साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी
कजगाव ता भडगाव गेल्या अडीच वर्षापासून बंद असलेला हुतात्मा एक्सप्रेस दिनांक दहा पासून सुरुवात झाली होती मात्र कजगाव येथे हुतात्मा एक्सप्रेस ला थांबा रद्द करण्यात आल्याने प्रवासी व गावकऱ्यांमध्ये निराशा व्यक्त होत होती , खासदार उमेश दादा पाटील यांच्याकडे मागणी केल्याने.
खासदार उमेश दादा पाटील यांनी थेट रेल्वेमंत्री यांच्याकडे तातडीने हा थांबा सुरू करावा यासाठी पाठपुरावा केला हुतात्मा एक्सप्रेस ला थांबा देण्यात आल्याने ग्रामस्थांकडून हुतात्मा एक्सप्रेसचे जोरदार स्वागत करण्यात आले, याप्रसंगी प्रवासांनी खासदार उमेश दादा पाटील यांचे आभार मानले यावेळी गाडी चालकाचा सत्कार कजगाव पंचक्रोशीच्या वतीने करण्यात आला, यावेळी भाजप शहराध्यक्ष रवींद्र पाटील, डॉ सुरेश पाटील , भूषण शिनकर , धैर्यशील पाटील , शफी मण्यार , नूर कलाम बागवान, नितीन सोनार , अमीन पिंजारी, अनिस मन्यार , राजू बागवान , खलील मनियार , नाना पाटील , असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते ,