साईमत लाईव्ह मलकापुर प्रतिनिधी पोलीस स्टेशन बोराखेडी ता . मोताळा येथील स.पो.नि. विकास पाटील यांनी काही दिवसापुर्वी स.पो. नि . सुखदेव भोरकडे मलकापुर शहर यांना फोनव्दारे कळविले होते की , बोराखेडी पो.स्टेशनला दाखल गुन्हा.क्रं .२६७/२०२२ कलम ४६१,३८०,३४ भा.दं.वि. प्रमाणे कृषि दुकानाचे शटर तोडून ऐन पेरणीचे वेळी सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा कृषि मुद्देमाल चोरुन नेल्याच्या गुन्हयातील एक आरोपी आरीफ खान कौसर खान (वय २५ वर्ष )हा मलकापुर शहर हद्दीतील राहणारा असुन तो गुन्हा घडल्यानंतर काही दिवस गाव सोडुन पळुन गेला होता; मात्र मागील काही दिवसांपासून तो मलकापुर शहरात ये जा करीत होता. त्यामुळे तो मिळुन आल्यास त्याला पकडुन…
Author: Saimat
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील मौजे कंकराळा येथे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार अब्दुल सत्तार साहेब यांचा औरंगाबाद जिल्हा नुकसान पाहणी दौरा दरम्यान कृषी मंत्री यांनी माहे सप्टेंबर ते ऑक्टोबर यामहिन्यात सतत पावसामुळे शेत पिकांचे ३३% टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे वस्तुस्थिती पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले, असून याबाबत स्वतः कृषी मंत्री शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांन सोबत संवाद केला व नुकसान झालेल्या बांधित पिकांची पाहणी केली. त्यावेळी कृषी मंत्री यांनी सांगितले की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र सरकार आपल्या सोबत आहे एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही असे आश्वासन दिले, त्यावेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी संदीप पाटील,…
साईमत लाईव्ह पुणे प्रतिनिधी (करण शिंदे) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २१ नोव्हेंबर २०२१ घेतलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा (महाटीईटी)अंतरिम निकाल काल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना हा पेपर पहिला (इयत्ता १ली ते ५ वी गट) व पेपर दुसरा (इयत्ता ६वी ते ८वी गट) परिक्षेचा निकाल काल सायंकाळी ५ वाजेपासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या हींींिी://ारहरींशीं.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ज्या उमेदवारांना गुणपडताळणी करायची असेल त्यांनी आपल्या लॉगइनमधून ५ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करणे बंधनकारक आहे. अन्य पध्दतीने विनंती किंवा नोंदणी मान्य केली जाणार नाही. ज्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत त्यांनी ५ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत ऑनलाईन…
साईमत लाईव्ह धानोरा ता. चोपडा : वार्ताहर महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र अशा गड किल्ल्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी अनेक संघटना कार्यरत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील दुर्ग या प्रकारातील गड किल्यांपैकी एक असलेल्या चोपडा तालुक्यातील चौगाव येथील सुमारे सत्तावीस एकर मध्ये विस्तारलेला व साडे सहाशे मीटर उंच अशा विजयगडावर दर वर्षाप्रमाणे यावर्षीही 16 रविवारी सकाळी दहा वाजता गड पुजनाचा कार्यक्रम राजा शिवछत्रपती परीवाराचे विभागीय अध्यक्ष डॉ.संतोष पाटील,ऐतिहासिक वारसा संवर्धन कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.पंकज शिंदे ,खान्देश एक्सप्लोर टिमचे सदस्य प्रा.संजय बारी ,पिपल्स बँकेचे अडावद शाखेचे शाखा प्रमुख गुजराथी ,शिवशंभू प्रतिष्ठाने जिल्हाध्यक्ष विश्राम तेले,अक्षय महा ई…
साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी जामीनावर सुटलेले आरोपी यांनी नियम व शर्तीचा भंग केल्याने ते गावातून मलकापूरकडे येत असल्याची माहिती मिळाल्यावरून गावातील नागरिकांनी वडजी ते मलकापूर ही बस थांबवून त्या आरोपींना मलकापूर शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिल्याची घटना घडली. तर हद्दीतील आरोपींना ग्रामीण पोलिसांच्या हवाली करण्यात आले तर बस थांबविल्याच्या कारणावरून चालक यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मोताळा तालुक्यातील मौजे निपाणा येथील एका प्रकरणामध्ये मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये आरोपींपैकी तीन महिला व दोन पुरुष बळीराम तांदुळकर, विनोद सिताराम तांदुळकर हे न्यायालयाच्या जामीनावर नियम, शर्ती, अधीन राहून बाहेर आलेले होते. त्यांना…
साईमत लाईव्ह फैजपूर प्रतिनीधी येथून जवळच असलेल्या आमोदा येथील रहिवाशी पूजा पाटील, अरुणा तायडे, धीरज चौधरी असे तीन जीवांचे गेल्या पंधरा दिवसात अकस्मात निधन झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर आमोदा गावावर शोककळा पसरली आहे. पूजा निलेश पाटील या किडनीच्या आजाराने चार महिने झाले आजारी होत्या. पती निलेश पाटील हा नाशिक येथील कंपनीमध्ये नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तर निलेश चे वडील सुरेश पाटील हे शेतकरी व्यवसाय करतात घरी जेमतेम शेती असल्याने व दोन मुले असल्याने त्यांनी निलेश यास उदरनिर्वाहासाठी नाशिक येथे नोकरीस पाठवले. त्याचे लग्न लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील पूजाशी लावण्यात आले. पूजाचे आई-वडील हे आधीच मृत्यू पावलेले असून तिला…
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणाऱ्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते. या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रक्षेपित होत असते. त्यामुळे जिवाला श्री लक्ष्मीदेवी आणि नारायण यांची कृपा संपादन करता येते. ती कृपा जिवाच्या भावावर टिकून राहाते. आताच्या काळात साधकांना शक्तीची आवश्यकता आहे, तसेच व्यावहारिक सुखापेक्षा जगणे आणि आयुष्य टिकवणे महत्वाचे आहे. त्यामुळे साधना करणार्या जिवासाठी हा…
साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी तालुक्यातील रणगाव-भालेगाव येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन तरुणांमधील किरकोळ कारणाचा शाब्दीक वाद विकोपाला गेल्याने एका २८ वर्षीय तरुणाने ३५ वर्षीय तरुणाचा लोखंडी सुरा भोसकत जीवे ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मलकापूर तालुक्यातील रणगाव-भालेगाव येथे रात्री ८ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे ग्रामस्थ भोजन आटोपून चौकात गप्पा मारत असतांना प्रदिप पद्माकर वानखेडे (वय ३५) व अशांत उर्फ कडू अशोक वानखेडे (वय २८) या दोन तरुणांमध्ये कसल्यातरी किरकोळ कारणावरुन शाब्दीक वाद सुरु झाला. हा शाब्दीक वाद शब्दाशब्दाने पुढे जात…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अस्तितकुमार पांडेय यांनी तहसीलदार रमेश जसवंत यांना गुरुवारी दिले. सोयगाव तालुक्यातील सोयगाव, जरंडी, बनोटी आणि सावळदबारा या चारही मंडळात सलग चार दिवस अतिवृष्टी झाली या पावसाने कपाशी,मका, सोयाबीन ज्वारी बाजरी आदी पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे, परंतु पंचनामा करण्याबाबत प्रशासनाची उदासीनता दिसून येत होती गुरुवारी जिल्हाधिकारी अस्तितकुमार पांडेय यांनी याबाबत आदेश दिल्यानंतर तहसीलदार रमेश यशवंत यांनी सायंकाळी सहा वाजता आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली यामध्ये महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना पारदर्शक पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या तालुक्यातील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचा…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी (भूषण पाटील) महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात तपास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागत होती. पण आता शिंदे- फडणवीस सरकार ने हा नियमांमध्ये बद्दल केले. महाविकास आघाडी सरकार असताना केंद्रातील सरकार तपास यंत्रनेचा गैरवापर करत आहे असे आरोप होते. त्यानंतर २१ आॅक्टोबर २०२१ रोजी महाविकास आघाडी सरकार ने सीबीआयबाबत मोठा निर्णय घेतला होता. त्या साठी सरकार ला राज्य सरकार ची परवानगी घ्यावी लागत होती. एकनाथ शिंदेनी बंड केल्यामुळे मात्र काही दिवसांपुर्वी महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यात शिंदे गटाने भाजपा सोबत सरकार स्थापन केले. शिंदे सरकार महाविकास आघाडी ने घेतलेले सर्व निर्णय धुळकावत लावत आहे. त्यात…