मुक्ताईनगर :प्रतिनिधी वर्षावास बौद्ध बांधवांचा पवित्र असं पर्व असून या पर्वामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्धा आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे सर्वांनी या वर्षावासाच्या कालावधीत वाचन करून अंगीकृत करावे , सोबतच भगवान बुद्धांनी सांगितलेल्या तत्त्वांचे पालन करावे असे आवाहन केंद्रीय शिक्षक प्रा. डॉ. संजीव साळवे यांनी मुक्ताईनगर येथे केले त्यासोबतच त्यांनी बौद्धांच्या उपोसत विषयी मार्गदर्शन केले. मुक्ताईनगर शहरातील श्री कॉलनी व गोदावरी कॉलनीमध्ये नियोजित बुद्ध विहारा जवळ किशोर बोदडे यांच्या निवासस्थानी भारतीय बौद्ध महासभा तथा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका शाखेच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे पहिले पुष्प नुकतेच गुंफण्यात आले. सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
Author: Saimat
फैजपूर: प्रतिनिधी सनातन सतपंथ संप्रदाय व वैदिक धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांचे दि. १७ जुलै २२ रोजी मुंबई येथून अमेरिकेला प्रयाण झाले. सतपंथ समुदायात पारिवारिक सलोखा, धार्मिक संस्कार, रूढी परंपरा वृध्दींगत होण्यासाठी अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यात भारतातील सतपंथ समुदायातील मोठ्या संख्येने स्थायिक असलेले अनुयायी गेल्या चार वर्षांपासून जनार्दन हरीजी महाराज यांचे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित करीत असतात. त्याचा लाभ परिवारातील लहान थोरांसह सर्वांना मोठ्या संख्येने होत असतो. यावर्षी तीस दिवसांच्या दौऱ्यात अनुक्रमे दि. १८ जुलै ते २१ जुलै २२ रोजी शिकागो, दि. २२ ते २४…
मुंबई : प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अद्याप काही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्हे, तालुका आणि महानगरपालिकांमधील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी वेगाने शिंदे गटात दाखल होत आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेकडूनही (Shivsena) आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील होणाऱ्या बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून तातडीने नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, आता कोकणात नव्याने नेमणूक झालेल्या पदाधिकाऱ्यांनीही अवघ्या काही तासांत राजीनामे दिल्याचा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेकडून रत्नागिरीतील आमदार उदय सामंत यांच्या समर्थकांची हकालपट्टी करण्यात आली होती. उदय…
यावल : प्रतिनिधी यावल तालुक्यातील आमोदा येथे पशुधन पर्यवेक्षक हे कार्यालयीन वेळेत हजर राहत नसल्याने तसेच जळगाव येथून 50 किलोमीटर अंतरावरून अपडाऊन करीत असल्याने मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रातील म्हणजे आमोदा,बामणोद, म्हैसवाडी,विरोदा परिसरातील एकूण 23 हजार पशुधनाची देखभाल औषधोपचार वेळेवर होत नसल्याने पशु पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.पशुधन पर्यवेक्षक हे पशुपालकांना आणि शेतकऱ्यांना आपल्या पशुंबाबत पाळीव प्राण्यां बाबत योग्य तो सल्ला आणि मार्गदर्शन,औषधोपचार नेमका कोणत्या दिवशी व कुठे करतात? याबाबत सुद्धा अनेक प्रश्न आमोदा परिसरात उपस्थित केले जात आहेत,पशुवैद्यकीय दवाखान्यातील कंपाउंडर पशुपालकांना आश्वासन देत असतो की पशुधन पर्यवेक्षक येत आहेत ते या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आहेत…
साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी पोलिस म्हटले की,खाकी वर्दीतील तापट स्वभावाचा,कडक शब्दात बोलणारा,हेकेखोरअसंवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असते.त्यामुळे अनेकजण पोलिसांपुढे जाण्यास घाबरतात. पोलिस म्हटले की,इतका धाक हवाच. पोलिसांना कर्त्यव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागते.असे असले, तरी या वर्दीतही मनुष्य असतो, त्यालाही मन,भावना असतात. ड्युटीसाठी कठोर बनलेला हा वर्दीतील माणूस वेळप्रसंगी मनाने तितकाच मृदू होतो.असाच काहीसा अनुभवला गेलाय. घराघरात श्रद्धेने जपली जाणारी आषाढी एकादशी व मुस्लीम धर्मात कर्तव्य म्हणून साजरी होणारी बकरी ईद रविवार दिनांक १० जुलै रोजी एकाच दिवशी आल्याने एकमेकांच्या श्रद्धेचा आदर बाळगत चांदोरी व परिसरात शांततेत साजरे केले गेले. सायखेडा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी पिण्याच्या पाण्यातून शरीरात क्षारांचे प्रमाण वाढल्याने पोटांचे विकार आणि किडनीच्या विकारांचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असल्याचा प्रकार गुरुवारी कवली ता.सोयगाव गावात आढळून आला त्यामुळे गावातील तब्बल १५ ते २० रुग्ण पोटांच्या विकाराने त्रस्त असल्याची माहिती हाती आली आहे.या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली आहे. या किडनीच्या विकारांच्या बाधेने कवली गावात आतापर्यंत २५ रुग्णांचा मृत्यू झालेला असल्याचे खळबळजनक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. कवली ता.सोयगाव येथील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विहिरीत क्षारांचे मोठे प्रमाण वाढल्याचे उघड झाले असून यामुळे पोटांच्या विकाराचे रुग्ण गावात वाढले असून काहींना किडनीच्या विकाराची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. किडनीच्या विकारांच्या रुग्णांवर पाचोरा जि.जळगाव येथील…
मुंबई : प्रतिनिधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीमुळे सत्तांतर झाले आहे. त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना अनपेक्षित धक्का देत देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार (Devendra Fadnavis Govt) स्थापन केले. त्यानंतर शिवसेनेत मोठ्याप्रमाणात आउटगोइंग सुरू झाली आहे. शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आणि नेते एकनाथ शिंदे गटात सामील होताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेतील होणारी गळती रोखण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर उभे ठाकले आहे. मात्र आता त्यांनी पक्ष संघटनेत नवी उभारी देण्याचा मोठा प्लॅन आखला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष…
साईमत लाईव्ह फैजपूर ता यावल प्रतिनिधी येथील गणेश कॉलोनी तील रहिवाशी उत्कर्षा मनोजकुमार चौधरी ही नुकत्याच झालेल्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. तीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. भुसावळ येथील जवाहर नवोदय विद्यालयात पुढील शिक्षणासाठी नुकतीच प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेत उत्कर्षा चौधरी हिने चांगले गुण संपादन करत यश मिळविले आहे. तिच्या या यशासाठी ज्ञानदिपु शैक्षणिक स्पर्धा परीक्षा क्लासेसचे प्रा. संजय सातपुते यांचे, गोदावरी इंग्लिश मेडियम स्कूलच्या शिक्षिका मीनल कुमार यांचे मार्गदशन लाभले. मुळचे खिरोदा येथील उपकार्यकारी अभियंता मनोजकुमार पंडित चौधरी यांची सुकन्या आहे. उत्कर्षाने मिळविलेल्या यशाबद्दल तीचे आ. एकनाथराव खडसे, आ. शिरिष चौधरी, खा.…
मुंबई : प्रतिनिधी जून महिन्यात घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)यांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्रिपदाची ३० जून रोजी शपथ घेतली. शपथविधी होऊन तीन आठवडे झाले. मात्र, शिंदे सरकार यांचा मंत्रिमंडळ विस्तार ठरला नव्हता. मंत्रिपदावरून शिंदे गट आणि भाजप (BJP) यांच्यात एकजुट नसल्यामुळे राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला होता. शिंदे गटात सात माजी मंत्री आहेत. त्यांची नियुक्ती मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये होईल, अशी चर्चा सुरु आहे. शिंदे यांच्या गटात मंत्रिपदाच्या मागणीसाठी बंडखोर आमदारांची नाराजी दिसून आली. राष्ट्रपती निवडणूक होण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाला. तर मंत्रिपद न मिळालेल्यांची नाराजी व्यक्त होऊ शकते, याची भीती…