Author: Saimat

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील श्री. स.भु. प्रशाला येथे दिनांक-१३/७/२०२२ बुधवार रोजी शालेय समिती नवनियुक्त सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष आदरणीय डॉ.योगेशदादा इंगळे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते.प्रमुख पाहुणे सुधाकर नाना महालपुरे होते.प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य आदरणीय पी.जी.बोराडेसर, उपमुख्याध्यापक आर. एस.माळीसर,पर्यवेक्षक एस.जी.गायकवाड सर उपस्थित होते.नवनिर्वाचित सदस्य भागवत विष्णू महालपुरे,शरद बबन निकम,आबाराव भिकन चौधरी,किशोर नंथू पाटील निंभोरा या सर्व नवनियुक्त सदस्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.योगेश दादा इंगळे व मुख्याध्यापक बोराडे सर यांनी शाल व श्रीफळ देऊ केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आदरणीय मुख्याध्यापक पी.जी.बोराडे यांनी सर्वशाखा सदस्यांचा शाळेच्या विकासासाठी,प्रगतीसाठी निश्चित उपयोग होईल. असे मत व्यक्त केले.व…

Read More

 कजगाव   :  प्रतिनिधी महाराष्ट्र टीचर असोसिएशन च्या संस्थापक तथा राज्याध्यक्ष सौ शुभांगी पाटील यांनी  कजगाव येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान कजगाव येथील ब ज हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला भेट देत तेथील शिक्षकांची संवाद साधत व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच गावातील पत्रकार यांच्याशी संवाद साधला व जवळ असलेल्या श्री क्षेत्र कनाशी या ठिकाणी गुरुपौर्णिमा निमित्त जाऊन दर्शन घेतले. सौ शुभांगी पाटील हे कजगाव येथून जवळच असलेल्या सार्वे बुद्रुक तालुका पाचोरा येथील माहेर असल्याने परिसरात परिचित आहेत. विद्यालयातर्फे त्यांचा सत्कार शाळेच्या शिक्षिका सो शुभांगी पाटील यांनी केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक-श्री एम के पवार, नितीन पाटील, केदार सर, बी…

Read More

मुंबई :प्रतिनिधी  पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचा मोठा गट शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. खासदार, आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात सहभागी झाले आहेत. हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. पालघर जिल्ह्यात शिवसेनेत मोठी फूट पडली असून खासदार आमदारांसह जिल्हाप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश नगरसेवक ,जिल्हापरिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य शिंदे गटात सामील झाले आहेत. खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा,जिल्हाप्रमुख राजेश शहा, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांच्यासह जिल्ह्यातील काही नगर पंचायतीचे नगरसेवक, पंचायत समिती सभापती, सदस्य आणि प्रमुख कार्यकर्त शिंदे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  महाराष्ट्र आणि गुजरातला गेल्या दोन आठवड्यात पावसाने झोडपून काढलं होतं. पण आता वरुणराजा विश्रांती घेणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरामध्ये पुढच्या ३-४ दिवसामंध्ये पावसाचा जोर कमी होईल पण देशातल्या इतर ५ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमध्ये येत्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. उत्तर प्रदेशातही या काळात काही ठिकाणी पाऊस पडेल. IMD ने हिमाचलमध्ये १६ जुलैला, राजस्थानमध्ये १७ जुलैला, पंजाब आणि हरियाणामध्ये १९ पर्यंत, उत्तराखंडमध्ये १६ आणि १७ जुलैला मुसळधार पावसाचा…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल मी चुकीचे शब्द वापले नाहीत. शिवसेनेत ज्या काही घडामोडी घडल्या त्यासंदर्भात मी भाष्य केले. ०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यानी भाजपला (BJP) बिनशर्त पाठिंबा दिल्याने शिवसेनेची ताकद कमी झाली, असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले होते. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली. यावर केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले. शरद पवार महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर आहे. त्यांच्याबद्दल एखादा शब्द निघाला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असं दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले. आजपर्यंत पवारांच्या विरोधात कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही. ते मला गुरुसमान…

Read More

मुंबईः प्रतिनिधी शिंदे सरकार(Shinde Govt) अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी ‘शिवतीर्थ’ (Shivatirtha)येथे भेट घेऊन चर्चा केली. आता संपूर्ण राज्याला मंत्रिमंडळ विस्ताराची अपेक्षा आहे. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी फडणवीस यांनी ठाकरे यांची भेट घेतली. शिंदे गटातील आमदारांना कोणती खाती मिळतात, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण आहे. या भेटीत नेमकं काय बोलणे झाले, हे मात्र स्पष्ट झाले नाही. मनसेचे आमदार राजू पाटील यांना भाजपाकडून मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच मुद्द्यावर बोलण्यासाठी फडणवीस राज ठाकरे यांना भेटणार…

Read More

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे आणि डॉ.सच्चिदानंद जोशी यांनी संपादित केलेले कनेक्शन थ्रु कल्चर ॲन ओव्हरव्हूय ऑफ इंडियाज सॉफ्ट पॉवर स्ट्रेन्थ या पुस्तकाचा नुकताच नवी दिल्ली येथे विमोचन सोहळा थाटात पार पडला. नवी दिल्ली येथील सुषमा स्वराज भवन, चाणक्य पुरी येथे बुधवार, दि.13 जुलै 2022 रोजी अनावरण सोहळा आयोजित केला होता. याचे विशेष पुस्तक विमोचन सोहळा केरळचे महामहिम राज्यपाल असिफ मोहम्मद खान यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भारताचे विदेश मंत्री डॉ.एस.जयशंकर हे उपस्थित होते. नवी दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमास केंद्र सरकार मधील अनेक मंत्री, खासदार, ज्येष्ठ पत्रकार आणि अनेक बुध्दीजीवी उपस्थित…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गुरूपैर्णिमेनिमित्त महर्षि शृंग ऋषि बहुउद्देशीय संस्था, आयोजक जळगाव सिखवाल समाज व रेड पल्स ब्लड बँक यांच्या संयुकत विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मॉर्डन गल्स हायस्कूल येथे करण्यात आले. समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात आले. समाजाच्या वतीने शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बाला पंडित, सत्तू तिवारी, अजय पुरोहित, कैलाश पांडे,कैलाश व्यास, किशन तिवारी, सुनिल पांडे, संतोष पुरोहित, गोपाल पांडे, गणेश व्यास आदींनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन पार पाडण्यासाठी संस्थेच्यावतीने श्‍्याम जोशी, गोपाल पंडीत, मनीष ओझा, राजेश तिवारी, महेंद्र पुरोहित, प्रेम जोशी, गोपाल तिवारी, ऋषिकेश जोशी, उत्तम जोशी, मयूर जोशी, नारायण तिवारी,संस्थेचे अध्यक्ष प्रकाश…

Read More

जळगाव ः प्रतिनिधी पोलिस अधीक्षकांचे शासकीय निवासस्थान ‘अभय’ येथे गुरुवारी डॉ. प्रवीण मुंढे यांची कन्या देवयानीचा वाढदिवस वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमात स्थानिक जैवविविधता जपणाऱ्या देशी झाडांच्या 120 रोपांची लागवड करण्यात आली. जैन इरिगेशन सिस्टिम लिच्या सहकार्यातून गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे हरित जळगाव ही संकल्पना घेऊन वृक्षारोपणाची चळवळ सुरू करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निवास परिसरात वृक्ष लागवड करून कन्या देवयानीचा वाढदिवस साजरा करत वृक्षलागवडीच्या चळवळीला प्रोत्साहन दिले. पोलिस अधीक्षक निवास परिसरात लिंब, पिंपळ, करंज, गुलमोहोर, बकुळ, जास्वंद, टिकोमा, पुत्रवंती, कन्हेर अशी 120 च्या वर रोपे लावली. सरासरी तीन वर्षे…

Read More