आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर बदल्यांची हालचाल साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या ९७ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया सोमवारी समुपदेशन पद्धतीने पार पडली. जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित या प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वतः उपस्थित राहून कर्मचाऱ्यांचे समुपदेशन केले आणि नव्या पदस्थापना जाहीर केल्या. प्रशासनाने पारदर्शकता, समन्वय आणि कर्मचारी हिताचा विचार करून ही प्रक्रिया राबविल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. या बदल्यांच्या प्रक्रियेदरम्यान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. बदल्या शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आल्या. प्रशासकीय, विनंती आणि आपसी…
Author: saimat
नदीपात्रातील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना; तीन तासांच्या शोधानंतर मृतदेह हाती, एक बैलही दगावला साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : रोजच्या उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडलेल्या एका कष्टकरी शेतकऱ्यावर नियतीने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी घडली. गिरणा नदीच्या पात्रातून बैलगाडीने जात असताना खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने बैलगाडी उलटली आणि त्यात वडनगरी येथील ५५ वर्षीय शेतकरी पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले. या दुर्दैवी घटनेमुळे वडनगरी परिसरात शोककळा पसरली आहे. वडनगरी येथील दिलीप रामभाऊ कल्याणकर (वय ५५) हे आपल्या सहकारी चिंतामण नाईक यांच्यासह रोजप्रमाणे खेडी भोकर शिवारातील सरपंच दत्तू रामचंद्र पाटील यांच्या शेतात मजुरीसाठी निघाले होते. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांची बैलगाडी गिरणा नदीच्या पात्रातून जात…
साईमत न्यूज नेटवर्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करणे, खाद्यतेलाची बचत करणे, सोने खरेदीवर नियंत्रण ठेवणे, परदेश दौरे मर्यादित करणे तसेच मेट्रो व इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे आणि वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. या आवाहनावर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. पुण्यातील नागरिकांनी या सूचनांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “लग्नकार्यांमध्ये सोने खरेदी टाळून कसे चालेल?”, तसेच “सामान्य नागरिकांनी प्रवास कमी करायचा, पण नेतेमंडळी मात्र सतत दौरे करतात,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त झाल्या. वाढत्या सोन्याच्या दरामुळे आधीच आर्थिक ताण जाणवत असताना “सोनं खरेदी करण्यासाठी लोकांकडे पैसा कुठे आहे?” असा सवालही अनेकांनी उपस्थित…
२.७२ कोटींचा सुका गांजा पोलिसांकडून नष्ट साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून जळगाव पोलिसांनी मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई करत तब्बल १३६२ किलो सुका गांजा नष्ट केला आहे. एनडीपीएस कायद्यान्वये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या २३ गुन्ह्यांतील हा मुद्देमाल असून त्याची अंदाजे किंमत २ कोटी ७२ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या मागील मोकळ्या जागेत जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीच्या उपस्थितीत अत्यंत काटेकोर आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पार पडली. या संपूर्ण प्रक्रियेचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस…
शाळा-महाविद्यालयांमध्ये आता सुरक्षा जनजागृती मोहिम साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाच्या २०२२ च्या निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यात पोलिस अधीक्षक स्तरावर महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीची पहिली बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत पॉक्सो कायदा, सायबर गुन्हे तसेच महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून जिल्ह्यात व्यापक जनजागृती मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा पोलिस प्रशासनाच्या पुढाकारातून गठीत करण्यात आलेल्या या समितीत पोलिस अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, विधिज्ञ, शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांचे सदस्य सहभागी आहेत. जळगावचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलिस उपअधीक्षक प्रदीप ठाकूर आणि भरोसा सेलच्या पोलिस…
विजेच्या धक्क्याने २० वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू साईमत/जामनेर/ प्रतिनिधी : जामनेर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर रविवारी रात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेत वीज खांबावर काम करताना विजेचा जोरदार धक्का लागून एका तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून वीज कामांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मृत तरुणाचे नाव सागर इंगळे (वय २०) असे आहे. तो एका खासगी कंत्राटदाराकडे मजूर म्हणून कार्यरत होता. रविवारी रात्री जामनेर वीज कार्यालयाजवळील खांबावरील दुरुस्तीचे काम त्याला देण्यात आले होते. काम सुरू करण्यापूर्वी मुख्य रोहित्राचा वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र संबंधित खांबावर दोन स्वतंत्र वीज प्रणाली कार्यरत असल्याची…
धरणगावजवळ धावत्या ट्रकने घेतला पेट साईमत/मलकापूर / प्रतिनिधी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील धरणगाव पुलाजवळ धावत्या मालवाहू ट्रकला अचानक आग लागून ट्रक संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना घडली. आगीचे भीषण स्वरूप पाहता काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रक आणि त्यातील मालाचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू ट्रक (क्र. एचआर ३९ जी ८०५७) जळगावकडून मलकापूरच्या दिशेने जात होता. धरणगाव परिसरातील पुलाजवळ पोहोचताच ट्रकच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तत्काळ ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. मात्र, काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण करत संपूर्ण ट्रकला वेढले.…
‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’मध्ये जळगाव पोलिसांची दमदार कामगिरी साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पोलिस दलासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’ (TOT) प्रशिक्षण स्पर्धेत जळगाव जिल्हा पोलिस दलाने उल्लेखनीय यश संपादन करत राज्यभरात आपला ठसा उमटविला आहे. उत्कृष्ट शस्त्र हाताळणी, प्रशिक्षण कौशल्य आणि सामूहिक कामगिरीच्या जोरावर जळगाव पोलिसांनी तीन सुवर्णपदके, दोन कांस्यपदके पटकावत ‘उत्कृष्ट टीम’चा मानही पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सोमवार, ११ मे रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत, पोलिस उपअधीक्षक प्रदीप वाघूर तसेच राखीव पोलिस निरीक्षक प्रशांत सुरवाडे यांच्या हस्ते विजेत्या अधिकारी व अंमलदारांचा…
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला साईमत/जळगाव / प्रतिनिधी : शहरातील गेंदालाल मिल परिसरात सोमवारी सकाळी एका भंगार दुकानाला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना सोमवारी (दि. ११ मे) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. आगीमुळे दुकानातील किरकोळ साहित्याचे नुकसान झाले असून, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे शेजारील फर्निचर दुकान थोडक्यात बचावले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, गेंदालाल मिल परिसरातील भोंग्याजवळ महानगरपालिकेचे मार्केट असून, येथील दुकान क्रमांक ८७ मध्ये निसार खान यांचे भंगार दुकान आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास दुकानातून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांनी धावाधाव करत अग्निशमन विभागाला माहिती दिली. काही क्षणांतच…
सीसीटीव्हीत कैद झाले हल्लेखोर; परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, तणावपूर्ण शांतता साईमत/चाळीसगाव/ प्रतिनिधी : चाळीसगाव शहरातील मैतर कॉलनी परिसरात मध्यरात्री अज्ञात जमावाकडून करण्यात आलेल्या अचानक आणि भीषण दगडफेकीच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात नागरिकांच्या घरांचे तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या कार्यालयालाही लक्ष्य करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात तरुणांचा जमाव मैतर कॉलनी परिसरात अचानक दाखल झाला. या जमावाने कोणताही इशारा न देता घरांवर तसेच वाहनांवर दगडफेक सुरू केली. काही मिनिटांतच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आणि नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. या…