साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी तालुक्यातील वडजी येथील सिद्धार्थ प्रकाश सपकाळे वय २५ या पंचवीस वर्षीय तरुणाने भागवत इंगळे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाच्या फांदीवर दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना दुपारी बाराचे सुमारास उघडकीस आली. ही आत्महत्या सकाळ ते बारा वाजेच्या दरम्यान घडली असल्याचा अंदाज आहे. मयत सिद्धार्थ कुटुंबातील सर्वात लहान होता त्याचे पश्चात आई ,वडील, मोठा भाऊ व विवाहित बहिणी असा परिवार आहे.या घटने बाबत मयताचा भाऊ विनोद प्रकाश सपकाळे याचे खबरी वरून बोदवड पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यू नोंद झाली असून पुढील तपास हे.कॉ.वसंत निकम हे करीत आहेत.
Author: Saimat
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या सूचनेप्रमाणे गावठी दारू विरुद्ध मोहीम सुरू केली आहे आज सकाळी बोदवड पोलिसांनी शेलवड येथे गावठी दारूचा अड्डा उध्वस्त केला आहे. तीन दिवसापूर्वी बोदवड शिवारातील दारू नष्ट केल्यानंतर आज सकाळी ७.३० सुमारास तालुक्यातील शेलवड शिवारातील कुरण तलावाजवळ आनंद गुलाब धुलकर वय ३५ राहणार भीलवाडा बोदवड यांच्या ताब्यातील ४ ड्रम कच्चे ८०० लिटर कच्चे रसायन व २०० लिटर उकळते पक्के रसायन चालू भट्टी व ८० लिटर तयार हात भट्टी दारु वरील तयार दारू सह १३ हजारांचा मुद्देमाल मिळून आला हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला करत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५( फ ).(ब) क…
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी जिल्हाभरात वार्याच्या वेगासारखा व्हायरल झालेला शिरसाळा मारोतीरायाचा फोटो 24 तासात दहा लाखांहून अधिक भाविकांपर्यंत सोशल मिडियाच्या माध्यमातून पोहोचला. परंतु , व्हायरल झालेल्या फोटोत मुर्तीच्या सावलीत मारोतीराराचे प्रतीरुप दिसत असलेले छायाचित्र नेमके कोणी काढले ? हा फोटो बनावट तर नाही ना ? अशी विचारणा मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून होत होती. या घटनेच्या दुसर्या बाजुचा शोध घेत नेमके सत्य काय हे जाणुन घेण्याचा प्रयत्न छायाचित्र काढणाऱ्या जळगांव येथील जिजाऊ नगर येथील रहिवाशी तरुण चेतन बाविस्कर यांच्याशी संवाद साधण्यात आला. मुर्तीच्या सावलीत मारोतीरायाचे प्रतीरुप दिसत असलेले छायाचित्र व्हाट्सअप वर एका तरुणाचे स्टेटस लावलेले असल्याचे निदर्शनास आल्यावर ते छायाचित्र शिरसाळा मारोतीरायाचे…
साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी कजगाव ता.भडगाव येथुन जवळच असलेल्या श्री.क्षेत्र गोंडगाव येथे होणाऱ्या जपानुष्ठान ची तयारी जोरात सुरू झाली असुन कजगाव पारोळा मार्गावर उभारण्यात येत असलेले विविध मंडप प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने श्री.१००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेन श्री. क्षेत्र गोंडगाव ता.भडगाव येथे राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा दि.२८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर असं सप्ताहभर धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन यात लाखो बाबाजी भक्त सह भाविक सहभागी होणार आहेत. बाबाजींचे ३३ वे पुण्यस्मरण दिनांक २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर पर्यंत भव्यदिव्य स्वरूपात आयोजित केले जाणार आहे तसेच कै. विजकुमार सुदर्शन…
साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील ग्रामपंचायत च्या निवडणुकीचा बिगुल आता वाजला आहे यंदाची निवडणूक ही लोकनियुक्त सरपंच निवड पद्धतीने होणार आहे मागील पंचवार्षिक निवडणूकही लोकनियुक्त सरपंच निवडणूकीतून झाली होती आता ही कजगावचा सरपंच हा लोकनियुक्त पद्धतीने निवडला जाणार आहे सतरा ग्रा प सदस्य व एक लोकनियुक्त सरपंच अश्या अठरा जागांसाठी ही सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे. लोकनियुक्त सरपंच पदासाठी अनेकांनी आता पासूनच कंबर कसली आहेत आजी माजी सरपंचासह आजी माजी सदस्य अनेक तरुण व अनेक उद्योजक ग्रामस्थ ह्या लोकनियुक्त च्या स्पर्धेत उतरण्याचे संकेत देत आहेत आगामी निवडणुकीत अनेक मातब्बर आपली राजकीय ताकत दावावर लावण्याची शक्यता आहे…
साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथे भडगाव येथील पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे तालुक्यातील १६४ शाळांच्या मुख्याध्यापकांची यु-डायस प्लस ची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली . भडगाव शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्याच्या या कार्यशाळेस केंद्रप्रमुख कोमलसिंग पाटील, अशोक संतोष खेडकर, एम आय खान, नंदकिशोर बैरागी, रवींद्र सोनवणे, रावसाहेब पाटील, जिजाबराव पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह सर्व माध्यमांच्या शाळांचे मुख्याध्यापक तंत्रज्ञान शिक्षक उपस्थित होते. यावेळी शालेय पोषण आहार लेखा परीक्षण संदर्भात सुभाष उगले यांनी सखोल मार्गदर्शन केले . एम आय एस कॉर्डिनेटर योगेश अहिरराव व किशोर पुजारी यांनी यु-डायस प्लस ची माहिती भरताना येणाऱ्या अडचणी व…
साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी कजगाव पारोळा मार्गावरील कजगाव च्या उड्डाणपुलावर रीक्षा व ट्रॅक्टर मध्ये झालेल्या अपघातात रीक्षा ड्रायव्हर सह दोन महिला जखमी झाल्या जखमींना चाळीसगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बाबत वृत्त की कजगाव येथील रहिवासी प्रविण सुपडु महाजन हे आपल्या रिक्षा क्रमांक एम.एच.१९ एक्यू ७४५५ ने शेतात जात असतांना कजगाव पारोळा मार्गावरील श्री.चक्रधारस्वामी रेल्वे उड्डाणपुला वर कोळगाव कडुन येणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.१९ सी.झेड ६३०१ ने जोरदार धडस दिल्याने यात रिक्षा ड्रायव्हर प्रविण सुपडु महाजन यांचे दोघ पाय फ्रॅक्चर झाले तर दिपाली प्रविण महाजन व सुनिता राजेंद्र वाघ या दोघ महिलांना डोक्यास मार लागल्याने त्यांना चाळीसगाव येथील खाजगी…
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी बोदवड येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सामाजिक वनीकरण विभागाला निवेदन देण्यात आले. बोदवड शहरासह तालुक्याभरात कडूनिंब या वृक्षावर असंख्य अशा अळ्या पडून तालुका भर कडूलिंब वृक्ष अक्षरशः बोडखे करून सोडले आहे यावर उपाय योजना करावी व वातावरणामध्ये ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या प्रमुख वृक्षापैकी कडूनिंब हे महत्वपूर्ण वृक्ष असून आज ते वृक्ष अक्षरशा बोडके करून सोडलेले आहे. ज्याकडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून शेती व औषधी उपयोगी येतो त्याच कडुनिंब वृक्षाला आज असंख्य अळ्या पडून फस्त करीत आहे. यावर संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून उपाययोजना करावी याकरिता संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अनंत भाऊ वाघ शहर अध्यक्ष…
साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे भारताच्या माजी पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय एकात्मता दिन’ म्हणून संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.हेमंत महाजन उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रमाधिकारी डॉ.ताहीरा मीर मॅडम उपस्थित होत्या. सर्वप्रथम मान्यवरांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. ताहिरा मीर मॅडम यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवन व कार्याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना उद्बोधन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य महाजन यांनी ‘ना कोई हिंदू है …या ना कोई मुसलमान है…हम सब…
साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी आज सकाळी झालेल्या अपघातात अमळनेर चे सहा-गटविकास अधिकारी पंचायत समिति अमळनेर तथा गटविकास अधिकारी पंचायत समिति यावल एकनाथ चौधरी यांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की , गट विकास अधिकारी एकनाथ चौधरी हे आज पहाटे शासकीय कामासाठी नाशिकला अमळनेर – धुळे या मार्गाने आपल्या एमएच.१९.डीव्ही. ४१९९ नंबरच्या शासकीय वाहने निघाले होते धरणगाव तालुका येथील भोणे फाट्याजवळ त्याच्या वाहनाने समोरच्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. यात ड्राइव्हरच्या बाजूला बसलेले एकनाथ चौधरी यांच्या जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. एकनाथ चौधरी हे मूळचे धुळे जिल्ह्याचे रहिवाशी असून हल्ली ते अमळनेरचे…