Author: saimat

१३४ बुथची उभारणी; आरोग्य विभागाची जय्यत तयारी साईमत /मुक्ताईनगर/ प्रतिनिधी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत येत्या रविवार, दि. २८ जून रोजी मुक्ताईनगर तालुक्यात व्यापक स्वरूपात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक ‘दोन थेंब’ देण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाने संपूर्ण तालुक्यात जय्यत तयारी केली आहे. या मोहिमेसाठी तालुका आरोग्य विभागाने एकूण १५,२१५ बालकांचे उद्दिष्ट निश्चित केले असून, प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत लस पोहोचवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अधिपत्याखाली एकूण १३४ पोलिओ लसीकरण बुथ उभारण्यात आले असून, या बुथवर प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या…

Read More

पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ वाटप साईमत /जळगाव / प्रतिनिधी सामाजिक समता, न्याय आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाच्या वतीने शुक्रवारी सामाजिक न्याय दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना धनादेश, नियुक्ती आदेश तसेच गटई स्टॉलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त योगेश…

Read More

 भुसावळ–जळगाव मार्गे पंढरपूरसाठी धावणार ४ विशेष गाड्या, वारकऱ्यांना दिलासा साईमत /जळगाव / प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्यभरातून लाखो वारकऱ्यांची गर्दी होत असते. यंदाही हीच परंपरा कायम असून, वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर यात्रेसाठी एकूण चार विशेष गाड्या प्रत्येकी चार फेऱ्यांमध्ये चालविण्यात येणार असून, त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. या विशेष रेल्वे गाड्या नागपूर–मिरज, नवी अमरावती–पंढरपूर, खामगाव–पंढरपूर आणि भुसावळ–पंढरपूर या मार्गांवर धावणार आहेत. विशेष म्हणजे भुसावळ, जळगाव आणि खान्देश परिसरातील हजारो भाविकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या गाड्यांना भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव,…

Read More

जामन्या परिसरात अवैध छापा वनविभागाची धडक कारवाई २ लाखांचा मुद्देमाल जप्त साईमत /यावल / प्रतिनिधी  : यावल वन्यजीव अभयारण्यातील जामन्या वन्यजीव वनक्षेत्रात सुरू असलेल्या सागवान तस्करीचा वनविभागाने पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. अवैधरित्या साठवून ठेवलेले सागवान लाकूड जप्त करत सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी वन कायद्यानुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल वन्यजीव अभयारण्यातील समृद्ध वनसंपदेवर अवैध वृक्षतोड करणाऱ्या टोळीची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर जामन्या वनपरिक्षेत्रात विशेष पथक तयार करून कारवाईचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार वनक्षेत्रात गस्त वाढवण्यात आली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश दूसाने यांच्या मार्गदर्शनाखाली, उपवनसंरक्षक (वन्यजीव) नाशिक कृष्णा भवर आणि सहायक वनसंरक्षक…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – बदलापूर येथील एरंजाड गावात पत्नीची हत्या करून तिचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोस्टमॉर्टम अहवालातून खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी पती आणि सासूला अटक केली आहे. मृत महिलेचे नाव प्राजक्ता मेहेर असून तिचे 2010 साली योगेश मेहेर यांच्याशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. मात्र काही काळापासून योगेशचे गावातीलच एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे. याच कारणातून तो पत्नीवर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता. माहितीनुसार, 14 मार्च 2026 रोजी योगेशने प्राजक्ताच्या माहेरच्यांना बोलावून “हवे तेवढे पैसे घेऊन मुलीला घेऊन जा” अशी ऑफर दिल्याचा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला आहे. त्यानंतर…

Read More

जिल्हा प्रशासनाचा निर्णय गर्दी नियंत्रण व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना साईमत /यावल/ प्रतिनिधी मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर यावल येथील २६ जून २०२६ रोजी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सणानिमित्त शहरात होणारी मोठी गर्दी, वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेवर येणारा संभाव्य ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मोहरम हा मुस्लिम बांधवांचा पवित्र धार्मिक सण असून या दिवशी यावल शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. त्याच दिवशी आठवडे बाजारही भरत असल्याने बाजारातील व्यापारी,…

Read More

महाटीईटी (MAHATET) परीक्षेसाठी जळगावात कडक बंदोबस्त साईमत /जळगाव/ प्रतिनिधी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आली असून शहरातील ३० परीक्षा केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत परीक्षा पार पडणार आहे. परीक्षा शांततेत, पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक सुरक्षा व प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार, अनुचित प्रकार किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये आदेश जारी केला आहे. या आदेशाद्वारे परीक्षा काळात परीक्षा केंद्र परिसरात विशेष…

Read More

उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्षांच्या उपस्थितीत आढावा बैठक साईमत /जळगाव / प्रतिनिधी  : जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशनच्या आर्थिक व कार्यकारी स्थितीचा सविस्तर आढावा उपमहापौर मनोज सुरेश चौधरी आणि स्थायी समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत चार्जिंग स्टेशनच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा खर्च, मिळालेले उत्पन्न तसेच दैनंदिन देखभाल खर्च याचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात महिन्यांत या चार्जिंग स्टेशनमधून महानगरपालिकेला सुमारे २.५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्च यामुळे हा प्रकल्प सध्या आर्थिक तोट्यात चालत असल्याचे स्पष्ट झाले. सध्याच्या…

Read More

बांधकामाधीन पाच मजली गोदाम अचानक कोसळले; २० जखमी, अनेक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती साईमत न्यूज नेटवर्क – कोलकात्यातील तारातला परिसरात बुधवारी दुपारी घडलेल्या भीषण गोदाम दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बांधकामाधीन पाच मजली गोदामाचे छत अचानक कोसळल्याने आत काम करणारे अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनेत सुमारे २० कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.…

Read More

२० टक्के पाणी कपातीचा निर्णय; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन साईमत न्यूज नेटवर्क – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली असून, येत्या ३० जून आणि ७ जुलै २०२६ रोजी २४ तासांसाठी संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. धरण क्षेत्रातील अपुरा पाणीसाठा आणि यंदा पावसाळा लांबण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी २० टक्के पाणी कपातीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाने अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या…

Read More