Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जनता सहकारी बँकेच्या सन २०२४ दिनदर्शिकेचे विमोचन श्रीराम मंदीर संस्थानचे विद्यमान गादीपती ह. भ. प. मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते बँकेचे मुख्यालय सेवा येथे करण्यात आले. दिनदर्शिकेचे विमोचन प्रसंगी श्रीराम मंदीर संस्थानचे गादीपती ह. भ. प. मंगेश महाराज जोशी, बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, उपाध्यक्ष सीए कृष्णा कामठे, संचालिका डॉ. आरती हुजुरबाजार, संचालक हरीशचंद्र यादव, जयंतीलाल सुराणा, सीए नितीन झवर, सुशील हासवाणी, डॉ पराग देवरे, संचालिका संध्या देशमुख, कर्मचारी प्रतिनिधी ओंकार पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र) संजय नागमोती, राजेंद्र नन्नवरे, क्षुधाशांती सेवा संस्थाचे प्रकल्प प्रमुख संजय बिर्ला, आदी उपस्थित होते. सभासदांसाठी विविध योजना राबविणार्‍या जळगाव जनता सहकारी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी पुणे येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश पदी कार्यरत असलेल्या न्या. ज्योती प्रताप दरेकर यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “पोस्को कायदा २०१२ अंतर्गत लैंगिक गुन्ह्यातील पीडित बालकांचे मानव अधिकार” या कायद्याच्या विषयांमध्ये पीएचडी प्राप्त झाली आहे. उपरोक्त विषयावरील संशोधनाचा फायदा न्या. ज्योती दरेकर यांना त्यांच्याच न्याय क्षेत्रातील कार्यप्रणालीमध्ये अतिशय उपयोगी ठरणार आहे. मणियार लॉ कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ. विजेता सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली न्या. ज्योती दरेकर यांनी पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण केला. कुलगुरू व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते न्या.ज्योती दरेकर यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी श्री साईराम प्लास्टिक्स् अ‍ॅण्ड इरिगेशन कंपनी ही भारतातील सिंचन प्रणाली उत्पादनातील अग्रगण्य कंपनी असून ‘इमिटींग पाईप्स् सिस्टिम-आयएस 13488 ः 2008’ नामांकनानुसार उत्पादन उत्पादित करीत आहे. कंपनीने 2 वर्षापासून ‘इमिटींग पाईप्स् सिस्टिम’ या उत्पादनाच्या निर्मितीत उत्कृष्ट गुणवत्तेचे सातत्य ठेवण्यास घेतलेल्या परिश्रमासाठी बीआयएस (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) या भारतीय नामांकन देणार्‍या संस्थेमार्फत कंपनीला उत्पादनाच्या विश्वासाहर्र्तेसाठी सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. श्री साईराम प्लास्टिक्स् अ‍ॅण्ड इरिगेशन ही ठिबक सिंचन प्रणाली, पीव्हीसी व एचडीपीई पाईप, तुषार सिंचन, सुक्ष्म तुषार सिंचन, फिल्टर्स, शेड नेट, मल्चिंग पेपर उत्पादित करणारी भारतातील अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीचे उत्पादनं ओरिजनल मटेरियलपासून बनविले जात असून उत्पादनाचा दर्जा, गुणवत्ता…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनी झालेल्या हिरक-महोत्सवी समारंभात जेष्ठ रंगकर्मी व वरिष्ठ पत्रकार संजय निकुंभ यांना सांस्कृतिक क्षेत्रात, गत वर्षातील १२ महिन्यातील विविध १२ प्रकारात विशेष कामगिरी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘आर्टीस्ट ऑफ द इयर’ने सन्मानित करण्यात आले . संजय निकुंभ यांनी गत वर्षात अनुक्रमे ,जानेवारीमध्ये नाशिकला राज्य कामगार नाट्य स्पर्धेत जागतिक कीर्तीचे ‘राशोमान’ चे साभिनय प्रभावी सादरीकरण केले.फेब्रुवारीत देवगिरी फिल्म फेस्टीवल मध्ये स्व-दिग्दर्शित ‘फुगेवाला’लघुपटास द्वितीय नामांकन मिळाले .मार्च मध्ये स्व.राजेंद्र भालेराव स्मृती राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट वाचकस्वर’ तसेच मानाचा प्रथम ‘करंडक’ मिळविला .एप्रिल मध्ये मनुमाय प्रोडक्शन कृत ,नियोजित ‘बोलीभाषा ‘आधारित वेब-सिरीज मध्ये ‘चरित्र’ भूमिका…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी संपूर्ण मनोरंजनसृष्टीचे लक्ष वेधून घेणारी “जी. एच. रायसोनी करंडक” राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दरवर्षी नव-नव्या संहिता, दिमाखदार सादरीकरण घेऊन येते. जानेवारी-फेब्रुवारी महिना म्हटला की कॉलेजविश्वात “जी. एच. रायसोनी करंडक”चे वारे वाहू लागतात. या अनुषंगाने तरुण रंगकर्मींची शान असलेल्या “जी. एच. रायसोनी करंडक” चे बिगुल वाजले आहे. गेली अनेक वर्षं कॉलेज लाइफचा अविभाज्य घटक असणारी जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन आयोजित जी.एच. रायसोनी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा अर्थात ‘जी. एच. रायसोनी करंडक’ येत्या १२ जानेवारीपासून अख्या महाराष्ट्रात रंगणार आहे. प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेरीत हि स्पर्धा होणार असून स्थानिक विध्यार्थ्याच्या सोयीसाठी प्राथमिक फेरी हि ऑनलाईन पद्धतीने…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दल, भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मैदानात सोमवार, दि. ८ जानेवारी रोजी शस्त्र, श्वान, बॉम्ब शोधक व नाशक, पोलीस बॅन्ड, वायरलेस इत्यादींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ११.०० वाजता हवेत तिरंगे फुगे सोडून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांचे हस्ते सोडून करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, प्रितम शिंदे, मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एन. भारंबे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधीक्षक…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील रामेश्वर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ केंद्रात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरु पीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नासिक अंतर्गत एकत्रितपणे बालसंस्कार शिबिर रविवार रोजी उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रा.विजय पवार, एस. एन. डि. टी. महाविद्यालयाच्या प्रा. नीता पाटील, छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष अमोल कोल्हे, श्री स्वामी समर्थ केंद्राचे तालुका प्रतिनिधी संजय कासार, जिल्हा प्रतिनिधी एन. डि. बोरसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुलांना अॅड. केतन सोनार मार्गदर्शन केले. शिबिरासाठी रामेश्वर कॉलनीसह, आनंद नगर, कांचन नगर, तळेले कॉलनी, अयोध्या नगर, बिब्बा नगर, कुसुंबा आणि आव्हाणे येथील…

Read More

साईमत चोपडा प्रतिनिधी यंदाचा पत्रकारदिन समारंभ शहरात आयोजित करून भारतीय पत्रकार महासंघाला भाषणबाजी करीत सत्काराचे हारतुरे मान्यवरांकडून घेता आले असते. मात्र पत्रकार आजही दीनदुबळ्यांच्या हितासाठी झटत आहेत, भारतीय पत्रकार महासंघाने दीनदुबळ्यांबद्दलची आपली प्रतिबध्दता अधोरेखित केली आहे. हे चित्र पाहून मनस्वी समाधान वाटले, असे प्रतिपादन खासदार रक्षाताई खडसे यांनी केले. तालुक्यातील दुर्गम भागातील मन्यावस्ती या पाड्यावर भारतीय पत्रकार महासंघाच्यावतीने आरोग्य शिबीरात आदिवासी बांधवाची तपासणी व ब्लॅकेट वाटप करून ‘पत्रकार दिन‘ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उदघाटन व ब्लॅकेट वाटप करण्यात आले. जनसमान्यांचा आधार स्तभ, या ब्रीदवाक्याप्रमाणे यावर्षीदेखील आदिवासी भागात भारतीय पत्रकार महासंघाच्यावतीने पत्रकार…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नूतन मराठा महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत चोपडा येथील डॉ. सुरेश जी पाटील चोपडा महाविद्यालयाची “पडदा” ही एकांकिका प्रथम आली. जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयाची एकांकिका ‘कंदील’द्वितीय – तर प्रताप महाविद्यालय अमळनेर यांची एकांकिका- ‘तो पाऊस आणि टाफेटा तृतीय आली. स्पर्धचे उदघाटन व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.राजेंद्र नन्नवरे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. पी. देशमुख होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे प्रतिनिधी प्रा.डॉ.अंजली बोडार, राजेश भामरे ,महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ .एन जे पाटील,डॉ जयश्री सोनटक्के, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ.राहुल संदनशिव, परीक्षक किरण अडकमोल, चिंतामण पाटील,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जुलै २०२३ मध्ये जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतला. त्यानंतर ते अध्यक्ष असलेल्या जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या १६६ समित्यांचा नियमित आढावा घेण्यात येत आहेत. सूचनांची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, याचा पाठपुरावा स्वत: जिल्हाधिकारी व त्यांचे स्वीय सहायक घेतात. या बैठकांमध्ये उपस्थित ८१९ मुद्यांपैकी ५६६ मुद्यांवर जलद कार्यवाही करण्यात आली. यामुळेच जिल्हा नियोजन कामांना प्रशासकीय मान्यता, निधी वितरण व खर्चात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल आहे.‌ त्याचबरोबर प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर कामांना गती मिळाली. वर्षोनुवर्षे प्रलंबित असलेले शेळगाव मध्यम प्रकल्प, नदीजोड प्रकल्प भूसंपादनग्रस्तांना निधी वितरण, पिंप्राळा रेल्वे उड्डाणपूल, विमानतळ रुंदीकरण, जामनेर रेल्वेस्थानक भूसंपादन या प्रकल्पांना गती…

Read More