Author: saimat

७,५०० रुपयांची लाच घेताना वनपाल पकडला साईमत /चाळीसगाव / प्रतिनिधी  : शासकीय योजनांच्या कामांच्या बिलांसाठी लाचखोरीचे प्रकार अद्यापही सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नाशिक पथकाने बुधवारी चाळीसगाव येथे धाडसी कारवाई करत सामाजिक वनीकरण विभागातील वनपालाला ७ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून सामाजिक वनीकरण विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्यारेलाल विठ्ठल महाजन (वय ५३) असे असून ते सामाजिक वनीकरण विभाग, परिक्षेत्र चाळीसगाव येथे वनपाल म्हणून कार्यरत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने मौजे तरवाडे (ता. चाळीसगाव) शिवारातील शेतामध्ये…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सलग दुसऱ्या दिवशी रिमझिम ते मुसळधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी केला असून काही भागांत रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून शहरासह ग्रामीण भागात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे गारवा मिळाला आहे. तसेच रखडलेल्या शेतीकामांना आणि पेरण्यांना वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई, रायगड आणि पालघर या भागांसाठी रेड अलर्ट देण्यात आला असून…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या वाढत्या खर्चाबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. खासगी मेडिकल कॉलेजांनी सरकारी महाविद्यालयांप्रमाणेच शुल्क आकारावे, अशी अपेक्षा करता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने राजस्थानमधील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शुल्क संरचनेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली. मात्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षण कितपत परवडणारे आहे, हा महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न भविष्यात स्वतंत्रपणे विचारात घेतला जाऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. नेमके प्रकरण काय? : राजस्थानमधील खासगी मेडिकल कॉलेजांमध्ये वार्षिक शिक्षण शुल्क सुमारे 18.9 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत आहे. या शुल्काविरोधात दाखल याचिकेत EWS प्रवर्गासाठी निर्धारित वार्षिक उत्पन्न मर्यादा 8…

Read More

वारकऱ्यांनी अभंग, भजन आणि नामस्मरण करत भक्तिमय वातावरण निर्माण केले साईमत /मुक्ताईनगर/ प्रतिनिधी  : आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यानिमित्त आदिशक्ती संत मुक्ताबाई यांची पालखी आज मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. टाळ-मृदंगांचा गजर आणि “ज्ञानोबा माऊली–तुकाराम” तसेच “संत मुक्ताबाई” यांच्या जयघोषाने संपूर्ण मुक्ताईनगर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. पालखी प्रस्थानापूर्वी संत मुक्ताबाई मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी संत मुक्ताबाईंच्या चरणी नतमस्तक होत महाआरतीत सहभाग घेतला. वारकऱ्यांच्या उपस्थितीत अभंग, भजन आणि नामस्मरणाचा गजर सुरू होता.…

Read More

तुटलेल्या सर्व्हिस वायरचा फटका तरुणाचा जागीच मृत्यू साईमत /पाचोरा/ प्रतिनिधी  : शहरातील एका दुर्दैवी दुर्घटनेत २३ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याने पाचोरा शहरावर शोककळा पसरली आहे. घरालगत असलेल्या वीजवाहिनीच्या संपर्कात आल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी नगरसेवक दत्तात्रय जडे यांचे पुत्र लोकेश दत्तात्रय जडे (वय २३) हे भडगाव येथे हॉटेल व्यवसाय करत होते. आपल्या कष्टाळू स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीतच व्यवसायात चांगली प्रगती केली होती. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे घराच्या बाहेरील लोखंडी जिन्यावरून वरच्या मजल्यावर जात असताना अचानक त्यांचा विजेच्या तारेशी संपर्क आला. प्राथमिक माहितीनुसार, घराजवळून गेलेली वीज वितरण कंपनीची…

Read More

ऑनलाइन प्रणाली व तंत्रज्ञानाच्या वापरावर भर साईमत /जळगाव/ प्रतिनिधी  :  जिल्ह्यात रस्ता सुरक्षा व्यवस्थेची व्याप्ती वाढवून रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात एकदिवसीय जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. जिल्हा प्रशासन आणि आयआयटी मद्रासअंतर्गत असलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रोड सेफ्टी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली. जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक माहितीचे प्रभावी व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि समन्वय वाढविणे हे या प्रशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट होते. प्रशिक्षण सत्रात डॉ. रोशन जोशी आणि मुख्य प्रकल्प अधिकारी प्रदीप कुमार यांनी उपस्थितांना सविस्तर…

Read More

आईच्या डोळ्यासमोर वीजेचा घाला ,वीज कोसळून ३२ वर्षीय शेतकरी  ठार साईमत /अमळनेर/ प्रतिनिधी  : अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे आज दुपारी घडलेल्या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेत वीज कोसळून एका ३२ वर्षीय युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आईच्या डोळ्यासमोर घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत शेतकऱ्याचे नाव राकेश रतिलाल पाटील असे असून, तो आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे १२ वाजता राकेश पाटील आपल्या आईसह आणि शेतमजुरांसोबत शेतात काम करत होते. अचानक आकाशात काळेकुट्ट ढग जमले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू…

Read More

भक्तिभावाची लाट उसळली; मुक्ताईनगरात वारकऱ्यांची गर्दी वाढली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती साईमत /मुक्ताईनगर/ प्रतिनिधी  : मुक्ताईनगर येथे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भक्तिभाव, हरिनामाचा गजर आणि वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. राज्यातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत मुक्ताईंच्या पालखी सोहळ्याचे उद्या पंढरपूरकडे विधिवत प्रस्थान होणार असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही संत मुक्ताईंची पालखी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर कडे मार्गस्थ होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मंदिर प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि वारकरी संप्रदायाने जोरदार तयारी केली आहे. शहरातील प्रमुख मार्ग, मंदिर परिसर तसेच पालखी मार्गावर आकर्षक विद्युत रोषणाई, पताका आणि स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. संत मुक्ताई मंदिर परिसरात…

Read More

स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांचा पुढाकार; २० वर्षांचा विचार करून नूतनीकरणाचा ठोस प्रस्ताव साईमत /जळगाव/ प्रतिनिधी  : शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील मुख्य सभागृहाचे संपूर्ण आधुनिकीकरण करून त्याला भविष्यातील गरजांनुसार सुसज्ज करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव पुढे आला आहे. स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून या सभागृहाचा आगामी २० वर्षांचा विचार करून अत्याधुनिक पद्धतीने कायापालट करण्याची मागणी केली आहे. डॉ. पाटील यांनी २२ जून रोजी दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, मनपाचे हे मुख्य सभागृह केवळ महासभा किंवा स्थायी समितीच्या बैठकांसाठीच नव्हे, तर विविध विभागीय आढावा बैठकांपासून ते लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण चर्चांसाठी…

Read More

गोकुळ गीते मुंबईकडे रवाना शिवसेना प्रवेश सोहळ्याची जोरदार तयारी साईमत /नाशिक/ प्रतिनिधी  : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल सोमवारी सकाळी जाहीर झाले असून, महायुतीने जळगावसह बहुतांश जागांवर जोरदार यश मिळवले आहे. मात्र नाशिकमध्ये महायुतीचे आणि शिवसेना (शिंदे गट) चे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना धक्का देत बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी झाले आहेत. या अनपेक्षित निकालानंतर आता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडत असून गीते यांच्या शिवसेना प्रवेशाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विजयी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत…

Read More