जालनाचे आमदार राजेश राठोड यांनी जळकोट ग्रामपंचायतला दिली भेट

0
2

साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील जळकोट ग्रामपंचायत कार्यालयास जालना येथील विधान परिषद आमदार राजेश राठोड यांनी भेट दिली प्रथमतः ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी जळकोट व परिसरातील तांडा वस्तीसाठी व आमदार निधीतून विकास निधी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आमदार राठोड यांनी निधी साठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीनिवास पाटील, ग्रामपंचायत सदस्य कल्यानी साखरे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शंकर वाडीकर,गोर सेनेचे तालुकाध्यक्ष राजु चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य कुमार राठोड, विठ्ठू कदम, प्रा.संतोष कदम, श्रीकांत कदम, डॉ.सौरभ कदम,पवन जाधव, किरण चव्हाण, सुनील चव्हाण, अभिषेक पवार, विश्वास भोगे, प्रविण पाटील आदिजण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here