Author: Saimat

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी पाचोरा  शहरातील बाहेरपुरा भागातील नागरिक गटारी व रस्त्यामुळे खूप वैतागले आहे.या भागातल्या नगरसेवकांनी सुद्धा गेल्या पाच वर्षात गटारी आणि रस्त्याचे काम करू शकले नाही.याची नागरिकांना खंत व्यक्त करावी वाटत आहे.पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागांत कामगार कल्याण केंद्रा पासून तर पंचमुखी हनुमान चौक व परधाडे रोड या भागात रस्त्यावर वाहन चालवणे मुस्किल होईल इतके मोठे खंडे पडलेले आहे. काही भागात गटारी सुद्धा बांधण्यात आलेल्या नाही. तसेच या भागात गटारी काढण्यासाठी १५-१५ दिवस नगरपालिकेचे कर्मचारी येत नाही.फवारणी मारणारे येत नाही. या मुळे डास मच्छर यांचे खुप मोठे प्रमाण वाढले आहे.नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे अनेकांच्या घरात कोण्ही ना कोण्ही आजारी…

Read More

यावल : प्रतिनिधी साईमत लाईव्ह  पहूर येथून औरंगाबादकडे जाताना महामार्गाची दयनीय अवस्था झालेली आहे याकडे संपूर्ण शासकीय यंत्रणेचे राजकीय नेत्यांचे विविध संघटनांचे समाजसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रवासी वाहनधारकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. भुसावळ जामनेर मार्गे तसेच जळगाव पहूर मार्गे औरंगाबाद जाताना पहूर गावाच्या पुढे अनेक ठिकाणी महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या महामार्गावर अनेक ठिकाणी दुचाकी चार चाकी वाहने चालविणे अशक्य आणि जिकरीचे झाले आहे. या महामार्गाचे सिमेंट काँक्रीटचे बांधकाम अत्यंत कासव गतीने सुरू आहे,महामार्गावरील प्रवासी वाहनधारक आणि इतर अवजड़ वाहतूकदारांच्या सुविधांकडे संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांचे दुर्लक्ष होत असून महामार्गावर एखाद्या वेळेस मोठी अप्रिय घटना घडण्याचे…

Read More

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील राजकीय नाट्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. सत्ता पालटल्यानंतर भाजपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांचे पुत्र अमित ठाकरे(Amit Thackeray) यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने मोठी खेळी खेळात एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पाडली. आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना भाजपने मंत्रिपदाची ऑफर देऊ केली आहे. अमित यांना मंत्री करण्याचा निर्णय हा शिवसेनेतील ठाकरे कुटुंबाचा प्रभाव कमी करण्याचा भाजपचा आणखी एक प्रयत्न असू शकतो.भाजपाने नुकतेच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले तर…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी प्रभाग क्रमांक 3 सह शहरवासीयांना त्रासदायक ठरत असणाऱ्या हॉटेल दयानंद ते खरजई नाका रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून होत होती. तसेच चाळीसगाव शहरात भुयारी गटार योजनेच्या कामामुळे काळी माती वर आल्याने अनेक प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झाली होती. नुकताच राज्यात सत्ता बदल झाल्याने शहरासाठी भरीव निधी आणण्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी प्रयत्न सुरु केले असून पहिल्या टप्प्यात लवकरच ५ कोटींच्या कामांना मंजुरी मिळणार आहे मात्र सातत्याने चाळीसगाव तालुक्यात सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांची तात्पुरती का होईना तातडीने दुरुस्ती आवश्यक होती. यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी पुढाकार घेतला असून स्वखर्चाने दयानंद ते खरजई नाका रस्त्यासह…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  राज्यात पावसाचा जोर आजही कायम पहायला मिळत आहे. त्यातच आता पुढील 48 तासांत राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात काही भागांत अतिवष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (14 जुलै 2022) राज्यातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे तर 12 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रेड अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे. 14 जुलैचं हवामान अंदाज रेड अलर्ट – पालघर, नाशिक, पुणे ऑरेंज अलर्ट – मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर यल्लो अलर्ट -…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक मध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली. यावेळी पहिलीच्या विद्यार्थ्यांनी ज्या शिक्षकांनी आपल्याला लळा लावला त्या शिक्षकांना गुरुवंदना म्हणून चरण स्पर्श केले .इयत्ता दुसरीच्या विद्यार्थी कौशल वाघमारे शिक्षकाची भूमिका  करून या  चिमुकल्या शिक्षकाकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला . नव्या सुर्वे  व पार्थ जगताप विद्यार्थिनीने  इंग्लिश मध्ये गुरुपौर्णिमेवर उत्कृष्ट भाषण केले. यावेळी वर्गात बलून विनर हा गेम घेण्यात आला जे विद्यार्थी बलून वर आपले स्वतःचे नाव लिहीतील  त्यांना बलून वाटप केले गेले. फुग्यांसोबत विद्यार्थ्यांनी फुगा रे फुग्या फुगशील  किती कविता आनंद घेतला. या उपक्रमाचे आयोजन नियोजन सुवर्णलता अडकमोल, सविता ठाकरे…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगांव येथील कै. बाबुरावजी काळे स्कुलमध्ये विद्यार्थ्यांनी केली शिक्षकासमवेत गुरुपौर्णिमा साजरी.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.रविंद्र जाधव सर हे होते या कार्यक्रमात इ.8 वी ते 10 चे विद्यार्थी प्राची पाटील धनश्री वाघ गुंजन पाटील भावेश गवळे दर्शन पाटील अथर्व मानकर सायली पाटील राजश्री मिसाळ आदिती पाटील किर्ती पाटील सोजल पवार आदी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली व शाळेतील शिक्षकांना पुप्षगुच्छ देऊन अभिवादन केले..यावेळी उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे सर यांनी विद्यार्थ्यांना वीर एकलव्य यांच्या बद्दल ची गोष्ट सांगुन शिष्याच्या मनात गुरुचे काय स्थान…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील गेंदालाल मिल परिसरात राहणार्‍या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, लग्नाचे आमिष दाखवून तसेच खोटी आश्‍वासने देवून दिशाभूल केल्यामुळे तिने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दोषी असलेला नराधम निलेश मंगलसिंग गायकवाड व त्याची आई लक्ष्मी मंगलसिंग गायकवाड यांना त्वरीत अटक करुन त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयत तरुणीचे काका विनोद रोहीदास जाधव यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पिडीत तरुणी कु. दिव्या दिलीप जाधव हिने गेल्या २४ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान निलेश गायकवाडच्या मानसिक व असह्य त्रासाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला वेळीच येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने…

Read More

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी : तालुक्यातील कोल्हाडी ते निमखेड रस्त्याचे काम मंजूर कामापेक्षा कमी झालेअसून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन कामाचा दर्जा सुधारावा व संबधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा याविरुध्द ९ ऑगस्ट क्रांतीदिनी याच रस्त्यावर उपोषणास बसणार असल्याचा रवींद्र बावस्कर यांनी इशारा दिला आहे. याबाबत माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंर्तगत कोल्हाडी ते निमखेड रस्त्याचे डांबरीकरण काम झाले आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे आहे. तसेच निविदेत कोल्हाडी ते निमखेड या लांबीची असतांना केले गेलेले काम कोल्हाडीपासून ५०० मीटर कमी करण्यात आले आहे. हि बाब निदर्शनास आणून देण्यास दि:- ६ जून…

Read More