साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : राज्यातील निवडणुकांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांना स्थिगिती दिली आहे. तसेच या निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम लवकर जाहीर करण्यात येईल असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीनंतर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. काय म्हटलं आहे निवडणूक आयोगाने? राज्य निवडणूक आयोगाचे दि. ०८ जुलै २०२२ रोजीच्या पत्रान्वये १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२२ दिला होता. मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्रमांक १९७५६/२०२१ ची सुनावणी दि. १२…
Author: Saimat
साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी येथील जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून तालुक्यात विधवा प्रथेविरुद्ध कार्याचा कालपासून प्रारंभ झाला असून मराठा महासंघप्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक वसुंधरा दशरथ लांडगे व जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या तालुक्यातील शिरुड येथील जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका रत्नाताई भदाणे या दोघींच्या प्रमुख पुढाकाराने या स्तुत्य उपक्रमाला यश आले. याबाबतची हकीकत अशी की, काल दिनांक 13 जुलै बुधवारी हेडावे ता. अमळनेर येथे सामाजिक कार्यकर्ते डॉ. दंगल झाल्टे यांचे निधन झाले. वसुंधरा लांडगे यांना रत्नाताई भदाणे यांचा फोन आला. हेडावे येथे जाऊन त्यांच्या भाऊबंदांशी व त्यांच्या मुलींशी संवाद साधला व प्रबोधन केले.मयत डॉ.झाल्टे यांच्या सुविद्य पत्नी भारतीताई झाल्टे यांनीही विचारांना मान्यता दिली.त्यांचा सौभाग्याचा…
साईमत लाईव्ह पाडळसरे ता. अमळनेर : ज्यांच्यामुळे आपणास हे जीवन व जग दिसले व मानवंदेह मिळाला त्या प्रथम गुरु आई वडिलांना आजच नाही तर दररोज वंदन करा कारण गुरू + पूर्ण+ माँ हे त्रिसूत्रीचे एकत्रितपणे गुरुपौर्णिमा साध्य होते,म्हणून सर्व प्रथम माँ ही पूर्ण गुरु आहे त्यानंतर गुरु हेच पूर्ण माँ आहे असे प्रतिपादन कपिलेश्वर मंदिराचे मठाधिपती महामंडलेश्वर हंसानंद महाराज यांनी कपिलेश्वर मंदिर स्थळी तापी व पांझरा संगमस्थळी गुरुपौर्णिमा निमित्त भक्तांना गुरू महिमा सांगतांना विशद केले. पाडळसरे येथून जवळच असलेले तापी व पांझरा व गुप्त गंगा नदीच्या संगमावरील दक्षिण तिरावरील एक हजार वर्षांपूर्वीचा इतिहास लाभलेले खान्देशातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र कपिलेश्वर…
मुंबई : प्रतिनिधी राज्यात शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केले. या घडामोडीनंतर शिवसेना पुन्हा उभी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहे. ठाकरे यांच्या नेतृत्वात आज शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला सर्व जिल्हा प्रमुखांनी हजेरी लावली होती. आम्हाला पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या रुपातच मुख्यमंत्री बघायला आवडेल, असा सूर या बैठकीत उमटल्याची माहिती रायगड उपजिल्हाप्रमुख अवचित राऊत यांनी दिली. शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट पडल्याचे दिसत आहे.अद्यापही शिवसेनेत गळती सुरूच आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार, जिल्हाप्रमुख अशा पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाकाच लावला आहे.…
मुंबई : प्रतिनिधी आज मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची(Uddhav Thackeray) भेट घेणार नाहीत. मात्र शिवसेनेचे खासदार मुर्मू यांची भेट घेणार असल्याची मोठी माहिती भाजप नेते सी टी रवी यांनी दिली आहे. या नव्या राजकीय डावाने निश्चितच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची धाकधूक वाढली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मी यांचं आज मुंबईत आगमन झालं आहे. आदिवासी समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. मात्र आज मुंबईतील दौऱ्यात द्रौपदी मुर्मू या उद्धव ठाकरेंची भेट घेणार नाहीत, असे स्पष्टीकरण सी टी रवी यांनी दिले. याउलट शिवसेनेचे खासदार मुर्मू यांची भेट…
मुंबई : प्रतिनिधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेतील ४० आमदारांनी केलेल्या बंदमुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. तसेच शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंगही सुरू झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर शिवसेनेचे अस्तिव टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेतील शिवसेनेचे बहुतांश माजी नगरसेवक शिंदेगटात दाखल झाल्यानंतर आता मुंबई लगतच्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील तब्बल १८ नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी काही वेळातच शिंदे गटात सहभागी होणार आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर हे १८ नगरसेवक, शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होतील. मीरा भाईंदर शहरात…
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मूळचे साताऱ्याचे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या गावात दोन हेलिपॅड बनवले. (Helipad in CM’s village)परंतु शाळकरी मुलांना कोयना धरणातून जीवघेणा प्रवास करत अनेक अडचणींवर मात देऊन शाळेत जावे लागते. त्यासाठी रस्त्याचे काम करायला पाहिजे, असे उच्च न्यायालयाने (High Court)गुरुवारी (१४ जुलै) म्हटले. सातारा जिल्ह्यातील खिरवंडी गावातील मुलींचा शिक्षणासाठी सुरु असलेला जीवघेणा प्रवास थांबवावा , शाळकरी मुलांना शिक्षण पूर्ण करता यावे. मुलांना कोणत्याही अडचणींविना शाळा किंवा महाविद्यालयात जाता यावे. यासाठी रस्ते व्यवस्थित बनवायला हवेत हीच आमची अपेक्षा आहे, असे न्यायालयाने म्हटले आणि तुरंत समस्येवर तोडगा काढण्याचे आदेश दिले. मुख्य सचिवांनी संबंधित विभागाच्या सचिवांशी बैठक घेतली. बैठकीनंतर मुख्य सचिव…
साकेगाव ता. भुसावळ : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग सहालगत असलेल्या सर्विस रोडवर नुकत्याच एमआयडीसीच्या जलवाहिनीचे काम करण्यात आले होते. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होऊन रस्त्यावर वाहन चालवणे जिकरिचे झाले होते, सदर घटनेची दखल घेत साईमतने वृत्त प्रकाशीत केले होते, या वृत्ताची दखल घेत एमआयडीसी प्रशासनाने रस्त्यावरील चिखल बाजूला करण्यात आला. याबाबत माहीती अशी की, राष्ट्रीय महामार्ग सहालगत असलेल्या सर्विस रोडवर नुकत्याच एमआयडीसीच्या जलवाहिनीचे काम करण्यात आले होते. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होऊन रस्त्यावर वाहन चालवणे जिकरिचे झाले होते. याबाबत साईमत दखल घेत वृत्त प्रकाशित केले होते. सदर प्रकाशीत होताच एमआयडीसी प्रशासनाला खळबळून जाग आली. या वृत्ताची घेऊन महामार्ग सर्विस…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील डांबरी रस्त्यांची होणारी दुर्दशा पाहता आमदार राजुमामा भोळे यांच्या मागणीप्रमाणे रिंगरोड व गणेश कॉलनी परिसरातील पाच रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान, सदर निधी बाबत आ.राजुमामा भोळे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. आ.राजुमामा भोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे शहरातील रस्ता काँक्रिटीकरणासाठी नगरविकास विभागातर्फे पाच कोटींच्या निधीची मागणी केली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने शहरातील रिंगरोड, गणेश कॉलनी, एसएमआयटी आणि अयोध्यानगर भागातील रस्त्यांच्या कामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे आ.राजुमामा भोळे यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांचे आभार मानले आहे.
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांची अमोल जावळे यांनी मुंबई येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. गिरीशभाऊ महाजन यांच्या सोबत सदिच्छा भेट घेतली. युती सरकारच्या काळात कृषी मित्र स्व.हरिभाऊ जावळे यांच्या मागणीची दाखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीच्या माध्यमातून शेळगाव प्रकल्प आता पूर्णत्वाकडे आहे. स्व.हरिभाऊंचे स्वप्न असलेला हा प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल अमोल जावळेंनी या भेटीत त्यांच्या प्रती कृतज्ञता आणि धन्यवाद व्यक्त केले. तसेच यावल – रावेर तालुक्यास वरदान ठरणार्या मेगा रिचार्ज प्रक्ल्पास गती द्यावी यासाठी घातले…