Author: Saimat

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी बाहेरपुऱ्यातील रस्त्यासाठी व मूलभूत सुविधा तसेच शासकीय योजना व शासकीय मोहिम याचा नागरिकांना लाभ मिळावा अशा विविध विषयांवर  नागरिकांना न्याय देण्यासाठी सायंदैनिक साईमतने काल विशेष  वृत्ताव्दारे प्रकाशझोत टाकला तसेच साईमत समाचारचे संपादक गणेश शिंदे यांनी सोशल मीडियावर प्रशासनाला धारेवर धरून रस्त्यावर मुरूम टाकण्यास भाग पाडले असून आज सकाळपासून रस्त्याच्या खड्ड्यावर मुरूम टाकण्याची मोहिम नगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे.या मोहिमेमुळे बाहेरपुरा रहिवाशांच्या मागणीला यश आले आहे. शहरातील बाहेरपुरा भागातील नागरिक गटारी व खराब रस्त्यामुळे खूप वैतागले आहे.या भागातील नगरसेवकांनीसुद्धा गेल्या पाच वर्षात गटारी आणि रस्त्याचे काम करू शकले नाही, याबाबत नागरिक खंत व्यक्त करीत होते.शहरातील बाहेरपुरा भागात…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अलीकडच्या सत्तांतरानंतर ठाणे जिल्ह्यातून बुलेट ट्रेन (Bullet Train)प्रकल्पाला गती मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यासाठी वापरला जाणारा निधी मुंबईच्या लोकल ट्रेनसाठी(Local Train) वापरला जावा अशी मागणी मोदी सरकारकडे केलीय. गुरुवारी मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी आधी मुंबईची लाइफ लाइन असणाऱ्या लोकल ट्रेनसाठी केंद्राने निधी द्यावा अशी मी केंद्र सरकारकडे विनंती करते, असं म्हणत अप्रत्यक्षपणे बुलेट ट्रेनला विरोध केलाय. “बुलेट ट्रेनची मागणी कोणीही करत नाहीय. त्याऐवजी जे (मुंबईकर) मागतायत त्याला आधी निधी द्यावा. घाटकोपर आणि संपूर्ण भागातील रेल्वे, तिथलं शौचालये यासारख्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत. मुंबईची…

Read More

नागपूर : प्रतिनिधी राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर महविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) कोसळले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत (BJP) नवीन सरकार स्थापन केले. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. यापार्श्वभूमीवर शिवसेनेला पुन्हा उभी करण्यासाठी शिवसेनेचे नेते विविध भागात शिवसंपर्क अभिनयान राबवित आहेत. यानिमित्ताने शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नागरपुरात दखल झाले. याचबरोबर राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे ही आज नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) बालेकिल्लत आपआपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अ‌ॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसते नागपूर दौऱ्यानिमित्त शरद पवार आणि संजय राऊत यांची भेट होण्याची शक्यता…

Read More

साईमत लाईव्ह  कजगाव ता भडगाव प्रतिनिधी  कजगाव ता भडगाव गेल्या अडीच वर्षापासून बंद असलेला हुतात्मा एक्सप्रेस दिनांक दहा पासून सुरुवात झाली होती मात्र कजगाव येथे हुतात्मा एक्सप्रेस ला थांबा रद्द करण्यात आल्याने प्रवासी व गावकऱ्यांमध्ये निराशा व्यक्त होत होती , खासदार उमेश दादा पाटील यांच्याकडे मागणी केल्याने. खासदार उमेश दादा पाटील यांनी थेट रेल्वेमंत्री यांच्याकडे तातडीने हा थांबा सुरू करावा यासाठी पाठपुरावा केला हुतात्मा एक्सप्रेस ला थांबा देण्यात आल्याने ग्रामस्थांकडून हुतात्मा एक्सप्रेसचे जोरदार स्वागत करण्यात आले, याप्रसंगी प्रवासांनी खासदार उमेश दादा पाटील यांचे आभार मानले यावेळी गाडी चालकाचा सत्कार कजगाव पंचक्रोशीच्या वतीने करण्यात आला, यावेळी भाजप शहराध्यक्ष रवींद्र पाटील,…

Read More

मुंबई : प्रतिनिधी मुंबईत गुरूवारी मध्यरात्री औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पक्षाचा मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना काही मिळाले नाही. शिवसैनिकांचे एकही काम झाले नाही असा घणाघात लगावला आहे. दुसऱ्या पक्षाची कामे झाले, तिसऱ्याचा पक्ष वाढला… आम्ही गेलो 4 नंबरवर असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव् ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेनेला वाचविण्यासाठी हा उठाव केला असून पक्षांचे खच्चीकरण करण्याची सुपारी कुणी घेतली आहे. असे म्हणत त्यांनी संजय राऊतांवर तोफ डागली आहे. तर आमचा शिवसैनिकांचे कामे तर झाली नाही मात्र त्यांच्यावर खोटे…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : राज्यातील निवडणुकांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांना स्थिगिती दिली आहे. तसेच या निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम लवकर जाहीर करण्यात येईल असंही निवडणूक आयोगाने  स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीनंतर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. काय म्हटलं आहे निवडणूक आयोगाने? राज्य निवडणूक आयोगाचे दि. ०८ जुलै २०२२ रोजीच्या पत्रान्वये १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२२ दिला होता. मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्रमांक १९७५६/२०२१ ची सुनावणी दि. १२…

Read More

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी येथील जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून तालुक्यात विधवा प्रथेविरुद्ध कार्याचा कालपासून प्रारंभ झाला असून मराठा महासंघप्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक वसुंधरा दशरथ लांडगे व जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तालुक्यातील शिरुड येथील जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका रत्नाताई भदाणे या दोघींच्या प्रमुख पुढाकाराने या स्तुत्य उपक्रमाला यश आले. याबाबतची हकीकत अशी की, काल दिनांक 13 जुलै बुधवारी  हेडावे ता. अमळनेर येथे सामाजिक कार्यकर्ते डॉ. दंगल झाल्टे यांचे निधन झाले. वसुंधरा लांडगे यांना रत्नाताई भदाणे यांचा फोन आला. हेडावे येथे जाऊन त्यांच्या भाऊबंदांशी व त्यांच्या मुलींशी संवाद साधला व प्रबोधन केले.मयत डॉ.झाल्टे यांच्या सुविद्य पत्नी  भारतीताई झाल्टे यांनीही विचारांना मान्यता दिली.त्यांचा सौभाग्याचा…

Read More

साईमत लाईव्ह पाडळसरे ता. अमळनेर : ज्यांच्यामुळे आपणास हे जीवन व जग दिसले व मानवंदेह मिळाला त्या प्रथम गुरु आई वडिलांना आजच नाही तर दररोज वंदन करा कारण गुरू + पूर्ण+ माँ हे त्रिसूत्रीचे एकत्रितपणे गुरुपौर्णिमा साध्य होते,म्हणून सर्व प्रथम माँ ही पूर्ण गुरु आहे त्यानंतर गुरु हेच पूर्ण माँ आहे असे प्रतिपादन कपिलेश्वर मंदिराचे मठाधिपती महामंडलेश्वर हंसानंद महाराज यांनी कपिलेश्वर मंदिर स्थळी तापी व पांझरा संगमस्थळी गुरुपौर्णिमा निमित्त भक्तांना गुरू महिमा सांगतांना विशद केले. पाडळसरे येथून जवळच असलेले तापी व पांझरा व गुप्त गंगा नदीच्या संगमावरील दक्षिण तिरावरील  एक हजार वर्षांपूर्वीचा इतिहास लाभलेले खान्देशातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र कपिलेश्वर…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  राज्यात शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केले. या घडामोडीनंतर शिवसेना पुन्हा उभी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अ‌ॅक्शन मोडवर आले आहे. ठाकरे यांच्या नेतृत्वात आज शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला सर्व जिल्हा प्रमुखांनी हजेरी लावली होती. आम्हाला पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या रुपातच मुख्यमंत्री बघायला आवडेल, असा सूर या बैठकीत उमटल्याची माहिती रायगड उपजिल्हाप्रमुख अवचित राऊत यांनी दिली. शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट पडल्याचे दिसत आहे.अद्यापही शिवसेनेत गळती सुरूच आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार, जिल्हाप्रमुख अशा पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाकाच लावला आहे.…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  आज मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची(Uddhav Thackeray) भेट घेणार नाहीत. मात्र शिवसेनेचे खासदार मुर्मू यांची भेट घेणार असल्याची मोठी माहिती भाजप नेते सी टी रवी यांनी दिली आहे. या नव्या राजकीय डावाने निश्चितच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची धाकधूक वाढली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मी यांचं आज मुंबईत आगमन झालं आहे. आदिवासी समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. मात्र आज मुंबईतील दौऱ्यात द्रौपदी मुर्मू या उद्धव ठाकरेंची भेट घेणार नाहीत, असे स्पष्टीकरण सी टी रवी यांनी दिले. याउलट शिवसेनेचे खासदार मुर्मू यांची भेट…

Read More