Author: saimat

गोकुळ गीते मुंबईकडे रवाना शिवसेना प्रवेश सोहळ्याची जोरदार तयारी साईमत /नाशिक/ प्रतिनिधी  : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल सोमवारी सकाळी जाहीर झाले असून, महायुतीने जळगावसह बहुतांश जागांवर जोरदार यश मिळवले आहे. मात्र नाशिकमध्ये महायुतीचे आणि शिवसेना (शिंदे गट) चे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना धक्का देत बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी झाले आहेत. या अनपेक्षित निकालानंतर आता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडत असून गीते यांच्या शिवसेना प्रवेशाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विजयी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – लखनऊ उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील अलीगंज परिसरातील पुरनिया चौकाजवळ असलेल्या एका कोचिंग सेंटरमध्ये सोमवारी भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. आगीतून सुटका करण्यासाठी सात ते आठ विद्यार्थ्यांनी इमारतीवरून खाली उड्या मारल्याची माहिती समोर आली आहे. तर २० ते २५ विद्यार्थी आत अडकल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. आग लागल्यानंतर काही क्षणांतच संपूर्ण इमारतीत दाट धूर पसरला. त्यामुळे कोचिंग सेंटरमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उड्या मारल्या, तर इतरांनी बाहेर पडण्यासाठी धावपळ केली. परिसरात किंचाळ्या आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या…

Read More

जळगावात २५ जूननंतर मुसळधार पावसाची शक्यता साईमत /जळगाव/ प्रतिनिधी  मागील काही दिवसांपासून तीव्र उकाडा आणि दमट हवामानामुळे हैराण झालेल्या जळगावकरांना पावसाची आतुरता लागून राहिली आहे. राज्यात मान्सूनने काही भागांत हजेरी लावली असून मुंबईत त्याची अधिकृत एन्ट्री झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून रविवारी पहाटे जळगाव जिल्ह्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे काही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी जिल्ह्यात अद्याप सर्वदूर आणि सातत्यपूर्ण पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून उष्णता आणि दमटपणा यांचे प्रमाण कायम राहणार आहे. २२…

Read More

खंडेराव मंदिर परिसरात मोलमजुरी करणाऱ्या महिलेची पतीकडून हत्या सात वर्षांच्या चिमुकल्याचे मातृछत्र हरपले पती अटकेत साईमत /नशिराबाद/ प्रतिनिधी  किरकोळ कौटुंबिक वादातून एका विवाहितेची पतीने कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी नशिराबाद येथील खंडेराव मंदिर परिसरातील खालची आळी येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपी पतीला तातडीने ताब्यात घेतले आहे. मंदाबाई विकास जाधव (भिल्ल) (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून, विकास जगन जाधव (भिल्ल) (वय ३५) असे आरोपी पतीचे नाव आहे. जाधव दाम्पत्य मूळचे जामनेर तालुक्यातील केकत निंभोरा येथील रहिवासी असून, गेल्या सुमारे वर्षभरापासून मोलमजुरीसाठी नशिराबाद येथे वास्तव्यास…

Read More

भर दुपारी शेतात काम ठरले जीवघेणे ४९ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू साईमत /पारोळा / प्रतिनिधी  पारोळा तालुक्यातील शिरसोदे गावात उष्माघातामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. प्रतापराव दत्तू पाटील (वय ४९) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या आकस्मिक निधनामुळे गावासह परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. माहितीनुसार, प्रतापराव पाटील हे रविवारी दुपारच्या सुमारास आपल्या शेतात शेतीची कामे करत होते. दुपारी उन्हाचा कडाका वाढलेला असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच ते शेतात कोसळले. ग्रामस्थांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. घटनेनंतर त्यांचे पार्थिव धुळे येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर उष्माघातामुळेच त्यांचा…

Read More

बिल दुरुस्त करण्याऐवजी ‘हप्त्यांमध्ये पैसे भरा’चा सल्ला सौरऊर्जा ग्राहकांनाही चुकीच्या बिलांचा फटका साईमत /जळगाव/ प्रतिनिधी  महावितरणच्या ढिसाळ आणि मनमानी कारभारामुळे सामान्य ग्राहकांचे आर्थिक कंबरडे मोडत असल्याची गंभीर बाब जळगाव शहरात पुन्हा एकदा समोर आली आहे. शहरातील सम्राट कॉलनीतील एका ग्राहकाला अवघ्या ३० दिवसांच्या कालावधीसाठी तब्बल ७५ हजार ९०० रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे संबंधित ग्राहकाने तक्रार करण्यासाठी महावितरण कार्यालयात धाव घेतल्यानंतरही बिल तपासून दुरुस्त करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी ‘हप्त्यांमध्ये पैसे भरा’ असा अजब सल्ला दिल्याने संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सम्राट कॉलनीतील रहिवासी सुशीलाबाई श्रीश्रीमाळ यांना मे ते जून या ३० दिवसांच्या कालावधीसाठी ३ हजार ६७६…

Read More

ट्रक अडवून चालकावर चाकू हल्ला अवघ्या १२ तासांत जेरबंद साईमत /जळगाव/ प्रतिनिधी  जळगाव-भुसावळ बायपास रोडवर ट्रक चालकावर चाकूने हल्ला करून लूट करणाऱ्या अट्टल गुन्हेगार टोळीचा जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधीसंघर्षित बालकासही ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना २० जून २०२६ रोजी रात्री सुमारे १ वाजता पाळधी परिसरात घडली. फिर्यादी मुकेश रामराव राठोड (वय ३०, रा. जालना) हे MH-21-BH-3536 क्रमांकाच्या ट्रकने प्रवास करत असताना चार अज्ञात आरोपींनी त्यांचा ट्रक अडवला. चारचाकी व दुचाकीवरून आलेल्या या टोळीने ट्रकवर दगडफेक करत चालक व क्लीनरला मारहाण केली. हल्ल्यादरम्यान मुख्य…

Read More

योग दिनानिमित्त जळगावात अधिकारी, विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग साईमत /जळगाव/ प्रतिनिधी  भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा आणि निरोगी जीवनशैलीचा प्रभावी मार्ग म्हणून मान्यता मिळालेल्या योगाला जागतिक स्तरावर आज मोठे स्थान प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जळगाव शहरात विविध स्तरांवर उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच ‘मेरा युवा भारत, जळगाव’ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या सभागृहात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, महानगरपालिका आयुक्त…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – बदलापूर : मुंबई-वडोदरा महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात आलिशान BMW कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका तरुणीला गंभीर दुखापत झाल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास एरंजाड परिसरात घडली. संबंधित BMW कार टिटवाळ्याकडून बदलापूरच्या दिशेने येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार महामार्गावरील दुभाजकाला जोरदार धडकून अनेकवेळा पलटी झाली. अपघाताचा जोर इतका प्रचंड होता की कारचे मोठे नुकसान झाले. वाहनाचे अवशेष आणि इतर साहित्य मोठ्या परिसरात विखुरले गेले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाचे दृश्य अत्यंत विदारक होते. या अपघातात…

Read More

होर्डिंग्ज टाळून समाजसेवा वह्या-दप्तर वाटपाचा भव्य कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद साईमत /जळगाव/ प्रतिनिधी  जळगाव शहरातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देण्याच्या उद्देशाने जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत तब्बल १००० विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप करण्यात आले. कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी टाळून केवळ समाजसेवेच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आमदार सुरेश दामू भोळे यांनी यंदा आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. होर्डिंग्ज, बॅनरबाजी टाळून त्या ऐवजी गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा त्यांनी दिलेला संदेश प्रत्यक्षात उतरविण्यात आला. त्यांच्या आवाहनाला भाजपच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत एकूण…

Read More