Author: saimat

साईमत न्यूज नेटवर्क – दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक धार येत असून, विविध विरोधी पक्षांचे नेते आंदोलनस्थळी भेट देत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जनंतर वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले आहे. या घटनेनंतर विविध विरोधी पक्षांनी आंदोलनाला उघड पाठिंबा दर्शवण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी जंतर-मंतरवर जाऊन आंदोलनाचे नेतृत्व करणारे…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलनकर्ते अभिजीत दिपके यांची भेट घेतली. सोमवारी झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलन अधिक तीव्र झाल्याने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. भेटीदरम्यान अभिजीत दिपके यांनी आंदोलनाच्या प्रमुख मागण्या शरद पवार यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना ताब्यात ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेणे, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि आंदोलनकर्त्यांवरील देशभरातील सर्व एफआयआर मागे घेऊन सोनम वांगचुक यांची मुक्तता करावी,…

Read More

१०८ मीटर साडी अर्पण करून दिला सामाजिकतेचा संदेश साईमत /भुसावळ /प्रतिनिधी सूर्यकन्या माता तापी नदीच्या जन्मोत्सवानिमित्त भुसावळ शहरात धार्मिक उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा संगम पाहायला मिळाला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात भाविकांनी माता तापीला तब्बल १०८ मीटर लांबीची साडी अर्पण करून अनोखी श्रद्धा व्यक्त केली. महाआरती, पूजन, भजन-कीर्तन, भव्य शोभायात्रा आणि वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांनी तापी जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे पौराहित्य मंगेश जोशी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत वातावरण भक्तिमय केले. माता तापीच्या जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली. नदी संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – पिंपरी : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लोकप्रिय असलेले इन्स्टंट नूडल्स आता अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चेत आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील बोपखेल परिसरात एका ग्राहकाने खरेदी केलेल्या पॅकबंद नूडल्सच्या पाकिटात बुरशीसदृश थर आणि कीटक आढळल्याचा आरोप केला आहे. बोपखेल येथील रहिवासी महेंद्र भिंगारदिवे यांनी दुकानातून नूडल्सचे पॅकेट खरेदी केले होते. ते शिजवण्यासाठी पाकीट उघडले असता नूडल्सवर काळपट आणि हिरवट रंगाचा बुरशीसदृश थर तसेच कीटक दिसून आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच नूडल्समधून दुर्गंधी येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुदत संपण्यापूर्वीच उत्पादन खराब असल्याचा आरोप करण्यात आल्याने ग्राहकांमध्ये पॅकबंद खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः लहान मुले मोठ्या प्रमाणात इन्स्टंट…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतात पुढील सहा ते सात दिवस मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रासह देशातील २२ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात मंगळवार आणि बुधवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून गुरुवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठाणे जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी मुसळधार पाऊस पडू शकतो, तर पालघरमध्ये मंगळवारपर्यंत हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात तेथेही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक तीव्र पावसाचा अंदाज असून गुरुवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता…

Read More

 एकाच रात्री तीन घरांवर तुटून पडले चोरटे सव्वा लाखांची चोरी नागरिकांमध्ये भीती साईमत /कजगाव, ता. भडगाव /प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील कजगाव येथे चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घालत एकाच रात्री तीन घरांना लक्ष्य केले. सी.टी. पाटील नगर कॉलनी परिसरात झालेल्या या धाडसी घरफोड्यांमध्ये रोकड, सोने व चांदीचे दागिने असा सुमारे एक ते सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर पहाटे सुमारे ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रथम फारूक हाजी सलीम खाटीक यांच्या घराला लक्ष्य केले. घरात प्रवेश करून चोरट्यांनी कपाटातील सुमारे…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – NEET परीक्षा प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि विविध संघटनांच्या वतीने दिल्लीतील जंतर-मंतरवरून संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला. मोर्चा संसदमार्गाकडे सरकत असताना दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना अडवले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या गोंधळात काही आंदोलकांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली असून, त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान विविध घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाला काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शवला. काही नेत्यांना पोलिसांनी पुढे…

Read More

फेसबुक पोस्टवरून मंत्री गिरीश महाजनांची बदनामी बीडमधील तरुणावर पोलिसांची कारवाई साईमत /जळगाव /प्रतिनिधी सोशल मीडियाचा गैरवापर करून राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणावर जळगाव सायबर पोलिसांनी प्रभावी कारवाई केली आहे. फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्रासह दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील एका तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तपास पूर्णत्वास येत असून लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी जळगाव महापालिकेचे नगरसेवक अरविंद भगवान देशमुख यांनी १९ जून २०२६ रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत नमूद केल्यानुसार, “भारत बालाजी म्हस्के” या…

Read More

फेगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर; एकुलत्या एका मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू  साईमत /यावल /प्रतिनिधी सातपुडा पर्वतरांगांच्या निसर्गरम्य परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या यावल येथील १७ वर्षीय तरुणाचा हरिपुरा धरणाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवार दि. १९ रोजी दुपारी घडली. या घटनेने यावल शहरात शोककळा पसरली असून, एका होतकरू तरुणाच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत तरुणाचे नाव जयेश संजय फेगडे (वय १७, रा. महाजन गल्ली, यावल) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयेश फेगडे हा आपल्या चुलत भावासह व वहिनीसोबत सातपुडा डोंगररांगांमधील हरिपुरा धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. धरण परिसरातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेत असताना जयेश पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र,…

Read More

जखमी माकडाचा उपचारापूर्वीच मृत्यू  साईमत /भुसावळ /प्रतिनिधी  भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथील बसथांब्याजवळ रविवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत भरधाव कारच्या धडकेत एका माकडाचा मृत्यू झाला. रस्ता ओलांडत असलेल्या माकडांच्या कळपाला कारने जोरदार धडक दिल्याने एक माकड गंभीर जखमी झाले होते. नागरिकांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी अंत झाला. प्राप्त माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वरणगावकडून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात भरधाव कारने निंभोरा बसथांब्याजवळ रस्ता ओलांडत असलेल्या पाच ते सहा माकडांच्या कळपाला धडक दिली. या अपघातात एका माकडाला जोरदार मार लागल्याने ते रस्त्यावर कोसळले. धडक एवढी तीव्र होती की माकड गंभीर अवस्थेत बेशुद्ध पडले. घटना लक्षात…

Read More