साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी महिलांचा सन्मान हे मराठा प्रतिष्ठानचे आद्य कर्तव्य आहे.महिलांची भाऊबीज हा मराठा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम आहे असे मत संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांनी गुरुवारी रात्री मराठा प्रतिष्ठानच्या नारी सन्मान सोहळ्यात व्यक्त केले.उमारविहिरे,निमखेडी, तिखी या तीन गावातील महिलांना मराठा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित नारी सन्मान सोहळ्यात दोन हजार पाचशे साड्यांचे वितरण तहसीलदार रमेश जसवंत, अध्यक्ष सोपान गव्हांडे, एकपात्री प्रयोगकार प्रवीण माळी,यांच्या हस्ते उमर विहिरे गावात करण्यात आले. तहसिल दार रमेश जसवंत, अध्यक्ष सोपान गव्हांडे, नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे,सरपंच घोसला गणेश माळी, सरपंच उमर विहिरे कविता बाई पवार,माजी उपसभापती चंद्रकांत बावस्कर, प्रवीण माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती या नारी…
Author: Saimat
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय चौधरी शेतात कापूस वेचणी करणाऱ्या शेतकरी महिलेला बांधावरील मंदिरावर बोलावून दोघे भामट्यांनी गुंगीचे बिस्कीट देऊन महिलेच्या गळ्यातील सात ग्रॅमचे मंगळसूत्र अंदाजे किंमत ३५ हजार रु.भरदिवसा लांबवून पोबारा केल्याची घटना रविवारी नऊ वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जरंडी शिवारात सोयगाव-बनोटी रस्त्यालगत असलेल्या स्वमालकीच्या शेतात गट क्र-३७५ मध्ये सुमनबाई रामदास गोरे(महाजन) या कापूस वेचणी करत असताना बनोटी कडून दुचाकीवरून येणाऱ्या दोघांनी सुमनबाई गोरे यांना शेतीच्या बांधावर असलेल्या मंदिरावर बोलावून त्यांच्या पिशवीतील पाच-पाचशेच्या दोन नोटा काढून दोघे भामट्यांनी महिलेला सांगितले की,आमच्या आईची…
साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी भुसावळ हे रेल्वेचे मोठे जंक्शन आहे. देशभरातील सर्वच प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मार्गापैकी एक असलेलं हे जंक्शन असल्याने येथून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ सुरू असते. यात अनेकदा गंभीर गुन्ह्यातील आरोपी तसेच प्रवासा दरम्यान गंभीर गुन्हेही घडत असतात. अशीच एक घटना उघडकीस आली असून खंडव्याकडे जाणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अमृतसर येथील तरुण मनमीत सिंग गुरुप्रितसिंग हा 26 ऑक्टोंबर रोजी आपल्या चार – पाच मित्रांसोबत नांदेड – अमृतसर या एक्स्प्रेस गाडीने अमृतसरकडे निघाला होता. प्रवासा दरम्यान त्याचे मित्रांसोबत वाद झाल्याचे समजते. हा वाद…
साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे दिवाळी निमित्त जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या परिवाराच्या वतीने संपुर्ण गावात प्रत्येक घरी जेष्ठ नागरिक, महिलांना ब्लॅंकेट व फराळाचे वाटप करण्यात आले. प्रत्येक कुटुंबात दिवाळी साजरी व्हावी या सामाजिक भावनेतून “थोडंसं आपल्या लोकांसाठी” हा उपक्रम राबविला असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रकाश चव्हाण यांनी केले. यावेळी सरपंच अशोकराव पाटील, माजी नायब तहसीलदार माणिक चव्हाण, भाजप नेते अमृता चव्हाण, एस.बी.आयचे सब मॅनेजर राजाराम चव्हाण, उद्योजक व्यंकटेश चव्हाण, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कृष्णात मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश कदम, आलियाबादच्या सरपंच ज्योतिका चव्हाण, रामतीर्थ सरपंच बालाजी राठोड, उपसरपंच सुर्यकांत राठोड,ग्रा.प.सदस्या घमाबाई राठोड, धानाबाई राठोड, रामचंद्र पवार, तंटामुक्ती अध्यक्ष…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी :- आमदार रवी राणा यांनी सरकारला पाठिंबा देण्यासाठी खोके घेतल्याचा आरोप अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर केला आहे. त्यांच्या या आरोपावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रवी राणा यांनी जे विधान केले आहे ते अत्यंत चुकीचे आहे. एका व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखे आहे. कोणताही आमदार विकावू नाही. पण तुमच्या एका आरोपामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. म्हणून रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे, असे खडे बोल शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांना सुनावत बच्चू कडू यांची बाजू घेतली. रवी राणा यांनी शब्द मागे घेतले…
साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे यावल तालुक्यातील गायरान आदिवासी वस्ती येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात आली. त्यात १७५ कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, पुरुषांना कपडे,ब्लॅकेट, आंघोळीचे रुमाल, स्वेटर, फराळ, शैक्षणिक साहित्य,गहू तांदूळ, पणत्या, साबण, अगरबत्ती, बिस्किट, चॉकलेट आणि यांचे वाटप करण्यात आले. दीपाेत्सवाच्या निमित्ताने अंतर्नाद तर्फे ‘एक वाटी फराळ व नवीन कपडे द्या आणि वंचितांची दिवाळी गाेड करू या’ असे आवाहन करण्यात आले हाेते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला.या उपक्रमांतर्गत गाेळा करण्यात आलेले साहित्य व फराळ यावल तालुक्यातील गायरान येथील आदिवासी पाड्यात वाटप करण्यात आला.यंदा उपक्रमाचे सातवे वर्ष होते. उपक्रमाचे दाते राजेश्वरी संधानशिवे, हर्षद महाजन, दीपक चौधरी, राजेश…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस गुलाबजाम सारखे गोड गोड आणि गुळगुळीत बोलतात. अशा शब्दात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमा केली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना सुषमा अंधारे यांनी अनेक दिग्गज नेत्यांची उपमा दिवाळी फराळाशी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मेथीच्या लाडूसारखे राजकारणात पौष्टिक आहेत. तर उद्धव ठाकरे हे चौकोनी नानकटाई सारखे गोड आहेत, असं अंधारे म्हणाले. शंकरपाळे पाहिल्यानंतर मला राज ठाकरे यांची आठवण येते. देवेंद्र फडणवीस गुलाबजाम सारखे गोड गोड आणि गुळगुळीत बोलतात. धनंजय मुंडे यांना त्यांनी बाहेरून कडक आणि आतून नरम असलेल्या अनारशाची उपमा दिली. तर राजकारणातले रॉकेट शंकरपाळे गुलाब जामून यासह…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी- प्रेमातून पळवून नेत कुंटणखान्यात ढकललेल्या तरुणीची सुटका केल्याच्या कामाची रोटरी क्लबने दखल घेत जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या अंमलदार योगिता पाचपांडे यांना सन्मानपत्र देऊन गौरविले. रोटरी क्लबच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष राजेश वेद, मानद सचिव गिरीश कुळकर्णी, कॅप्टन मोहन कुळकर्णी, डॉ. कीर्ती देशमुख व पूनम मानुधने उपस्थित होत्या. जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या तरुण-तरुणीने प्रेमाच्या आणाभाका घेत पलायन केले होते. पुण्यात त्यांनी काही दिवसच संसार केला. ानंतर या तरुणाने त्याच्या नातेवाईक महिलेच्या माध्यमातून या तरुणीला कुंटणखान्यात ढकलले होते. तेथून तिची सुटका होणे अवघड होते. यासंदर्भात तालुका पोलिसांत संबंधित तरूणी हरविल्याची नोंद होती. या मुलीवर ओढवलेल्या…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी दिवाळी वर्षातून एकदाच येते, पण राजकारणातले फटाके कोणत्याही वेळी फुटत असतात. असे म्हणत शिवसेनेने पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “शिंदे गटाचे किमान २२ आमदार नाराज असून, यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपमध्ये विलीन करून घेतील. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असा खोचक सवाल शिवसेनेने विचारला आहे. “शिंदे यांचा रामदास आठवले होईल, हे त्यांच्याच गटातील एका नेत्याने खासगीत केलेले विधान बोलके आहे. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. शिंदे यांनाही उद्या भाजपमध्येच विलीन व्हावे लागेल व त्यावेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील, हे भाजपचे नेते सांगत आहेत. मग शिंदे यांनी…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी :- शहर पोलिसांकडून जिल्हा दूध संघाची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी संघात जाऊन काही कागदपत्रे ताब्यात घेतली. याबाबत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, जिल्हा दूध संघाने दाखल केलेल्या तक्रारीची अजूनही नोंद झाली नाही आणि याचाच जिल्हा दूध संघात तपास सुरू आहे. पोलिस नेमका कशाचा तपास करीत आहे. त्यांनी दहा ट्रक कागदपत्रे घेऊन जावीत; परंतु गुन्हा आगोदर नोंद करावा, याबाबत आम्ही न्यायालयात अवमान याचिकाही दाखल केली आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. पुढे खडसे यांनी सांगितले की, जिल्हा दूध संघात पोलिस पाच वर्षांच्या कागदपत्रांची तपासणी करीत आहेत. वास्तविक हा चोरीचा गुन्हा आहे,…