समाजकार्य विभागाच्या विद्याथिर्नी केली आदिवासी मुलांसोबत दिवाळी साजरी

0
3

साईमत लाईव्ह एरंडोल प्रतिनिधी (समाधान वाघ) 

कवयित्री बहिणाबाई चौधरी महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव सामाजिक शास्त्रे प्रशाळा, समाजकार्य विभागाचे द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वैजनाथ ता. एरंडोल येथे आदिवासी समाजातील लहान मुलांसोबत दिवाळी साजरी केली. व त्यांना दिवाळी निमित्ताने फराळ वाटप करण्यात आला, यावेळी त्या मुलांचा चेहेऱ्यावर आनंद बघायला मिळाला. ते पाहून सगळ्या विद्यार्थ्यांचा उपक्रम करण्या मागचा हेतू साध्य झाला. हा उपक्रम बघून अनेकांचा मनात समाजसेवे विषयी जागरूकता निर्माण झाली. ह्या उपक्रमाला गावातील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. समाजकार्य विभागाचे विद्यार्थी प्रविण देशमुख, निलेश्वरी पवार, अक्षय महाजन, गोरख माळी, प्रविण शिंदे, निलेश लोहार यांनी ह्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले व हा उपक्रम घडवून आणला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here