शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांची कामे नाही ; मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका

0
37

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईत गुरूवारी मध्यरात्री औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पक्षाचा मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना काही मिळाले नाही. शिवसैनिकांचे एकही काम झाले नाही असा घणाघात लगावला आहे. दुसऱ्या पक्षाची कामे झाले, तिसऱ्याचा पक्ष वाढला… आम्ही गेलो 4 नंबरवर असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव् ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेला वाचविण्यासाठी हा उठाव केला असून पक्षांचे खच्चीकरण करण्याची सुपारी कुणी घेतली आहे. असे म्हणत त्यांनी संजय राऊतांवर तोफ डागली आहे. तर आमचा शिवसैनिकांचे कामे तर झाली नाही मात्र त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत त्यांना संपविण्याचे प्रयत्न सुरू होते. यासाठी आम्ही उठवा केल्याचे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले.

यावेळी संजय शिरसाट मुंबईत काय करतात असे मी त्यांना विचारले होते, मात्र ते म्हणाले की माझा मतदारसंघ एकदम ओके आहे. असे आजच्या मेळाव्यातून जानवतंय की सगळे ओके वाटतंय…असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिरसाट यांचे कौतुक केले आहे.

आजचा मेळावा ऐतिहासिक

आमदार संजय शिरसाट यांचा मुंबईत मध्यरात्री मेळावा आहे, असे वाटत नाही. सर्वांच्या चेहऱ्यावर तेज आहे, असे म्हणत असा मेळावा कधी झाला नाही ही ऐतिहासिक घटना आहे आणि आम्ही केलेल्या घडामोडीही ऐतिहासिक आहेत. त्यांची 33 देशांनी दखल घेतली असून केवळ एकनाथ शिंदे आणि 50 आमदार हेच टिव्हीवर दाखवले जात होते. मात्र संख्या गुवाहटीमधून वाढवायला नको मुंबईत जात संख्या वाढवू असे ठरवले आणि मुंबईत आलो असे वक्तव्य मुख्यूमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे.

अस्तित्व धोक्यात आल्याने माझ्यासोबत

आमदारांचे अस्तित्व धोक्यात असल्याने सर्व आमदार माझ्यासह गुवाहटीला आले होते. मात्र इकडे काही जण सांगत होते की मी आमदारांना बळजबरीने तिकडे डांबून ठेवले आहे. मी अनेकदा विचारले कुणाला जबरदस्तीने डांबून ठेवले आहे सांगा पाठवून देतो मात्र त्यांच्याकडून नावे सांगण्यात आली नाही, असा अप्रत्यक्ष टोला एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना लगावला आहे.

संजय शिरसाट आघाडीवर

आम्ही केलेल्या उठवासाठी आमदार संजय शिरसाट यांनी आघाडी घेतली होती. संजय शिरसाट नेहमी विचारायचे की कधी करणार कधी करणार मात्र मी त्यांना सांगितेले की, काही गोष्टी करायला काळ वेळ असते असे म्हणत आम्ही शिवसेना – भाजप युतीसाठी अनेक प्रयत्न केले. ज्या युतीत आम्ही निवडणूक लढलो, मात्र आम्ही जे केले ते अडीच वर्षांपूर्वी करायला हवे होते. मात्र लोकांनी सांगितले ते कुणी ऐकले नाही.

राष्ट्रवादी शिवसेना संपवत होती

सोबत असणाऱ्यांनी शिवसेनेनचे उमेदवार संपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. जिथे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहे, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या उमेदवारांची घोषणा होत होती. त्यांच्या पराभूत उमेदवारांना बळ देण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू होते. आमदारांना मतदारांना तोड द्यायचे असते, त्यासाठी निधी देणार कसा असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here