सोन्या-चांदीसह रोकड लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : शहरात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून वाघनगर परिसरातील राजे संभाजी चौकात चोरट्यांनी एका रात्रीत तीन घरांना लक्ष्य करून मोठा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. वाघनगर येथील राजे संभाजी चौकात परिसरात चोरट्यांनी दोन बंद घरांचे कडीकोयंडे तोडून प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने व रोकड मिळून सुमारे ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तिसऱ्या घरात मात्र त्यांना काहीही हाती लागले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एका कुटुंबाचे अलीकडेच नवीन घरात स्थलांतर सुरू होते. घर बदलण्याच्या गडबडीत जुने घर बंद असतानाच चोरट्यांनी संधी साधत…
Author: saimat
खडकपाडा परिसरात रात्री झोपेत असताना हल्ला; आरोपी मामा पोलिसांच्या ताब्यात साईमत / कल्याण कल्याण शहरात मोबाईलवरील लुडो गेमवरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण घटनेत झाले असून अल्पवयीन मामाने आपल्या भाच्याची चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव गोकुळ नेपाळी असे असून तो आपल्या कुटुंबासोबत कल्याणमध्ये वास्तव्यास होता. प्राथमिक माहितीनुसार, गोकुळ आणि त्याचा अल्पवयीन मामा यांच्यात मोबाईलवर लुडो गेम खेळण्यावरून वाद निर्माण झाला होता. या वादातून दोघांमध्ये तीव्र बाचाबाची झाली होती. घटनेच्या रात्री गोकुळ झोपेत असताना, अल्पवयीन मामाने त्याच्यावर धारदार चाकूने अचानक हल्ला केला.…
सागर पार्क प्रश्नावर महासभेत रंगणार चर्चा साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिकेची महासभा गुरुवार, दि. १४ मे रोजी सकाळी ११ वाजता महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जाणारे अनेक विषय सभागृहात चर्चेसाठी येणार आहेत. क्रीडा, करमाफी, पर्यावरण संवर्धन, कर्मचारी प्रश्न आणि आर्थिक शिस्त यांसारख्या मुद्द्यांवर महासभेत सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. महासभेच्या अजेंड्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे सागर पार्क मैदानावरील क्रिकेट स्पर्धा होय. मैदानावर स्पर्धांना परवानगी द्यायची की निर्बंध लावायचे, यावर सभागृहात मतमतांतरे होण्याची शक्यता आहे. शहरातील क्रिकेटपटू आणि क्रीडा संघटनांचे लक्ष या निर्णयाकडे लागले असून, सागर पार्क मैदानाचे भवितव्य काय ठरणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.…
मृत नातीचा देह मांडीवर घेऊन वृद्ध आजोबा रात्रभर बसले; आरोग्य यंत्रणा व रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : चाळीसगाव तालुक्यात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिओ डोस आणि नियमित लसीकरण झाल्यानंतर काही मिनिटांतच अडीच महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, त्यानंतर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कथित निष्काळजीपणामुळे मृत बालिकेच्या आजोबांना संपूर्ण रात्र मृतदेह मांडीवर घेऊन शवविच्छेदन विभागाबाहेर बसून राहावे लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्रचा येथे आरोग्य विभागाकडून पोलिओ व लसीकरण मोहीम राबविण्यात येत होती. यावेळी सचिता दीपक बोरसे या अडीच महिन्यांच्या बालिकेला पोलिओ डोस आणि अन्य लस…
भरधाव रेती डंपरची दुचाकीला भीषण धडक दोघांचा जागीच मृत्यू, नागरिकांचा प्रशासनावर संताप साईमत/मुक्ताईनगर/ प्रतिनिधी : शहरात सुरू असलेल्या अवैध रेती, मुरूम आणि माती वाहतुकीच्या वाढत्या दहशतीने अखेर दोन निष्पापांचे जीव घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बऱ्हाणपूर रोडवरील स्मशानभूमीजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण मुक्ताईनगर शहरात भीती, संताप आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास रेती, मुरूम व मातीची अवैध वाहतूक करणारा डंपर भरधाव वेगाने शहरातून जात होता. याचवेळी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघांना डंपरने जोरदार धडक दिली. धडक इतकी…
जळगावात पत्र्याची घरे १० अंशांनी थंड होणार साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : शहरातील वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे त्रस्त नागरिकांसाठी दिलासादायक उपक्रम म्हणून सुप्रीम कॉलनीत ‘कूल रूफ सोल्युशन’ प्रकल्पाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. मंगळवारी महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते या उपक्रमाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे पत्र्याच्या घरांतील तापमान तब्बल १० अंश सेल्सिअसपर्यंत घटत असल्याचे प्रत्यक्ष चाचणीत स्पष्ट झाले आहे. निसर्गाधारित उपायातून उष्णतेवर नियंत्रण “महाराष्ट्रातील उष्णता व पाणी ताण कमी करण्यासाठी निसर्गाधारित उपाय” या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. याअंतर्गत शहरातील गरीब व मध्यमवर्गीय वस्त्यांतील पत्र्याच्या घरांवर सोलर रिफ्लेक्टिव्ह रंगाचा दुहेरी थर दिला जात आहे. हा विशेष रंग सूर्यकिरण परावर्तित करून छत…
सकाळपासून धडक कारवाई; हॉकर्सकडून लपवून ठेवलेले साहित्य जप्त, परिसरात खळबळ साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : शहरातील फुले मार्केट परिसरात वाढलेल्या अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेने पुन्हा एकदा कठोर पवित्रा घेत मोठी कारवाई केली. मंगळवार, १२ मे रोजी सकाळपासून अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक मोहीम राबवत गल्लीबोळांमध्ये लपवून ठेवलेले हॉकर्सचे साहित्य जप्त केले. या कारवाईत सुमारे ३० ते ३५ पेट्या आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या असून परिसरात एकच खळबळ उडाली. फुले मार्केट आणि आसपासच्या भागातील अतिक्रमण तसेच अस्वच्छतेच्या तक्रारींची दखल घेत काही दिवसांपूर्वी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज काळे आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीनंतर नगरसेवक रमेश मतानी यांनीही…
अधिकृत थांबे असूनही एसटी बसचा दुर्लक्ष; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी : तालुक्यातील वरणगाव आणि फुलगाव शहरांना लागून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग बायपासमुळे नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने फुलगाव उड्डाण पुलाखाली दोन पिकअप शेड आणि अधिकृत बस थांबे उभारले आहेत. मात्र, लाखो रुपये खर्च करूनही या ठिकाणी आजतागायत एकही एसटी बस थांबत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, फुलगाव व वरणगाव येथील नागरिकांनी वारंवार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे लेखी निवेदने देऊन या थांब्यावर बस थांबविण्याची मागणी केली आहे. तसेच फुलगाव ग्रामपंचायत कडूनही यासंदर्भात अधिकृत ठराव मंजूर करून प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. तरीही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला…
पूरस्थितीसाठी मनपाची पूर्वतयारी साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : येणाऱ्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती, पाण्यातील अपघात तसेच आपत्कालीन परिस्थितींचा सामना करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने सज्जतेचे पाऊल उचलले आहे. याच अनुषंगाने महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मंगळवारी मेहरूण तलाव परिसरातील गणेश घाट येथे अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाच्या वतीने शोध व बचाव साहित्याचे विशेष प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत झालेल्या या सरावामध्ये पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संकटपरिस्थितीत बचाव पथकाची तत्परता, समन्वय आणि कार्यक्षमतेची कसोटी घेण्यात आली. पाण्यात अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, त्यांना सुरक्षित बाहेर काढणे तसेच विविध बचाव उपकरणांचा प्रभावी वापर कसा करावा, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. या संपूर्ण उपक्रमाचे…
अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांची कडक कारवाई १९० हून अधिक आरोपींवर गुन्हे साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जळगाव पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी एकाचवेळी समन्वय साधत हातभट्टी, सट्टा-जुगार तसेच दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. या मोहिमेत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी छापेमारी करत अवैध हातभट्टी दारू निर्मिती, सट्टा-जुगार अड्डे तसेच प्रोहिबिशन कायद्यांतर्गत कारवाया केल्या. पोलिसांनी ८५ प्रकरणांमध्ये सुमारे २४ लाख ६७ हजार ४८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…