साईमत जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महर्षी श्रृँग ऋषि बहुउद्देश संस्था यांच्या संयुक्त विदमानाने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त सीनियर सिटीजन व गरीब गरजूंना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.
शहरातील गेंदलाल मिल परिसर, स्टेशन परिसर व महामार्ग वरील सीनियर सिटीजन व गरीब गरजूंना या ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. यावेळी महर्षी श्रृँग ऋषि बहुउद्देश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष प्रकाश जोशी, संस्थेचे उपाध्यक्ष रवी पांडे, सुशील पंडित, विजय जोशी, लोचन पाटील, चेतन पाटील, जितेंद्र रडे ,कृष्णा तिवारी आदी उपस्थित होते.