. सा.बां. विभागामध्ये वरील नमुद कामांचे शासकीय कंत्राटदारांना मार्फत केलेल्या कामांचे देयके मोठया प्रमाणात प्रलंबित आहेत. शासनाकडुन पुरेसा निधी न मिळाल्यामुळे, कंत्राटदारांचे शेकडो कोटी रुपयाचे देयके थकीत आहे. दिवाळी २०२२ पुर्वी प्रलंबीत देयके अदा करण्यासाठी पुरेसा…

Read More

साईमत लाईव्ह औरंगाबाद प्रतिनिधी रुग्णांना विविध आजारावरील उपचाराच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज आरोग्य यंत्रणेला दिल्या. या शहरात विविध प्रकराच्या कर्करोगावर उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रूग्ण येत आसतात, त्या रुग्णांना आरोग्यच्या सर्व सुविधा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून द्यावे असे सांगितले. भेटीदरम्यान कर्करोग रुग्णालय परिसरातील वसतिगृह, आणि नेत्र रुग्णालयाच्या विविध कक्षास भेट देऊन रुग्णांस मिळणाऱ्या सुविधांविषयी मुंढे यांनी विचारपूस केली. जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, आरोग्य उपसंचालक डॉ.सुनिता गोल्हाइत, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, कर्करोग रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अरंविद गायकवाड, तसेच नेत्र रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शहरातील प्रभाग क्र. 13 मधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. प्रभाग क्र.3 मध्ये असणारे लीलावती अपार्टमेंट चौक ते गाडगेबाबा चौक , हिरकणी डेअरी ते संभाजी चौक , प्रसाद अपार्टमेंट ते सेंट टेरेसा स्कूल शिरसोली रोड ला कनेक्ट पर्यंत , नेहरू नगर चौक ते चंद्रलोक अपार्टमेंट , आनंद नगर स्टॉप ते स्टेट बँक कडे आणि मोहाडी फाटा ते रायसोनी नगर पर्यंत या मुख्य रस्त्याची झालेल्या दयनीय अवस्थे संदर्भात परिसरातील नागरिकांनी महानगपालिकेला निवेदन दिले. या खराब रस्त्यांमुळे आणि धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय . तसेच आरोग्याच्या अनेक समस्या देखील उद्भवत आहे. वारंवार या रस्त्यावर छोटे मोठे अपघातही घडत…

Read More