साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
सातपुडा जंगलात तथा यावल तालुक्यातील पैझरीरीपाडा, काळा डोह भागात अनधिकृत वृक्षतोड करणारे आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर ऑगस्ट 2022 मध्ये हल्ला करण्यात आला होता.या प्रकरणातील 12 पैकी तीन चार आरोपींना अटक करण्यात आली होती तर बाकीचे फरार आरोपीना अद्याप अटक न झाल्याने तसेच कस्टडीत असलेले 3 आरोपी वन कर्मचारी यांच्या समक्ष आणि यावल पोलीस स्टेशन आवारातून गेल्या पंधरा दिवसांपूर्वी फरार झाले आहेत त्या आरोपींचा शोध यावल पोलीस आणि यावल वन कर्मचाऱ्यांना लागत नसल्याने या प्रकरणांबाबत तसेच फरार झालेल्या आरोपीच्या चौकशीबाबत यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
पोलीस अधीक्षक जळगाव यांनी यावल पोलिसांसह वन क्षेत्रपाल यावल,यावल वन विभाग सहाय्यक उपवनसंरक्षक,धुळे वनवृत्त विभाग वनसंरक्षक,प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांचे स्वतंत्रपणे जाब जबाब घेऊन चौकशी केल्यास आरोपी फरार कसे व का फरार झाले ? तसेच गुन्ह्यातील आरोपींचा शोध लावून अटक का केली जात नाही?तसेच या प्रकरणात आतापर्यंत 10 ते 25 पेट्यांची काळी जादू झाली आहे किंवा कसे? याबाबतचे गुड रहस्य जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही, आणि हे चौकशीचे आव्हान नुकतेच हजर झालेले पोलिस अधीक्षक जळगाव यांना आहे असे संपूर्ण यावल तालुक्यात चर्चिले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दि.17 ऑगस्ट 2022 रोजी सातपुड्यात वृक्षतोड करत शेतीसाठी जागा ताब्यात घेण्याचा सपाटा असे वृत्त सर्वात प्रथम दैनिक साईमत मध्ये प्रसिद्ध होताच यावल तालुक्यात पैझरीपाडा,काळाडोह भागात बेकायदा,अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्या संशयित आरोपींच्या अटकेसाठी यावल वन कर्मचारी गेले असता वन कर्मचाऱ्यांवर संबंधित आरोपींनी प्राणघाटक अल्ला केला होता आणि आहे याबाबत यावल पोलीस स्टेशनला 17 ऑगस्ट 2022 रोजी 12 संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात फक्त चार आरोपींना अटक करण्यात यंत्रणेला यश आले होते इतर सात ते आठ आरोपी गेल्या दीड ते दोन महिन्याचा कालावधी उलटल्यावर सुद्धा अटक झालेले नाहीत. आरोपींचा शोध आणि अटक होत नसल्याने चौकशी अधिकाऱ्यांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
त्यानंतर दि.12 ऑक्टोंबर 2022 रोजी न्यायालयीन कामकाजासाठी कस्टडीत असलेले आरोपी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी यावल ग्रामीण रुग्णालयात आणून वैद्यकीय तपासणी करून यावल पोलीस कस्टडीत ठेवण्यासाठी पोलीस स्टेशन आवारात आणले असता पोलीस स्टेशन आवारातून ते तीन संशयित आरोपी पोलीस आणि वन कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी ठेवून फरार झाल्याने फार मोठी खळबळ उडाली होती आणि आहे.
याबाबत यावल वन अधिकाऱ्यांच्या ताब्यातील तीन आरोपी फरार, वन विभागात प्रचंड खळबळ संबंधितांवरील कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष असे वृत्त सर्वात आधी दैनिक साईमत मध्ये प्रसिद्ध झाले होते आणि आहे.असा घटनाक्रम असला तरी या गुन्ह्यात अटक न झालेले आरोपी,आणि 3 आरोपी हे जर यावल पोलीस स्टेशन आवारातून यावल पोलीस व यावल वन विभाग कर्मचाऱ्यांच्या समक्ष फरार झाल्याने याला जबाबदार कोण आहे याची सर्वात प्रथम सविस्तर चौकशी आणि स्वतंत्रपणे संबंधित सर्वांचे जाबजबाब पोलीस अधीक्षक जळगाव,गुन्हे अन्वेषण विभाग जळगाव,फैजपूर भाग डीवायएसपी यांनी घेतल्यास या प्रकरणात दहा ते पंचवीस पेट्यांची काळी जादू झाल्याने आरोपी अटक होत नसल्याचे आणि आरोपी फरार झाल्याचे नेमके कारण जनतेसमोर उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.