साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील शाहूनगर येथे राहणारा तरुण गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी घरातून बेपत्ता झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पवन ज्ञानेश्वर विसपुते (वय-२५, रा. शाहूनगर जळगाव) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पवन विसपुते हा आपल्या परिवारासह जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात वास्तव्याला आहे. गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी पवन हा घरात कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला आहे. रात्रीपर्यंत तो घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याची कुठेही माहिती मिळाली नाही, म्हणून अखेर शनिवारी ११ नोव्हेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात झाली असून दीपोत्सवाच्या दुसर्या दिवशी अर्थात धनत्रयोदशीला गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयातील रूग्णांना फराळ वाटप करत जळगाव जिल्हा माहेश्वरी संगठन अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी मारवाडी संघटन जळगाव शाखेने आदर्श निर्माण करत आरोग्यमय शुभेच्छा दिल्या. देशातील जनता दिपावली उत्सव साजरा करत असतांना रूग्णांना आजारापणामूळे रूग्णालयातच चिंताग्रस्त वातावरणात दिपावली साजरी करता येत नाही. या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी मारवाडी संघटन अंतर्गत जळगाव जिल्हा माहेश्वरी मारवाडी संघटनेच्या शाखेने दिपावली निमित्त रूग्ण व कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून चिंताग्रस्त वातावरणातून दिलासा देण्याचा प्रयत्न करत आरोग्यमयी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमती नवाल, सचिव मनिषा तोतला, माजी प्रदेशाध्यक्ष…
साईमत जळगाव प्रतिनिधी अरुणाबाई कॉलेज ऑफ फार्मसी येथे एक सप्ताह कार्यशाळा आयोजीत केली होती. यामध्ये चतुर्थ वर्षातील बी फर्मसीच्या विद्यार्थ्यांनी यूव्ही, एचपीएलसी, जीसी आणि डिसॉल्यूशन अशी उपकरणे हाताळली. फार्मस्युटीकल केमेस्ट्री विभाग वरिलायबल श्री इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून अनिल विसपुते होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार देशमुख यांनी सरस्वतीपुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर अनिल विसपुते यांनी विद्यार्थ्यांना उपकरणांविषयी माहिती दिली. त्यानंतर चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी कुतूहलाने पुर्ण सप्ताहात विविध उपकरणे हाताळली. कार्यशाळेच्या समारोपाच्या दिवशी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. तुषार देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वप्नल नारखेडे यांनी केले.…
साईमत जळगाव प्रतिनिधी दिपोत्सवाच्या दुसर्या दिवशी धनत्रयोदशीनिमित्त डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आज धन्वंतरी देवतेचे पूजन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी धन्वंतरीच्या प्रतिमेस मार्ल्यापण करुन सर्वांना सुखी ठेव, आनंदात ठेव, निरोगी आरोग्य प्रदान कर, अशी प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयातील लेखापाल, क्लर्क आदि उपस्थीत होते.
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्रातील हिंदी विभागात सन २०२२-२०२३ मध्ये झालेल्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली प्रितिशा गावित व व्दितीय क्रमांकाचा विद्यार्थी निलेश बागुल या दोघांना बँक ऑफ बडोदाच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे दिल्या जाणा-या शिष्यवृत्तीने गौरविण्यात आले. सन २००६ पासून बँक ऑफ बडोदाच्या क्षेत्रीय कार्यालयातर्फे दरवर्षी हिंदी विभागातील एम. ए. हिंदी विषयात प्रथम व व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यास रूपये अकरा हजार व सात हजार पाचशे रोख आणि प्रशिस्तपत्र देवून गौरविण्यात येते. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते प्रितिशा गावित व निलेश बागुल या दोघांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली. बँकेचे…
साईमत जळगाव प्रतिनिधी ऐन सणासुदीला महावितरणच्या मक्तेदाराने आपल्या कडील कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ महावितरणचे कंत्राटी कामगार शुक्रवारी उपोषणास बसले होते. दरम्यान, कंत्राटी कामगार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांनी महावितरणाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे जाऊन याबाबत जाब विचारत कामगारांना दोन दिवसात कामावर रुजू करण्यास संबंधित एजन्सीना सांगून सांगा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा मनसेच्या वतीने उपमहानगाध्यक्ष आशिष सपकाळे यांनी दिला आहे. यावेळी मनसे चे उपमहानगाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या सोबत जवळपास ४२ कंत्राटी कामगार उपस्थित होते. त्यात विनोद तायडे, बापू कोळी, राजेंद्र ठाकूर, विशाल ठाकूर, सचिन सपकाळे, धनराज सपके, सचिन सपकाळे, धनराज सपके, संजय कोळी,…
साईमत जळगाव प्रतिनिधी राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठीच्या उपाय योजना राबविण्याचे आवाहन केले आहे. या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथके नियुक्त करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील बांधकाम स्थळे धुळमुक्त आणि स्वच्छ करावीत. अण्टी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा. जळगाव शहर व जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, महापालिका आयुक्त व जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी एकत्रितपणे कार्यवाही करावी. नागरिकांना प्रदुषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे. बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यामुळे…
साईमत नाशिक प्रतिनिधी महापालिकेला सर्व आरक्षित जमिनी ताब्यात घेण्यासाठी नेमकी किती रक्कम आवश्यक आहे, याबाबत प्रशासनातच दुमत आहे. वडाळा व देवळालीचा प्रस्ताव पाठविताना एका प्रस्तावात भूसंपादनाच्या दायित्वाचा भार साडेचार हजार कोटी, तर एका ठिकाणी दायित्वाचा भार चार हजार 700 कोटी रुपये दाखविण्यात आला आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी नेमका किती निधी लागेल, याबाबत प्रशासनातच दुमत आहे. शहरात शाळा, क्रीडांगण, हॉस्पिटल, उद्याने आदीसाठी विकास आराखड्यात आरक्षित जागा महापालिकेच्यावतीने ताब्यात घेताना प्रथम प्राधान्य कमिटीसमोर प्रस्ताव ठेवले जाणार असून निवाडा होऊन मोबदला निश्चित होणार आहे. आरक्षित जागा दहा वर्षांत संपादित करणे अपेक्षित असते.जागा ताब्यात न आल्यास दहा वर्षांनंतर जागामालक नियम 127 अन्वये जागा ताब्यात घेण्यासाठी…
साईमत पाचोरा प्रतिनिधी शहरातील मुख्य बाजार पेठेसह सर्वच ठिकाणी नागरिकांची दिवाळीनिमित्त खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे बाजारपेठ फुलल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. त्यात मातीचे दिवे, पणत्या, आकाश कंदील, रेडीमेड फराळ, किराणा, कपडे खरेदी, इतर वस्तूंच्या खरेदीसाठी शहरात स्टेशन रोड जामनेर रोड भडगाव रोड या भागात मोठी गर्दी होतांना दिसत आहे. दिवाळीचा प्रारंभ गुरुवारी रमा एकादशी आणि वासूबारसपासून झाला आहे. ही दिवाळी येत्या बुधवारी, 15 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहील. दिवाळीला लहान मुलांपासून तरुणाई आणि वयोवृद्धांमध्ये आनंद असतो. पाचोरा शहरात मानसिंगका पटांगणावर फटाक्यांची दुकाने लागली आहे. तेथे खरेदीसाठी गर्दी होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. फटाके खरेदी करतांना नागरिकांमध्ये…
साईमत जळगाव प्रतिनिधी दीपावली निमित्य रोटरी सेंट्रलतर्फे जिल्हा परिषदेच्या जळकातांडा येथील मुलामुलींच्या शाळेत१२१विद्यार्थ्यांना फराळ आणि मिठाईचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी राजेश दोशी ,राजेंद्र पिंपरकर , सतीश अग्रवाल , दीपक नाथानी यांचे सहकार्य लाभले. यावेळी अध्यक्ष कल्पेश शाह , मानद सचिव दिनेश थोरात , सभासद दीपक नाथानी , कृती शाह , शाळेचे उपाध्यक्ष भुरा चव्हाण , ग्रामपंचायत सदस्य भंगू चव्हाण ,ज्ञानेश्वर चव्हाण , प्रविण पाटील , मुख्याध्यापिका भारती सोनार , शिक्षिका पूर्णिमा भामरे , वनमाला हतकर उपस्थित होते. प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन दिनेश थोरात तर आभार भारती सोनार यांनी केले.