साईमत जळगाव प्रतिनिधी
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त युवाशक्ती फाऊंडेशन व दादा प्रेमी मित्र परिवाराच्या वतीने बुधवार, दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी ७, शिवाजी नगर, जळगाव येथे सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत “भव्य रक्तदान शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे. या दिवसाला रक्तदान महासंकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
या रक्तदान शिबिराच्या फलकाचे अनावरण मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सुरेशदादा जैन, ज्येष्ठ विधितज्ज्ञ पद्मश्री उज्वलजी निकम, रत्नभाभी जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मिनाक्षी जैन, राजेश जैन, शैलेश जैन, तृप्ती जैन, याचना जैन, ॲडव्होकेट अनिकेत निकम, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचालित रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. प्रसन्न जैन, युवाशक्ती फाऊंडेशनचे संथपक अध्यक्ष विराज कावडीया, प्रकाश बेदमुथा, पियुष हसवाल, प्रीतम शिंदे, संकेत छाजेड, यश राठोड, शैलेंद्र राजपूत, तन्मय मनोरे, गौरव नलगे आदी उपस्थितीत होते.
या रक्तदान शिबिरात जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.