साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महर्षी श्रृँग ऋषि बहुउद्देश संस्था यांच्या संयुक्त विदमानाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त सीनियर सिटीजन व गरीब गरजूंना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. शहरातील गेंदलाल मिल परिसर, स्टेशन परिसर व महामार्ग वरील सीनियर सिटीजन व गरीब गरजूंना या ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. यावेळी महर्षी श्रृँग ऋषि बहुउद्देश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष प्रकाश जोशी, संस्थेचे उपाध्यक्ष रवी पांडे, सुशील पंडित, विजय जोशी, लोचन पाटील, चेतन पाटील, जितेंद्र रडे ,कृष्णा तिवारी आदी उपस्थित होते.
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी टीआर -१ , टीआर – ४ (फ्युसारियम विल्ट) हा एक विषाणूजन्य रोग असल्याने एकदा संसर्ग झाल्यानंतर किमान ३० वर्षे मातीत अस्तित्व राखणारा हा विषाणू त्या परिसरातून केळी नष्ट करून टाकतो. तसेच तो मातीतून मुळांमध्ये प्रवेश करतो व खोडातील पाणी तसेच पोषक तत्वांवर मारा करुन केळी पूर्ण नष्ट करतो. जगभरात अत्यंत घातक विषाणू अशी त्याची ओळख आहे. जगभरातील केळी उत्पादनासाठी हा रोग सर्वात मोठा धोका आहे. ज्या-ज्या राज्यांत या विषाणूचा शिरकाव झाला आहे तेथील केळी पूर्णपणे नष्ट झाली आहे, त्यामुळे जळगाव जिल्ह्यात या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची…
साईमत जळगाव प्रतिनिधी केंद्र सरकारच्या पीएम ई-बस सेवा योजनेत जळगाव शहराला मंजुरी मिळाली आहे. सदर योजनेसाठी बस डेपोसाठी मनपाने प्रभाग समिती तीन जवळील गट क्र ४१८/४१९ ही जागा निश्चित केली आहे. सदर जागेची पाहणी गुरुवार दि. १६ नोव्हेंबर रोजी खासदार उन्मेषदादा पाटील, आमदार राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. दरम्यान, लवकरात लवकर सदर जागेसंदर्भात अंदाजपत्रक तयार करून कामाला गती देण्याचा सूचना केल्या त्यांनी यावेळी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. याप्रसंगी भरतदादा अमळकर, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे, महावितरणचे अभियंता श्री चोपडे, मनपाचे विद्युत अभियंता एस. एस. पाटील, प्रभाग अधिकारी लक्ष्मण सपकाळे उपस्थित होते. योजनेसाठी बस डेपोसाठी सर्व प्रक्रिया पुर्ण करून लवकरात…
साईमत जळगाव प्रतिनिधी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त युवाशक्ती फाऊंडेशन व दादा प्रेमी मित्र परिवाराच्या वतीने बुधवार, दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी ७, शिवाजी नगर, जळगाव येथे सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत “भव्य रक्तदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे. या दिवसाला रक्तदान महासंकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिराच्या फलकाचे अनावरण मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सुरेशदादा जैन, ज्येष्ठ विधितज्ज्ञ पद्मश्री उज्वलजी निकम, रत्नभाभी जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मिनाक्षी जैन, राजेश जैन, शैलेश जैन, तृप्ती जैन, याचना जैन, ॲडव्होकेट अनिकेत निकम, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, इंडियन रेड…
साईमत जळगाव प्रतिनिधी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात विद्युत आणि दूरसंचार विभागातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी चिरायू ज्ञानेश्वर बागुल याची २१ वर्षांखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम च्या मैदानावर नाशिक जिल्हा संघात या खेळाडूची निवड करण्यात आली. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक विभागीय निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील निवड चाचणीत उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनामुळे चिरायूची नाशिक विभागीय संघात मथुरा बहुउद्देशीय संस्था, रवींद्रनाथ टागोर शाळा, चंद्रपूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून निवड झालेल्या या विध्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत…
साईमत जळगाव प्रतिनिधी शेतकऱ्याकडे मागिल वर्षाचा कापुस घरात आहे, यावर्षीही ऊत्पन्न फारच कमी आले आहे. शेतमालाला योग्य भाव नाही. अतिशय बिकट परिस्थितीत शेतकरी सापडला आहे. ग्रामिण भागात तरुण आत्महत्या करीत आहेत. यासाठी शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा अशी मागणी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केली. बळीराजा जयंतीच्या निमित्ताने (बलिप्रतिपदा ) येथे सालाबादाप्रमाणे मराठासेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड , संभाजी ब्रिगेड, मराठा प्रिमियर लिग परिवर्तन चळवळ व बहुजन समाजाच्या वतीने आयोजित बळीराजा पुजन वंदन कार्यक्रमात श्री. देवकर बोलत होते. यावेळी मराठासेवा संघाचे विभागिय कार्याध्यक्ष रामदादा पवार, माजी विभागिय अध्यक्ष सुरेश पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष इंजि हिरामण चव्हाण , सुमित पाटील, जिजाऊ ब्रिगडच्या जिल्हाध्यक्षा लिना…
साईमत जळगाव प्रतिनिधी बिरसा मुंडा जयंती निमित्त बुधवार दि.१५ नोव्हेंबर रोजी मनपा प्रशासकीय इमारतीत त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. प्रसंगी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, कार्यालय अधीक्षक दीपक फुलमोगरे यांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी जितेंद्र धनगर, सुरेश कोल्हे आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
साईमत जळगाव प्रतिनिधी देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची १४ नोव्हेंबर रोजी जयंती असल्यामुळे मनपातर्फे नवी पेठ मधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास सकाळी ११ वाजता माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. प्रसंगी शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, प्रभारी सहाय्यक आयुक्त उदय पाटील, कार्यालय अधीक्षक दीपक फुलमोगरे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अतिक्रमण सहाय्यक संजय ठाकूर, जितेंद्र धनगर, सुरेश कोल्हे, गोपीचंद सपकाळे आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
साईमत जळगाव प्रतिनिधी कला व संस्कृती संचालनालय, गोवा व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित पाडवा पहाट चे आयोजन महात्मा गांधी उद्यानात करण्यात आले होते. या मैफिलीस कै. नथुशेट चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट व भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन चे सहकार्य लाभले. प्रतिष्ठानच्या परंपरेप्रमाणे मयूर पाटील यांनी गुरुवंदना सादर केली. मेजर नानासाहेब वाणी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे तसेच विश्वस्त डॉ. अपर्णा कासार यांनी कलावंतांचे स्वागत केले. त्यानंतर सुरू झाला स्वरसखींचा स्वरप्रवास. सुरवातीला राग नटभैरव रागातील विलंबित एकतालातील बडा ख्याल “ओ समझत नाही ” हा ख्याल अत्यंत दमदार पणे सादर केला त्यानंतरची तिनतालातील बंदिश…
साईमत जळगाव प्रतिनिधी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ अंतर्गत जळगाव ग्रामीण मधील ७ पुलांच्या बांधकामासाठी १२ कोटींच्या कामांना नुकतीच मान्यता शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ आशियाई विकास बँक अर्थासाहित व नाबार्ड अर्थासहित योजनेतर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघात ७ पुलांच्या बांधकामासाठी १२ कोटी रुपयांच्या कामांना नुकतीच मान्यता शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत देण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. या कामांना मंजुरी मिळाली असल्याने नागरिकाना मोठा दिलासा मिळणार असून मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत रस्ते व पुलांच्या विकासामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुकर होत असल्याचे पालकमंत्री गुलाबराव…