साकेगाव ता. भुसावळ : प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग सहालगत असलेल्या सर्विस रोडवर नुकत्याच एमआयडीसीच्या जलवाहिनीचे काम करण्यात आले होते. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होऊन रस्त्यावर वाहन चालवणे जिकरिचे झाले होते, सदर घटनेची दखल घेत साईमतने वृत्त प्रकाशीत केले होते, या वृत्ताची दखल घेत एमआयडीसी प्रशासनाने रस्त्यावरील चिखल बाजूला करण्यात आला.
याबाबत माहीती अशी की, राष्ट्रीय महामार्ग सहालगत असलेल्या सर्विस रोडवर नुकत्याच एमआयडीसीच्या जलवाहिनीचे काम करण्यात आले होते. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होऊन रस्त्यावर वाहन चालवणे जिकरिचे झाले होते. याबाबत साईमत दखल घेत वृत्त प्रकाशित केले होते. सदर प्रकाशीत होताच एमआयडीसी प्रशासनाला खळबळून जाग आली. या वृत्ताची घेऊन महामार्ग सर्विस रोडलगत चिखल बाजूला करण्यात आला. यामुळे परिसरातील वाहन धारकांमधून साईमत चे आभार व्यक्त करण्यात येत आहे .