Author: saimat

जामनेर तालुक्यातील मोहाडी गावावर शोककळा; विवाहानंतर अवघ्या २० दिवसांत काळाने हिरावले संसाराचे स्वप्न साईमत/जामनेर/ प्रतिनिधी : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाने अक्षरशः कहर केला असून, तापमानाने ४५ अंशांचा टप्पा ओलांडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या भीषण उकाड्याच्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. विवाहानंतर अवघ्या २० दिवसांतच एका २० वर्षीय नवविवाहितेचा उष्माघात सदृश आजाराने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पाचोरा तालुक्यातील बाळद येथील वैशाली भिल (वय २०) हिचा विवाह २३ एप्रिल रोजी मोहाडी येथील सुनील भिल याच्याशी मोठ्या आनंदात पार पडला होता. वैशाली दोन्ही पायांनी दिव्यांग होती, तर तिचा पती सुनील याला बोलताना अडथळा…

Read More

 बंद एसीमुळे महासभेत नगरसेवक घामाघूम साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा तब्बल ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून, प्रचंड उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. अशा भीषण उकाड्यात जळगाव महानगरपालिकेच्या महासभेत मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका थेट नगरसेवकांनाच बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहातील वातानुकूलित यंत्रणा (एसी) बंद असल्याने महासभेदरम्यान नगरसेवक अक्षरशः घामाघूम झाले. गुरुवारी महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची महासभा पार पडली. शहरातील विविध नागरी प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या समस्या यावर चर्चा करण्यासाठी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, सभा सुरू होताच सभागृहातील वाढत्या उकाड्यामुळे वातावरण असह्य बनले. एसी बंद असल्याने सभागृहातील तापमान वाढत गेले आणि त्याचा परिणाम थेट कामकाजावर…

Read More

 वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर करडी नजर साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जिल्ह्यात सातत्याने वाढत असलेल्या भीषण अपघातांच्या घटनांनी प्रशासनाची चिंता वाढवली असून आता पोलिस विभागाने अपघातांना आळा घालण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने आज विशेष व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत अपघातांचे वाढते प्रमाण, त्यामागील कारणे आणि तातडीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी तसेच हायवे स्टेट पॅट्रोलचे कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील महामार्ग आणि ग्रामीण भागातील अपघातांच्या घटनांचा आढावा घेत प्रशासनाने विविध स्तरांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले. एमआयडीसी परिसरात अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर…

Read More

 महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण परिसरात पाहणी साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : येत्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरात पावसाचे पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जळगाव महानगरपालिकेने पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाला मोठा वेग दिला आहे. शहरातील जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रशासनाने व्यापक स्तरावर स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, या कामांचा आढावा महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी मेहरुण परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन घेतला. मेहरुण परिसरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी करताना महापौरांनी नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा आणि अडथळे तातडीने हटवून पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले. शहरातील ज्या भागांमध्ये पावसाळ्यात वारंवार पाणी साचण्याच्या तक्रारी येतात, त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. महापौरांच्या…

Read More

 उष्माघाताने 4 ते 5 जणांचा बळी प्रशासन सतर्क साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : खान्देशात उष्णतेची तीव्र लाट दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून वाढत्या तापमानाने जनजीवन अक्षरशः ठप्प झाले आहे. गेल्या दोन दिवसांत उष्माघातामुळे चार ते पाच नागरिकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहे. खान्देश परिसरात उन्हाचा तडाखा इतका तीव्र आहे की दुपारच्या वेळेत रस्ते पूर्णपणे ओस पडत आहेत. सकाळपासूनच कडक ऊन जाणवत असून नागरिकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. विशेषतः शेतमजूर, बांधकाम कामगार आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांवर या उष्णतेचा सर्वाधिक परिणाम होत आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये तापमान सातत्याने वाढत असून…

Read More

अवैध उत्खनन चौकशी थांबवण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना नाशिक ACBची कारवाई; जिल्ह्यात खळबळ साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जिल्ह्यात शासकीय यंत्रणांतील लाचखोरीवर नियंत्रण मिळत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच PWD शाखा अभियंत्याला ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका शासकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नशिराबाद येथील मंडळ अधिकारी मिलिंद प्रकाश देवरे यांच्याकडे अवैध उत्खननाच्या तक्रारीची चौकशी सोपविण्यात आली होती. ही चौकशी बंद करून तक्रारदाराला मदत करण्यासाठी त्यांनी थेट १ लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तक्रारदाराने लाच…

Read More

घटनेनंतर संतप्त नागरिकांकडून आंदोलन व जाळपोळ; पोलिसांचा मोठा बंदोबस्त साईमत न्यूज नेटवर्क – बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात रस्त्याच्या मधोमध एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून विविध ठिकाणी निदर्शने व आंदोलन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 11 वर्षांच्या पीडित मुलीवर हा प्रकार घडला असून घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. पीडितेचा आक्रोश ऐकून स्थानिक नागरिकांनी धाव घेतली, मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेच्या निषेधार्थ परिसरात संतप्त जमावाने रस्त्यावर उतरून टायर जाळले तसेच काही ठिकाणी भाजी व फळांच्या गाड्यांना आग लावण्यात आली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण…

Read More

 ३१ मेपूर्वी कागदपत्रांची पूर्तता अनिवार्य साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी जून २०२६ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापूर्वी स्कूलबस आणि व्हॅनची सर्व कागदपत्रे पूर्णपणे वैध असल्याची खात्री करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) हे कठोर निर्देश जारी केले असून ३१ मे २०२६ पूर्वी सर्व परवानाधारक वाहनधारकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक ठरवले आहे. या निर्देशानुसार, शालेय वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र, परवाना, पीयूसी, विमा तसेच इतर अनुषंगिक कागदपत्रे वैध असणे आवश्यक आहे. शाळा व्यवस्थापनाने स्वतः पुढाकार घेऊन सर्व स्कूलबस व व्हॅनची प्रत्यक्ष तपासणी करावी आणि कागदपत्रे अपूर्ण असल्यास संबंधित वाहनचालक व मालकांना ती तात्काळ वैध…

Read More

नंदुरबार जिल्ह्यात परिस्थिती गंभीर; 14 पोल्ट्री फार्ममध्ये कारवाई, इतर ठिकाणी तपासणी सुरू साईमत / नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. आतापर्यंत सहा पोल्ट्री फार्ममधील नमुने पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर ‘कलिंग’ मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत आतापर्यंत सुमारे 3 लाख 89 हजार कोंबड्यांचे कलिंग करण्यात आले आहे. तसेच 21 लाख 61 हजार अंडी आणि सुमारे 50 टन पक्षी खाद्य नष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोल्ट्री व्यवसायावर मोठा आर्थिक फटका बसला आहे. नवापूर तालुक्यातील एकूण 35 पैकी 14 पोल्ट्री फार्ममध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कारवाई करण्यात आली आहे. इतर…

Read More

साईमत / देवळा देवळा तालुक्यातील उमराणे शिवारात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी सुमारे साडेआठ वाजता एसटी महामंडळाच्या शहादा डेपोच्या बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जात असलेली बस झाडावर आदळून झालेल्या या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असून 7 ते 8 प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहादा डेपोची पुणे-शहादा बस (क्रमांक MH 14 MH 2310) मालेगावच्या दिशेने जात असताना उमराणे शिवारात चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहराच्या झाडावर जोरात आदळली. या धडकेमुळे बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातावेळी बसमध्ये सुमारे 25 ते 30 प्रवासी होते. अचानक झालेल्या धडकेनंतर बसमध्ये एकच गोंधळ उडाला आणि प्रवाशांच्या किंकाळ्या…

Read More