मनपा पीएम ई-बस सेवा योजनेची तयारी

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या पीएम ई-बस सेवा योजनेत जळगाव शहराला मंजुरी मिळाली आहे. सदर योजनेसाठी बस डेपोसाठी मनपाने प्रभाग समिती तीन जवळील गट क्र ४१८/४१९ ही जागा निश्चित केली आहे. सदर जागेची पाहणी गुरुवार दि. १६ नोव्हेंबर रोजी खासदार उन्मेषदादा पाटील, आमदार राजुमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली.

दरम्यान, लवकरात लवकर सदर जागेसंदर्भात अंदाजपत्रक तयार करून कामाला गती देण्याचा सूचना केल्या त्यांनी यावेळी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. याप्रसंगी भरतदादा अमळकर, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे, महावितरणचे अभियंता श्री चोपडे, मनपाचे विद्युत अभियंता एस. एस. पाटील, प्रभाग अधिकारी लक्ष्मण सपकाळे उपस्थित होते.

योजनेसाठी बस डेपोसाठी सर्व प्रक्रिया पुर्ण करून लवकरात लवकर पीएम ई-बस सेवा शहरवासीयांना उपलब्ध करून देण्याची तयारी मनपाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here