Author: Saimat

मुंबई : प्रतिनिधी  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेतील ४० आमदारांनी केलेल्या बंदमुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. तसेच शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंगही सुरू झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर शिवसेनेचे अस्तिव टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेतील शिवसेनेचे बहुतांश माजी नगरसेवक शिंदेगटात दाखल झाल्यानंतर आता मुंबई लगतच्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील तब्बल १८ नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी काही वेळातच शिंदे गटात सहभागी होणार आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर हे १८ नगरसेवक, शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होतील. मीरा भाईंदर शहरात…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मूळचे साताऱ्याचे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या गावात दोन हेलिपॅड बनवले. (Helipad in CM’s village)परंतु शाळकरी मुलांना कोयना धरणातून जीवघेणा प्रवास करत अनेक अडचणींवर मात देऊन शाळेत जावे लागते. त्यासाठी रस्त्याचे काम करायला पाहिजे, असे उच्च न्यायालयाने (High Court)गुरुवारी (१४ जुलै) म्हटले. सातारा जिल्ह्यातील खिरवंडी गावातील मुलींचा शिक्षणासाठी सुरु असलेला जीवघेणा प्रवास थांबवावा , शाळकरी मुलांना शिक्षण पूर्ण करता यावे. मुलांना कोणत्याही अडचणींविना शाळा किंवा महाविद्यालयात जाता यावे. यासाठी रस्ते व्यवस्थित बनवायला हवेत हीच आमची अपेक्षा आहे, असे न्यायालयाने म्हटले आणि तुरंत समस्येवर तोडगा काढण्याचे आदेश दिले. मुख्य सचिवांनी संबंधित विभागाच्या सचिवांशी बैठक घेतली. बैठकीनंतर मुख्य सचिव…

Read More

साकेगाव ता. भुसावळ : प्रतिनिधी  राष्ट्रीय महामार्ग सहालगत असलेल्या सर्विस रोडवर नुकत्याच एमआयडीसीच्या जलवाहिनीचे काम करण्यात आले होते. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होऊन रस्त्यावर वाहन चालवणे जिकरिचे झाले होते, सदर घटनेची दखल घेत साईमतने वृत्त प्रकाशीत केले होते, या वृत्ताची दखल घेत एमआयडीसी प्रशासनाने रस्त्यावरील चिखल बाजूला करण्यात आला. याबाबत माहीती अशी की, राष्ट्रीय महामार्ग सहालगत असलेल्या सर्विस रोडवर नुकत्याच एमआयडीसीच्या जलवाहिनीचे काम करण्यात आले होते. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होऊन रस्त्यावर वाहन चालवणे जिकरिचे झाले होते. याबाबत साईमत दखल घेत  वृत्त प्रकाशित केले होते. सदर प्रकाशीत होताच  एमआयडीसी प्रशासनाला खळबळून जाग आली. या वृत्ताची घेऊन महामार्ग सर्विस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील डांबरी रस्त्यांची होणारी दुर्दशा पाहता आमदार राजुमामा भोळे यांच्या मागणीप्रमाणे रिंगरोड व गणेश कॉलनी परिसरातील पाच रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान, सदर निधी बाबत  आ.राजुमामा भोळे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. आ.राजुमामा भोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे शहरातील रस्ता काँक्रिटीकरणासाठी नगरविकास विभागातर्फे पाच कोटींच्या निधीची मागणी केली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने शहरातील रिंगरोड, गणेश कॉलनी, एसएमआयटी आणि अयोध्यानगर भागातील रस्त्यांच्या कामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे आ.राजुमामा भोळे यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांचे आभार मानले आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांची अमोल जावळे यांनी मुंबई येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. गिरीशभाऊ महाजन यांच्या सोबत सदिच्छा भेट घेतली. युती सरकारच्या काळात कृषी मित्र स्व.हरिभाऊ जावळे यांच्या मागणीची दाखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीच्या माध्यमातून शेळगाव प्रकल्प आता पूर्णत्वाकडे आहे. स्व.हरिभाऊंचे स्वप्न असलेला हा प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल अमोल जावळेंनी या भेटीत त्यांच्या प्रती कृतज्ञता आणि धन्यवाद व्यक्त केले. तसेच यावल – रावेर तालुक्यास वरदान ठरणार्‍या मेगा रिचार्ज प्रक्ल्पास गती द्यावी यासाठी घातले…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी बंडखोरी करत शिवसेनेत  मोठी फूट पाडली आहे. अद्यापही शिवसेनेत मोठी गळती सुरु आहे. यापार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आपले खरे गुरू आहेत. त्यांच्या विचारच्या प्रेरणेने आपण वाटचाल करीत आहोत. त्यामुळे आम्ही शिवसेनेत फूट पाडली, असे कोणी म्हणत असेल, तर ते चुकीचे आहे. आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊनच पुढील कार्य करीत आहोत, असे वक्तव्य पाटील यांनी केले. गुरुपौर्णिमेनिमित्त काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे गुलाबराव पाटील नतमस्तक झाले.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे खरे दैवत आहेत. त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत…

Read More

साईमत लाईव्ह फैजपूर प्रतिनिधी परमेश्वर हा परमेश्वरच आहे. आपण गुरूंच्या आहारी एवढे जाऊ नका की परमेश्वरचा विसर पडेल. विवेक पूर्ण जीवन जगण्यासाठी आत्मचिंतन करणे म्हणजे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करणे आहे असा मौलिक संदेश सतपंथ संस्थानचे गादिपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आशीर्वचन देताना सांगितले. मी आणि माझे इष्ट एकच आहे हा भाव म्हणजे गुरुभक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. संसारिक जीवनात आपण जे काही काम कराल ते मनापासून करा. गुरु गीता ही मा पार्वतीने भगवान शंकरांना विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा सार आहे. संसारिक जीवनात पती-पत्नीच्या संवादातून वाद न होता गुरुगीते सारखे अमृत निर्माण होणे आवश्यक आहे. गुरु गीता ही गुरु शिष्याचे संबंध,…

Read More

साईमत लाईव्ह जामनेर,प्रतिनिधी  जामनेर (Jamner) तालुक्यातील पहुर विभागातील जिल्हा परिषद शाळेचे केंद्र प्रमुख भानुदास तायडे यांच्या वादग्रस्त भुमिके वरून पहुर येथील जिल्हा परिषद शाळेतल्या ४२ शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी गट शिक्षण अधिकारी रामकृष्ण लोहार  पं.स.जामनेर यांच्या कडे दि.१७ जुन २०२२ रोजी ४२ शिक्षकांचे स्वाक्षरी असलेले तक्रार अर्ज दिला होता. त्यात शिक्षकांच्या मांगण्या होत्या कि पहुर जिल्हा परिषद शाळेतल्या केंद्र प्रमुख भानुदास रामशंकर तायडे यांची तात्काळ बदली करावी अन्यथा पहुर केंद्रातील आम्ही सर्व ४२ शिक्षकांची तात्काळ बदली करावी.  कारण या आधी मागील सहा महिन्यापुर्वी दि.१६ जानेवारी २०२२ रोजी गट शिक्षण अधिकारी पं.स.जामनेर आणि १४ मार्च २०२२ रोजी शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शिवाजी नगरातील मुख्य रस्त्यावर रस्त्यांपेक्षा खड्डेजास्त झाल्याने पावसाळ्याच्या पाण्यामुळे हे खड्डे पूर्णपणे पाण्याने भरुन जात असल्याने येथून जाणारे येणारे नागरिक याठिकाणी खड्ड्यात पडत आहे. त्यामुळे आज सकाळी 10 वाजेपासून छत्रपती शिवाजी नगर मित्र मंडळाने येथील रस्त्यावर ठिय्या देवून प्रशासनाला बोलविण्याची विनंती पोलिस अधिकाऱ्यांनी केली. या परिसरातील खड्ड्याबाबत छत्रपती शिवाजी नगरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी महानगरपालिका प्रशासन व खा.उन्मेशदादा पाटील, आ.राजुमामा भोळे तर स्थानिक नगरसेवकांनाही निवेदने देवून पाठपुरावा केला परंतु कुठलीही याठिकाणी उपाययोजना होत नाही तर फक्त आश्वासन येथील नागरिकांना भेटत असल्याचाही आरोप येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी केला आहे. सकाळी 10 वाजेपासून हे आंदोलन नागरिकांनी सुरु केले होते.…

Read More