साईमत लाईव्ह उमाळे प्रतिनिधी समाधान वाघ
उमाळे येथे नागरिकांसाठी रोटरी क्लब इलाईटच्या वतीने विविध आजारांवरील मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला
या शिबिरामध्ये नेत्ररोग, स्त्रीरोग, हाडांचे आजार, बालरोग, मधुमेह, दातांचे आजार, शल्य चिकित्सा अशा आजारांवर मोफत सल्ला व उपचार तसेच मोफत औषधीचे वाटप करण्यात आले. तसेच महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया व उपचार गोल्ड-सिटी हॉस्पिटल मध्ये उपचार केला जाईल असे आव्हान नागरिकांना करण्यात आले गावातील पिवळे, केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबाना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे.
याप्रसंगी सरपंच संगीता खडसे, उपसरपंच मीरा पाटील, सदस्य राजू पाटील, संदीप बिऱ्हाडे, योगेश सोनवणे, सुरेश धनगर, माजी उपसरपंच प्रवीण बिऱ्हाडे, मनोहर पाटील, रघुनाथ चव्हाण, यांच्या हस्ते प्रमुख अतिथी मान्यवर डॉक्टर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी डाॅ.पंकज शहा ,डाॅ.परीक्षित बाविस्कर , डाॅ. शीतल भोसले,डाॅ.योगिता पाटील ,डाॅ. अमोल सेठ,डाॅ.वृषाली सरोदे , डाॅ. वैजयंती पाध्ये,डाॅ.विशाल जैन,डाॅ. मनीष चौधरी,डाॅ.शौनक पाटील ,डाॅ. गोविंद मंत्री ,डाॅ.अंतिम सोमाणी, डाॅ. श्रेणीक भंसाली प्रकल्प प्रमुख सचिनजी लढ्ढा ,नेतृत्व मार्गदर्शक राजीवजी बियाणी , नितीन इंगळे, अजित महाजन, संदीप असोदेकर आदी उपस्थित होते..