गुरुपौर्णिमे निमित्त महामंडलेश्वर हंसानंद महाराज यांनी सांगीतला गुरू महिमा

0
2

साईमत लाईव्ह पाडळसरे ता. अमळनेर :

ज्यांच्यामुळे आपणास हे जीवन व जग दिसले व मानवंदेह मिळाला त्या प्रथम गुरु आई वडिलांना आजच नाही तर दररोज वंदन करा कारण गुरू + पूर्ण+ माँ हे त्रिसूत्रीचे एकत्रितपणे गुरुपौर्णिमा साध्य होते,म्हणून सर्व प्रथम माँ ही पूर्ण गुरु आहे त्यानंतर गुरु हेच पूर्ण माँ आहे असे प्रतिपादन कपिलेश्वर मंदिराचे मठाधिपती महामंडलेश्वर हंसानंद महाराज यांनी कपिलेश्वर मंदिर स्थळी तापी व पांझरा संगमस्थळी गुरुपौर्णिमा निमित्त भक्तांना गुरू महिमा सांगतांना विशद केले.

पाडळसरे येथून जवळच असलेले तापी व पांझरा व गुप्त गंगा नदीच्या संगमावरील दक्षिण तिरावरील  एक हजार वर्षांपूर्वीचा इतिहास लाभलेले खान्देशातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र कपिलेश्वर येथील त्रिपींडी महादेव मंदिरस्थळी दोन वर्षे झाली बंद असलेल्या कार्यक्रम या वर्षी  हंसानंद महाराज भक्त परिवार कडून गुरू शिष्य मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यात गुरु महिमा विषयी हंसानंद महाराज यांनी भक्तांना   गुरू महिमा वर्णिला, गुरुपौर्णिमा निमित्ताने  सुर्यकण्या तापी माई व पांझरा नदीचे संगमस्थळी श्री क्षेत्र कपिलेश्वर येथे शिष्यगण भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी महामंडलेश्वर हंसानंद महाराज यांनी त्रिपिंडी कपिलेश्वर महादेवाचा संगमावरील तापी तीर्थाचा व बेलपत्राचा फुले वाहून अभिषेक करीत गणेश व मांगलिक पूजन करून प्रांत समयी तापी आरती करून सकाळी १० ते १२ दरम्यान गुरू भक्तांचा मेळावा झाला त्यात भाविकांना गुरू वाणी द्वारे गुरू महिमा वर्णन करतांना  सांगून  हिंदू धर्म ग्रंथात गुरु महती विशद केल्याचे सांगून आलेल्या भक्तांना खडीसाखर वाटून प्रसाद दिला. व सगळ्याना गुरुर् ब्रह्म,गुरुर् विष्णू, गुरुर् देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरूवे नमः म्हणून आशीर्वाद दिलेत , शिष्यांनी सपत्नीक महामंडलेश्वर हंसानंद महाराज यांचे पूजन करून गुरू प्रसाद घेतला.

खान्देशातील पुरातन काळापासूनचा इतिहास  असलेल्या या मंदिराची महिमा सर्वदूर असल्याने हंसानंद महाराज यांचा भक्त परिवार जळगाव, धुळे, नंदुरबारसह गुजरात, मध्यप्रदेश येथून भाविक गुरू आशीर्वाद, प्रसाद दर्शनासाठी जमलेला होता.  दरवर्षी या ठिकाणी गुरुपौर्णिमा निमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. हंसानंदजी महाराज यांनी या मंदिरावर दधीची ऋषींच्या नावे गुरुकुल वेद पाठशाळा सुरू केल्याने  येथे वेदासह धार्मिक होम हवन तर्पण विधी  इतर धार्मिक ध्यानाबरोबर संस्कार याची शिकवण महाराज विध्यार्थ्याना देत आहेत. परिसरात दिवसभर वेदमंत्रांचा उच्चार कानावर एकूण मन प्रसन्न होत असल्याचा भाविक बोलून दाखवितात  शेवटी गुरू प्रसादाचा भंडारा वाटप करून  गुरू आरती , तापी आरती करून सांगता झाली .
यशस्वीतेसाठी निम , मुडावद , म्हळसर , पढावद ,कळमसरे, पाडळसरे येथील ग्रामस्थ व  कपिलेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त मंडळ  परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here