Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात विद्युत आणि दूरसंचार विभागातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी चिरायू ज्ञानेश्वर बागुल याची २१ वर्षांखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम च्या मैदानावर नाशिक जिल्हा संघात या खेळाडूची निवड करण्यात आली. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक विभागीय निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेतील निवड चाचणीत उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनामुळे चिरायूची नाशिक विभागीय संघात मथुरा बहुउद्देशीय संस्था, रवींद्रनाथ टागोर शाळा, चंद्रपूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून निवड झालेल्या या विध्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शेतकऱ्याकडे मागिल वर्षाचा कापुस घरात आहे, यावर्षीही ऊत्पन्न फारच कमी आले आहे. शेतमालाला योग्य भाव नाही. अतिशय बिकट परिस्थितीत शेतकरी सापडला आहे. ग्रामिण भागात तरुण आत्महत्या करीत आहेत. यासाठी शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा अशी मागणी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केली. बळीराजा जयंतीच्या निमित्ताने (बलिप्रतिपदा ) येथे सालाबादाप्रमाणे मराठासेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड , संभाजी ब्रिगेड, मराठा प्रिमियर लिग परिवर्तन चळवळ व बहुजन समाजाच्या वतीने आयोजित बळीराजा पुजन वंदन कार्यक्रमात श्री. देवकर बोलत होते. यावेळी मराठासेवा संघाचे विभागिय कार्याध्यक्ष रामदादा पवार, माजी विभागिय अध्यक्ष सुरेश पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष इंजि हिरामण चव्हाण , सुमित पाटील, जिजाऊ ब्रिगडच्या जिल्हाध्यक्षा लिना…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी बिरसा मुंडा जयंती निमित्त बुधवार दि.१५ नोव्हेंबर रोजी मनपा प्रशासकीय इमारतीत त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. प्रसंगी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, कार्यालय अधीक्षक दीपक फुलमोगरे यांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी जितेंद्र धनगर, सुरेश कोल्हे आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची १४ नोव्हेंबर रोजी जयंती असल्यामुळे मनपातर्फे नवी पेठ मधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास सकाळी ११ वाजता माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. प्रसंगी शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, प्रभारी सहाय्यक आयुक्त उदय पाटील, कार्यालय अधीक्षक दीपक फुलमोगरे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अतिक्रमण सहाय्यक संजय ठाकूर, जितेंद्र धनगर, सुरेश कोल्हे, गोपीचंद सपकाळे आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी कला व संस्कृती संचालनालय, गोवा व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित पाडवा पहाट चे आयोजन महात्मा गांधी उद्यानात करण्यात आले होते. या मैफिलीस कै. नथुशेट चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट व भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन चे सहकार्य लाभले. प्रतिष्ठानच्या परंपरेप्रमाणे मयूर पाटील यांनी गुरुवंदना सादर केली. मेजर नानासाहेब वाणी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे तसेच विश्वस्त डॉ. अपर्णा कासार यांनी कलावंतांचे स्वागत केले. त्यानंतर सुरू झाला स्वरसखींचा स्वरप्रवास. सुरवातीला राग नटभैरव रागातील विलंबित एकतालातील बडा ख्याल “ओ समझत नाही ” हा ख्याल अत्यंत दमदार पणे सादर केला त्यानंतरची तिनतालातील बंदिश…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ अंतर्गत जळगाव ग्रामीण मधील ७ पुलांच्या बांधकामासाठी १२ कोटींच्या कामांना नुकतीच मान्यता शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ आशियाई विकास बँक अर्थासाहित व नाबार्ड अर्थासहित योजनेतर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघात ७ पुलांच्या बांधकामासाठी १२ कोटी रुपयांच्या कामांना नुकतीच मान्यता शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत देण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. या कामांना मंजुरी मिळाली असल्याने नागरिकाना मोठा दिलासा मिळणार असून मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत रस्ते व पुलांच्या विकासामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुकर होत असल्याचे पालकमंत्री गुलाबराव…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील आवार गावाने दिवाळी फटाके न फोडता दीपोत्सवाने साजरी केली याचं औचित्याने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आवार गावचे सरपंच गोकुळ सपकाळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित गावकरी यांचा सत्कार करण्यात आला. आवार तालुका जिल्हा जळगाव सारख्या साडेसातशे लोकवस्तीच्या छोट्याशा गावाने दिवाळीच्या आदल्या दिवशी फटाके न फोडता दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली आणि एकही फटाका न फोडता दिवाळी साजरी करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवीन आदर्श निर्माण केला. याच आदर्श कामाबद्दल महा अनिस राज्य कार्यवाहक वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग प्रमुख दिगंबर कटारे यांच्या हस्ते संविधान प्रास्ताविका आणि पुस्तके देऊन…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी रेडक्रॉसच्या सिनिअर सिटीझन वेल्फेअर कमिटीमार्फत कळविण्यास आनंद होतो कि दि. १६ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत जेष्ठ नागरीक (स्त्री, पुरुष) ज्यांचे वय ६० वर्षाच्या वर आहे अशांना सवलतीच्या दारात फिजिओथेरपीचे उपचार दि. १६ नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आले आहे. उपचार घेणाऱ्या जेष्ठ नागरीकांना आधार कार्ड छायांकित प्रत आणून रेडक्रॉस व्यवस्थापनेकडे फिजिओ थेरपी उपचारासाठी आपली नावे नोंदवावीत. फिजिओ थेरपीसाठी उपलब्ध मशिनरी साहित्याद्वारे व तज्ञ डॉक्टराकडून गुढगे, पाय, कंबर, मान व पाठ दुखी, फ्रोझन शोल्डर व इतर आजारावर फिजिओ थेरपीने उपचार तपासणी करून सुरु करण्यात येईल. जेष्ठ नागरिकांनी आधार कार्ड व आजारासाठी काढलेले त्या भागाचे एक्स रे, फोटो व…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी राष्ट्रीय उद्योजक्ता दिना निमित्त के. सी. ई. सोसायटीचे इन्सिस्ट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च, जळगाव मध्ये विद्यार्थ्यांनी नवनवीन बिझिनेस आयडिया विषयी रिसर्च , इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी ला चालना मिळावी या उद्देशाने ” फिफ्टी का फंडा ” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना राम बायोटेक चे एम. डी. पुष्कराज चौधरी यांनी सांगितले कि, ” बिझिनेस करताना अत्यंत महत्वाचे आहे ते इंटिग्रिटी म्हणजे अखंडता पाळणं. त्याच बरोबर उद्योजक म्हणून कोणत्या आव्हानांना सामोरे जावं लागते हे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी कंपनी राम बायोटेक चा आता पर्यंतचा प्रवास उलगडला. उद्योजक म्हणून शिक्षणा बरोबरच लिसनिंग पॉवर, इमॅजिनेशन, व्हिजुअलाझेशन ची…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील बीपीएड प्रथम वर्षाचा खेळाडू निलेश दिलीप माळी याने दिनांक २५ ते २७ ऑक्टोंबर दरम्यान गोवा येथे पार पडलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या रग्बी संघात सक्रिय सहभाग नोंदविला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष रब्बी संघास रजत पदक प्राप्त झाले. संघातील प्रत्येक खेळाडूस महाराष्ट्र शासनाकडून रुपये पाच लाख एवढी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या यशाबद्दल शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी विभागप्रमुख प्रा.डॉ. निलेश जोशी, प्रा. डॉ. शैलेजा भंगाळे, प्रा. प्रवीण कोल्हे,…

Read More