साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत कथित भेदभाव होत असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून, जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देत प्रशासनाला जाब विचारण्यात आला आहे. खोटे नगर ते कालिका माता मंदिर या प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, विशेषतः परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून रस्त्यावर विविध साहित्य विक्री सुरू असतानाही अतिक्रमण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. स्थानिकांवर कारवाई, परप्रांतीयांना मोकळीक? याउलट, स्थानिक मराठी तरुण उपजीविकेसाठी छोटे व्यवसाय करत असताना त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई होत असल्याने शहरात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. “अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत दुहेरी निकष लावले जात आहेत का?” असा थेट सवाल…
Author: Saimat
साईमत धरणगाव प्रतिनिधी विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या शाळेत एका नराधम शिक्षकाने गुरु-शिष्य नात्याला काळिमा फासल्याची संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करणाऱ्या राहुल जगन्नाथ अहिरे या शिक्षकाला धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी या नराधमाला चांगलाच चोप दिला असून, सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी शिक्षक राहुल अहिरे याने पीडित मुलगी शाळेत असताना तिच्यावर अत्याचार केला होता. धक्कादायक बाब म्हणजे, पीडिता शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयात गेल्यानंतरही या शिक्षकाचा छळ थांबला नाही. तो पीडितेचे…
साईमत वृत्तसेवा अमेरिका आणि इराण यांच्यात तब्बल ४० दिवस चाललेल्या भीषण युद्धानंतर अखेर तात्पुरता युद्धविराम लागू झाला असला, तरी या संघर्षाने जगभरात मोठा विध्वंस घडवून आणला आहे. हजारो नागरिकांचा बळी, अब्जावधी डॉलर्सचे नुकसान आणि कोट्यवधी लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या युद्धात नेमके कोणाचे किती नुकसान झाले, याचा आढावा घेतल्यास परिस्थितीची भीषणता स्पष्ट होते. अमेरिका आणि इस्त्रायल यांनी संयुक्तपणे इराणच्या लष्करी ताकदीला मोठा धक्का दिला. इराणची नौसेना जवळपास पूर्णतः निष्प्रभ झाली, क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमता कमकुवत झाली, तर एअर डिफेन्स प्रणाली आणि अणु कार्यक्रम अनेक वर्षे मागे ढकलले गेले. अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त झाले आणि वरिष्ठ नेतृत्वालाही मोठा फटका बसला.…
साईमत वृत्तसेवा जागतिक राजकारणाच्या अंगणात आणखी एक भयंकर घडामोड उभा राहिला आहे. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्यूबा देशावर थेट हल्ला करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा जगभरात प्रचंड खळबळ निर्माण करत आहे. अमेरिका-इराण युद्धाचे दृश्य अजूनही थंड झालेले नाही. दोन्ही बाजूंना मोठे नुकसान झाले असून, अमेरिकेकडून या संघर्षावर प्रचंड आर्थिक व लष्करी खर्च होत आहे. इराणकडून कोणतीही मागे हटण्याची चिन्हे दिसत नसल्याने अमेरिकेवरील आंतरराष्ट्रीय दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. ट्रम्प यांच्या हल्ल्याच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात तणाव वाढला आहे. ही वेळ फक्त युद्धविरामाच्या प्रयत्नांनी तणाव कमी होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका-इराण संघर्ष…
साईमत जळगाव प्रतिनिधी शिवसेना खासदार आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जळगाव दौऱ्यात विविध राजकीय, सामाजिक आणि पक्षीय मुद्यांवर आपली मते मांडली. पक्षाची बांधणी, आगामी निवडणूक आणि शेतकऱ्यांचे हित यावर लक्ष केंद्रीत करत राऊतने सरकार आणि विरोधकांवर थेट टीका केली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे हाल:राऊत म्हणाले, “अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकार आणि पालकमंत्र्यांनी तातडीने संवेदना व्यक्त करायला हव्यात; मात्र, असे दिसत नाही. शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, परंतु पावले उचलली जात नाहीत.” गिरीश महाजन ‘संकट मोचक’?माजी मंत्री गिरीश महाजनांवर टीका करत राऊत म्हणाले, “चोवीस तास राजकारण करणारे, संकट मोचक गिरीश महाजन कुठे आहेत? ते फक्त आमदार पळविण्याच…
साईमत जळगाव प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेतर्फे महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आयोजित ‘कार्यक्षमता वृद्धी’ कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत अर्थतज्ञ, लेखक आणि महाराष्ट्र नीती आयोगाचे सदस्य दीपक करंजीकर यांनी नगरसेवकांना तंत्रज्ञानाचा उपयोग, अभ्यासाची महत्त्वपूर्ण भूमिका आणि कृतीशील कामातून शहरातील प्रभावी नेतृत्व कसे घडवता येईल यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नगरसेवक व सभागृह नेते नितीन लढ्ढा होते. मंचावर महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, अतिरिक्त आयुक्त शोभाताई बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, तसेच वित्त व लेखा अधिकारी विजयकुमार सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. महापौर काळे यांनी प्रास्ताविकात सांगितले, “एक…
साईमत मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्रावर हवामान विभागाकडून दुहेरी संकट घोंगावत असल्याचे इशारा मिळाला आहे. सोमवारी, 23 मार्च रोजी राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यातील गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेती आणि फळबागांचे नुकसान झाले असून आता या नवीन हवामानामुळे बळीराज्याचे संकट अधिक वाढण्याची शक्यता आहे. कोणत्या जिल्ह्यांना उष्णतेची लाट? हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांत उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण दिवस आणि दमट हवामान राहणार आहे. दक्षिण कोकणातही दमट हवामानासह उष्ण दिवस राहण्याची शक्यता आहे. कोणत्या जिल्ह्यांत अवकाळी पाऊस? सातारा, सांगली,…
मुख्यमंत्र्यांकडून निर्देश; फोटो आणि व्हिडिओनंतर वाढला दबाव साईमत नाशिक प्रतिनिधी ज्योतिषी अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली असताना, या प्रकरणाचे पडसाद आता राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचले आहेत. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत असून, त्यांच्या पदावर गच्छंती निश्चित मानली जात आहे. नाशिकमध्ये एका महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून अशोक खरातला अटक झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येऊ लागल्या. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या दृश्यांमुळे जनतेत संतापाची लाट उसळली असून, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून…
साईमत प्रतिनिधी नवी दिल्ली – राज्यातील सत्ताधारी मंत्रिमंडळातील ९ मंत्री भोंदूबाबा अशोक खरातचे नियमित भक्त असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (दि. २०) केला. राऊत म्हणाले की, हे मंत्र्ये भोंदूबाबाकडे जाऊन अत्यंत घृणास्पद वर्तन करत होते. या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राऊत यांनी या प्रकरणाची तुलना आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेल्या “एपस्टिन फाइल्स” प्रकरणाशी केली. त्यांनी म्हटले, “जगात एपस्टिन फाइल्स आणि महाराष्ट्रात खरात फाइल्स.” राऊतांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री फडणवीसांनी अत्यंत गुप्तपणे गेल्या १५ दिवसांपासून गृहखात्याच्या माध्यमातून खरात फाइल्स संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते. पोलिसांची पथके…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगावमधील क्रिकेटप्रेमींना आनंदाची लाट! जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ‘जळगाव क्रिकेट लीग (JCL) 2026 – पर्व 2’ चे भव्य आयोजन जाहीर करण्यात आले असून, या स्पर्धेची अधिकृत घोषणा संघटनेचे अध्यक्ष आणि जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी केली. या प्रसंगी उपाध्यक्ष सुरज जहागिर, सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतुल जैन यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “ही लीग फक्त स्पर्धा नाही, तर जळगावकरांसाठी क्रिकेटचा उत्सव आहे, जिथे प्रत्येक खेळाडूला आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.” IPL च्या धर्तीवरील स्पर्धा या लीगचे आयोजन Indian Premier League (आयपीएल) च्या…