Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे प्रतिष्ठान व के.सी. ई. सोसायटी शालेय विभाग आणि शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद् भगवतगीता पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनातून स्पर्धेचे सलग अठरावे वर्ष असून स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.जी.डी बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. गौरी राणे, होत्या तर उद्घाटक म्हणून के.सी. ई. सोसायटीचे सहसचिव ॲड. प्रवीण जंगले होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर होते. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे सचिव डॉ.अशोक राणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला यज्ञकुंड प्रज्वलित करून ईशस्तवन व स्वागतगीत सादर करण्यात आले. स्पर्धेत शहरी व ग्रामीण गटातून २५०विद्यार्थी सहभागी झाले…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी राजकारणातील कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत संपर्क हा अतिशय महत्वाचा असून ही राजकारणात मोठी ताकद आहे. पक्ष संघटनेसाठी मंत्री पेक्षा मी कार्यकर्ता आहे. ”शाखा हा शिवसेनेचा महत्वाचा घटक असून प्रत्येक शाखेचा व विकास कामांचा फलक हा गावात लागलाच पाहिजे” फलक हा शिवसेनेचा आरसा आहे असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते पक्षाच्या लोकसभा मेळाव्यात बोलत होते. यावेळी लवकरच जळगावात पक्षाचे मध्यवर्ती जिल्हा कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. लोकसभेसाठी जिल्ह्यात पुरक वातावरण असून आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांसाठी कार्यकर्त्यांनी संघटनात्मक काम करण्यासाठी एकत्र येवून सज्ज राहावे असे आवाहन नूतन संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांनी केले. पालकमंत्री…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी   शिक्षणाचा अधिकार सर्वांनाच दिला आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रसंगी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबते. असाच एक प्रसंगी धरणगाव तालुक्यातील वराड येथील अनुजा राजु करे या विद्यार्थीनीसोबत घडणार होता. प्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दातृत्त्वामुळे तिचे शिक्षण थांबण्याची वेळ टळली आहे. अनुजा ही फॅशन डिझाईनिंगच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण बेंडाळे महिला महाविद्यालयातून घेते आहे. कौटुंबिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे तीला शिक्षण सोडावे लागणार होते. ही बाब जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या कानावर घातली. त्यांनी सोमवारी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी थेट वराड या गावात जाऊन…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. ए.पी. खैरनार यांचे दि. १६ नोव्हेंबर रोजी निधन झाले. सोमवारी विद्यापीठात त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. प्राचार्य खैरनार यांचे हृदय विकाराने आकस्मिक निधन झाले. ते साक्री तालुक्यातील निजामपूर – जैताणे येथील आदर्श कला महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. ते प्राचार्य परिषदेचे सचिवही होते. त्यांच्यात पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सोमवारी कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य खैरनार यांना भावपूर्ण श्रध्दाजंली वाहण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठाने केलेल्या प्रयत्नात प्राचार्य खैरनार यांचा मोठा वाटा होता अशी भावना प्रा.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना ‘भारतीय भाषा उत्सव’ दरवर्षी साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे देशात पहिल्यांदाच भारतीय भाषा उत्सव उच्च शिक्षण संस्थांमध्ये साजरा केला जात असून या निमित्ताने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातही हा दिवस मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जर्मन, जापनीज फ्रेंच व इंग्लिश भाषा अभ्यास विभागातर्फे वक्तृत्व स्पर्धा, स्वरचित काव्यलेखन स्पर्धा, ‘भारतीय भाषा संवर्धनाचे उपाय’ या विषयावरील निबंधलेखन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे मार्गदर्शक अध्यक्ष म्हणून उपस्थित…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील आदिलशाह फारुकी संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या “माजी राष्ट्रपती डॉ जाकीर हुसैन राज्यस्तरीय पुरस्काराने येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. शरीफ बागवान यांना गौरविण्यात आले. डॉ. शरीफ बागवान यांनी पत्रकारितेत व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा येथील माजी आमदार कैलास गोरख पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सावदा येथील डायमंड इंग्लिश मिडीयमचे अध्यक्ष डॉ. हाजी हारून शेख, उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख, माजी सरपंच नेमिचंद सोनार, जिल्हा अप्पर कोषागार शकील देशपांडे, तहसीलदार पंकज लोखंडे , नायब तहसिलदार देवेंद्र चंदनकर, डॉ. राहुल मयूर ,कबचौ उमवी सिनेट…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी गिरणा नदीवर बांभोरी गावानजीक समांतर पूल बाधातांना पुल कम बंधारा अशी कामाची मंजुरी मिळाली होती मात्र कार्यकारी अभियंता संकल्प चित्र विभाग नाशिक यांच्या पत्रावरून “तो” बंधारा शक्य नसल्याचे नमूद करत “तो” बंधारा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, सदरचा निर्णय संशयास्पद असल्याचा आरोप बांभोरी पुल कम बंधारा कृती समितीने केला असून बंधाऱ्यासाठी समिती पाठपुरावा करणार आहे, तर वेळ प्रसंगी आंदोलनाच्या माध्यमातून जनतेची मागणी शासनाकडे करणार असल्याची भूमिका कृती समितीने घेतली आहे. बांभोरी पुल कम बंधारा कृती समितीने अधीक्षक अभियंता यांचे प्रतिनिधी उप अभियंता गिरीश सूर्यवंशी व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन बांभोरी तालुका एरंडोल राष्ट्रीय महामार्ग…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगावच्या ग्रामदेवतेचा पारंपारिक रथोत्सव सुरू असून रथापूर्वी निघणाऱ्या वहनाला पुजण्यासाठी भाविकांमध्ये अपूर्व उत्साह दिसून येत आहे. वहनाच्या पानसुपाऱ्याची संख्या देखील वाढत आहे. ह. भ. प. मंगेश महाराज उपस्थित भक्तांना प्रसाद आशीर्वाद देत आहेत. श्री सूर्यनारायण वहनाची पानसुपारीचा कार्यक्रम बुनकर वाड्यातील जगन्नाथ सरोदे यांच्या कडे झाला. आरोग्य व तेजाचे प्रतिक ज्याच्या रथास एकही चक्र नाही नसे आधार भूमी काही असे म्हणून ज्याची प्रार्थना केली जाते तो सूर्यनारायण, आरोग्याची देवता. श्री सूर्य नमस्कार हा शाश्वत व्यायामाचा प्रकार , सूर्य हा बुद्धीचा कारक प्रेरक होय. नित्य सूर्य स्तोत्र म्हणून ते पाणी प्राशन केल्यास नेत्र विकार दूर होतात. प्रभू श्रीरामचंद्र ज्या…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी सहकार पणन व वस्त्र उद्योग मंत्रालयाचे प्रचार प्रसिद्धी योजनेअंतर्गत शहरात सुरू असलेल्या स्पेशल हॅन्डलूम एक्सपो 2023 चा समारोप रविवार दिनांक १९ रोजी आमदार राजूमामा भोळे यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांनी शुभेच्छा व्यक्त करून शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा जळगावकरांनी फायदा घेतल्यामुळे रोजगार उपलब्ध झाला, त्याबद्दल त्यांनी प्रदर्शनाला भेट दिली व पुढील वर्षी अशा प्रकारचे प्रदर्शन जळगाव शहरात जनतेच्या सेवेसाठी आयोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी भाजप प्रसिद्धी माध्यम प्रमुख मनोज भांडारकर , प्रदर्शन प्रमुख ज्ञानदेव बाभुळकर व सहभागी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी के. सी. ई. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागातील ४० विद्यार्थ्यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने सावखेडा, जळगाव येथील मातोश्री आनंदाश्रमाला भेट दिली. विद्यार्थ्यांनी वर्गणी गोळा करून आनंदाश्रमात राहणाऱ्या आजी-आजोबांसाठी किराणा, लाडू, फळे भेट म्हणून दिले. विद्यार्थ्यांनी तेथील आजीआजोबांसोबत काही क्षण घालवले आणि त्यांच्याशी मनाचा संवाद साधला. त्यांचेसोबत विविध खेळ खेळलेत. तेथील आजी-आजोबांनी मनाला रंजीवणारे भजन सादर केलेत. त्यावेळी आजी आजोबांच्या चेहऱ्यावर अनमोल आनंद होता. विद्यार्थ्यांनी आपल्या या कृतीतून समाजापुढे उल्लेखनीय उदाहरण प्रस्थापित केले.

Read More