राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

0
1

साईमत जळगाव प्रतिनिधी

जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात विद्युत आणि दूरसंचार विभागातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी चिरायू ज्ञानेश्वर बागुल याची २१ वर्षांखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम च्या मैदानावर नाशिक जिल्हा संघात या खेळाडूची निवड करण्यात आली. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक विभागीय निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील निवड चाचणीत उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनामुळे चिरायूची नाशिक विभागीय संघात मथुरा बहुउद्देशीय संस्था, रवींद्रनाथ टागोर शाळा, चंद्रपूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून निवड झालेल्या या विध्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर क्रीडा विभागाचे प्रमुख जयंत जाधव व क्रीडा शिक्षक राहुल धुळणकर यांचे या विध्यार्थ्याला मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here