साईमत न्यूज नेटवर्क – बीड : बीड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात एका संतप्त जोडप्याने अंगावर पेट्रोल-डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील हे दाम्पत्य गेल्या सात महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आपल्या १६ वर्षीय मुलीच्या शोधासाठी वारंवार पोलीस कार्यालयाचे खेटे मारत होते. संबंधित मुलीचे एका तरुणाने अपहरण केल्याची तक्रार असूनही अद्याप तिचा शोध लागलेला नाही, असा त्यांचा आरोप आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच मुलगी अद्याप सापडत नसल्याने पालक हतबल झाले होते. या नैराश्यातूनच त्यांनी बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न…
Author: saimat
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी सण-उत्सव, थोर व्यक्तींच्या जयंती-पुण्यतिथी यांचा कालावधी लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महत्त्वपूर्ण प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अंतर्गत हे आदेश १५ मे २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते २९ मे २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी हे आदेश जारी केले असून, संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात शस्त्र, दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगण्यास…
साईमत न्यूज नेटवर्क – राज्यात दूध, सीएनजी आणि त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांवर आर्थिक भार वाढत असतानाच, आता त्याचा थेट परिणाम एसटी महामंडळावरही दिसून येत आहे. डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर सुमारे १२५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी बस तिकीट दरात वाढ होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली असून, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यामुळे याबाबतचे संकेत अधिक ठळक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आपण ऑनलाइन बैठका घेत असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, काही निर्णय हे कठोर असले तरी ते घ्यावेच…
आईशी शेवटचा कॉल ठरला साक्षीदार साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : प्रेमप्रकरणातून घर सोडून गेलेल्या १९ वर्षीय तरुणाने जळगाव रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१५ मे) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. गणेश कोळी असे मृत तरुणाचे नाव असून, मृत्यूपूर्वी आईशी झालेला शेवटचा संवाद आणि त्या वेळी सुरू असलेला मोबाईल कॉल या घटनेमुळे संपूर्ण प्रकरण अधिकच हृदयद्रावक ठरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कोळी याचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही ४ मे रोजी घरातून निघून गेले होते. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी दोघे जळगाव रेल्वे स्थानकात आल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळाली.…
उड्डाणपुलावरील गतिरोधक ठरला जीवघेणा; पिकअप-ट्रॉला धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू साईमत/नवापूर/ प्रतिनिधी : नवापूर जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर काल रात्री घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला आहे. कुणाल हॉटेलसमोरील उड्डाणपुलावर अचानक आलेल्या गतिरोधकामुळे भरधाव पिकअप वाहनाचा ताबा सुटला आणि ते समोरील ट्रॉला वाहनावर जोरात आदळले. या अपघातात पिकअपमधील चालक आणि सहचालक अशा दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पिकअप वाहन भरधाव वेगाने उड्डाणपुलावरून जात असताना अचानक समोर गतिरोधक आल्याने चालक गोंधळून गेला. काही क्षणातच वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि पिकअप थेट समोरील ट्रॉला वाहनाच्या मागील भागावर जाऊन आदळले. धडकेचा आवाज इतका…
साईमत न्यूज नेटवर्क – नाशिक जिल्ह्यातील श्रीपुरवडे गावात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली असून पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची दुहेरी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. श्रीपुरवडे–जायखेडा रस्त्यालगत शेतात वास्तव्यास असलेले मुरलीधर राघो ठाकरे (वय ६५) आणि त्यांची पत्नी यशोदाबाई मुरलीधर ठाकरे (वय ५८) हे दोघे घरी एकटेच होते. त्यांचा मुलगा समाधान ठाकरे आणि सून हे नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले होते. प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून रागाच्या भरात मुरलीधर ठाकरे यांनी कोयत्याने पत्नी यशोदाबाई यांच्यावर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात यशोदाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी पती…
साईमत न्यूज नेटवर्क – आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असलेल्या तणावाचा फटका आता थेट भारतीय नागरिकांना बसू लागला आहे. इराण-अमेरिका संघर्ष, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि डॉलरसमोर रुपयाची घसरण यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे 3 रुपयांची वाढ जाहीर केली असून, नवीन दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. या दरवाढीनंतर देशातील अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर 106.68 रुपये प्रति लिटरवर गेला असून डिझेल 93.14 रुपये प्रति लिटर झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनधारक तसेच वाहतूक व्यवसायावर मोठा आर्थिक ताण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त…
वारंवार वीज ट्रिपिंगने उद्योजक संतप्त; “कंपन्या बंद करा, नुकसानभरपाई द्या” साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : उमाळा-नशिराबाद परिसरातील औद्योगिक कंपन्यांना वारंवार होणाऱ्या वीज ट्रिपिंगचा मोठा फटका बसत असून, त्यामुळे उत्पादन प्रक्रियेसह संपूर्ण उद्योग व्यवस्थाच विस्कळीत झाली आहे. दर तासाला होणाऱ्या वीज खंडितामुळे संतप्त झालेल्या उद्योजकांनी कंपन्या बंद ठेवत चिंचोली सबस्टेशनवर तीव्र आंदोलन करून महावितरणविरोधात जोरदार निषेध नोंदविला. तसेच, “अशीच परिस्थिती राहणार असेल तर वीज कनेक्शनच कट करा आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्या,” अशी आक्रमक मागणी उद्योजकांनी केली आहे. उमाळा-नशिराबाद रोड परिसरातील सुमारे २५ विविध प्रकारच्या कंपन्यांना मागील आठ वर्षांपासून सातत्याने वीज ट्रिपिंगचा सामना करावा लागत आहे. मिनिटा-मिनिटाला होणाऱ्या खंडित पुरवठ्यामुळे मशीनरी बंद पडणे, उत्पादन…
साईमत न्यूज नेटवर्क – भारतीय रुपयाची घसरण थांबण्याचे नाव घेत नसून 15 मे रोजी रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत तब्बल 30 पैशांनी घसरून 96.14 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. यापूर्वी गुरुवारी रुपया 95.64 या सर्वकालीन नीचांकावर बंद झाला होता. सलग सुरू असलेल्या या घसरणीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 2026 च्या सुरुवातीपासूनच रुपयावर दबाव कायम असून, डिसेंबर 2025 मध्ये प्रथमच रुपयाने 90 चा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर डॉलरसमोर भारतीय चलन सातत्याने कमजोर होत चालले आहे. तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि मध्यपूर्वेतील तणाव असेच कायम राहिल्यास रुपया लवकरच 100 च्या पातळीपर्यंत पोहोचू शकतो. रुपयाच्या घसरणीमागची प्रमुख कारणे :…
भव्य शोभायात्रा, ताळ-मृदंगाचा गजर अन् महाप्रसादाने जयंती उत्साहात साजरी साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : संत शिरोमणी सेना महाराज यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात गुरुवारी भक्तीमय वातावरणात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. नाभिक समाजाच्या वतीने आयोजित या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात समाजबांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. ताळ-मृदंगाचा गजर, जयघोष, आकर्षक रांगोळ्या आणि डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई यामुळे संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. शोभायात्रेची सुरुवात कालिंका माता मंदिरापासून करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते संत शिरोमणी सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. “संत सेना महाराज की जय”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने…