Author: saimat

साईमत न्यूज नेटवर्क – विटा : साखर कारखान्यातून कमी दरात साखर पुरवठा करून देण्याचे आमिष दाखवत बनावट ई-वे बिल आणि जीएसटी बिलांचा वापर करून तब्बल ९ कोटी १६ लाख २५ हजार ९९ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विटा पोलिसांनी चार जणांसह साखर कारखान्याच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आशिष आनंदराव पाटील यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक नेताजीराव मोरे, राजीव नेताजीराव मोरे (दोघे रा. बिरणवाडी, ता. तासगाव), अक्षय अनिल पाटील (रा. वायफळे), अभिजीत हनुमंत माने (रा. धनगाव, ता. पलूस) तसेच पिंपळनेर (ता. माढा, जि. सोलापूर) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. ऑनलाइन आरक्षण केलेल्या वेटिंग तिकिटांवरील ऑटो-कॅन्सलेशनचा नियम रद्द करण्याबाबत रेल्वे मंत्रालय विचार करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सध्या ऑनलाइन बुक केलेले आरक्षित तिकीट चार्ट तयार झाल्यानंतरही वेटिंगमध्ये राहिल्यास ते आपोआप रद्द होते. अशावेळी प्रवाशांना परत जनरल तिकीट घेऊन प्रवास करावा लागतो. विशेषतः सणासुदीच्या काळात आणि सुट्ट्यांमध्ये या नियमामुळे अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, प्रस्तावित बदल लागू झाल्यास चार्ट तयार झाल्यानंतरही वेटिंगमध्ये असलेले ऑनलाइन तिकीट वैध राहू शकते. अशा तिकिटाच्या आधारे प्रवाशांना जनरल डब्यात प्रवास करण्याची परवानगी देण्याचा पर्याय रेल्वे प्रशासन विचाराधीन ठेवत असल्याचे…

Read More

पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा योग दिनात सहभाग साईमत /मुक्ताईनगर/ प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी मुक्ताईनगर येथील जे.ई. स्कूलमध्ये योग प्राणायाम कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि योगाचे महत्त्व पटवून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमास प्राचार्य व्ही.एम. चौधरी, उपप्राचार्य व्ही.के. शिर्के, पर्यवेक्षक के.आर. कवळे, व्ही.डी. बऱ्हाटे, योगशिक्षक एस.बी. वंजारी, क्रिडा शिक्षक एस.एम. वाढे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिडा शिक्षक एस.एम. वाढे यांनी केले. यावेळी योग प्राणायाम व विविध आसनांचे प्रात्यक्षिक योगशिक्षक एस.बी. वंजारी यांनी सादर केले. त्यांनी योगाचे दैनंदिन…

Read More

योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग साईमत /जळगाव/ प्रतिनिधी  के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागातून योगदिन अत्यंत आनंदी व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. योगाच्या माध्यमातून निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश यावेळी देण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यानाचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि शिस्तबद्ध प्रात्यक्षिकांना शिक्षक व उपस्थित मान्यवरांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. संपूर्ण विद्यालय परिसरात योगमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. किशोर भोई आणि श्रीमती निराशा…

Read More

पार्टीनंतरच्या वादातून तरुणाचा खून; अपघाताचे नाटक करून दिशाभूल  यावल पोलिसांकडून तिघे जेरबंद साईमत /यावल/ प्रतिनिधी  यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील २६ वर्षीय तरुणाच्या मृत्यूमागील गूढ अखेर उलगडले असून अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा दावा पूर्णपणे खोटा ठरला आहे. मित्रांसोबत झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या करून त्याला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी मृताच्या तिघा मित्रांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळन्हावी येथील पवन रवींद्र सोळंके (वय २६) याला बुधवारी मध्यरात्रीनंतर काही युवकांनी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत तो गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – देशातील विविध राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असताना महाराष्ट्रात मात्र अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. केरळमध्ये 4 जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर 15 दिवस उलटूनही महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावलेली नाही. राज्यात पावसाची कमतरता गंभीर असून, मागील काही दिवसांत सामान्य सरासरीपेक्षा सुमारे 78 टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. याच कालावधीत गुजरातमध्येही पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. 4 ते 18 जूनदरम्यान देशभरात सुमारे 41 टक्के कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. पावसाच्या उशिरामुळे राज्यातील तापमानात वाढ झाली असून अनेक भागांत पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. विदर्भात काही ठिकाणी 42.3 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली आहे, त्यामुळे…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – जळगाव : अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या शांतता करारानंतर जागतिक बाजारात मोठे बदल दिसून येत असून त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर झाला आहे. यामुळे आज जळगाव सराफ बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली. बाजारातील माहितीनुसार, सोन्याच्या दरात तब्बल 4,500 रुपयांची घट झाली आहे, तर चांदीच्या दरात 13,000 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. सध्या जळगावमध्ये सोन्याचा दर (GST सहित) 1 लाख 49 हजार रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीचा दर 2 लाख 44 हजार रुपये इतका आहे. दरातील या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकन बँकांचे व्याजदर धोरण, डॉलरचे मजबुतीकरण, तसेच जागतिक तणाव कमी झाल्याने सुरक्षित…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – अफगाणिस्तानच्या वायू दलाने पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतांतील कथित दहशतवादी ठिकाणांवर ड्रोन व हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने या कारवाईचे लक्ष्य ISIS-खोरासान (ISIS-K) या दहशतवादी संघटनेचे अड्डे असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणांचा वापर अफगाणिस्तानविरोधी कारवाया, कट रचणे आणि हल्ल्यांचे नियोजन करण्यासाठी केला जात होता. या अड्ड्यांवरून यापूर्वीही अनेक दहशतवादी कारवायांचे नियोजन करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, बलुचिस्तानातील किला अब्दुल्ला जिल्ह्यातील गुलिस्तान परिसर तसेच चगाई जिल्ह्यातील शकर अप आणि जंगल गार्डी भागातील ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले. याशिवाय खैबर पख्तूनख्वा…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – राजस्थान : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका महिलेने चांदीच्या दागिन्यांच्या मोहापोटी ७० वर्षीय विधवेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील टोंक जिल्ह्यात उघडकीस आली आहे. मृतदेहाचे शीर, हात आणि पाय वेगळे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या कसून तपासामुळे या ‘ब्लाइंड मर्डर’ प्रकरणाचा उलगडा झाला असून ५० वर्षीय रसाल देवी हिला अटक करण्यात आली आहे. टोंक जिल्ह्यातील लवादर गावाजवळ काही दिवसांपूर्वी हात-पाय आणि शीर नसलेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. मृतदेहाची ओळख ७० वर्षीय हरबाई गुर्जर या विधवा महिलेची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक रोशन मीना…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदी असलेल्या एका युवकाला धमकावून त्याच्याकडून जबरदस्तीने स्वाक्षरी घेणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच पोलिस अधिकाऱ्यांविरोधात खोटे आरोप असलेले अर्ज तयार करून त्यांचा गैरवापर केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत महेश गोकुळ सोनवणे (वय २३, रा. सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दीपक प्रकाश लोंढे, हर्षद सुनील पाटणकर, वकील यतीश देसले आणि अन्य संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी महेश सोनवणे यांना अंबड पोलिस ठाण्यातील एका मकोका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. कारागृहात असताना आरोपी…

Read More