नागपूर : प्रतिनिधी
राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर महविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) कोसळले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत (BJP) नवीन सरकार स्थापन केले. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. यापार्श्वभूमीवर शिवसेनेला पुन्हा उभी करण्यासाठी शिवसेनेचे नेते विविध भागात शिवसंपर्क अभिनयान राबवित आहेत.
यानिमित्ताने शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नागरपुरात दखल झाले. याचबरोबर राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे ही आज नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) बालेकिल्लत आपआपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसते नागपूर दौऱ्यानिमित्त शरद पवार आणि संजय राऊत यांची भेट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच पवार आणि राऊत दोघेही एकाच हॉटेलमध्ये राहणार असल्याची चर्चाही सुरु झाली आहे.
पवार हे आज अकरा वाजता नागपूर विमानतळावर पोहोचण्याची शक्यता आहे.त्यानंतर ते थेट हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे जाणार आहेत. पवार यांनी हॉटेलवर दोन तास खाजगी बैठकीसाठी वेळ राखून ठेवला आहे. यावेळेत राज्यातील राजकीय परिस्थितीवर संजय राऊत आणि शरद पवार या दोघांची बैठक होणार असल्याचे बोलले जात आहे.