मुख्यमंत्र्यांच्या गावात हेलिपॅड ; शाळकरी मुलांना रस्त्याचा त्रास !

0
3

मुंबई : प्रतिनिधी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मूळचे साताऱ्याचे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या गावात दोन हेलिपॅड बनवले. (Helipad in CM’s village)परंतु शाळकरी मुलांना कोयना धरणातून जीवघेणा प्रवास करत अनेक अडचणींवर मात देऊन शाळेत जावे लागते. त्यासाठी रस्त्याचे काम करायला पाहिजे, असे उच्च न्यायालयाने (High Court)गुरुवारी (१४ जुलै) म्हटले. सातारा जिल्ह्यातील खिरवंडी गावातील मुलींचा शिक्षणासाठी सुरु असलेला जीवघेणा प्रवास थांबवावा , शाळकरी मुलांना शिक्षण पूर्ण करता यावे. मुलांना कोणत्याही अडचणींविना शाळा किंवा महाविद्यालयात जाता यावे. यासाठी रस्ते व्यवस्थित बनवायला हवेत हीच आमची अपेक्षा आहे, असे न्यायालयाने म्हटले आणि तुरंत समस्येवर तोडगा काढण्याचे आदेश दिले.

मुख्य सचिवांनी संबंधित विभागाच्या सचिवांशी बैठक घेतली. बैठकीनंतर मुख्य सचिव उपस्थित प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढणारा अहवाल तयार करतील. अहवाल तयार झाल्यानंतर ३० ऑगस्टपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे न्यायालयाने आदेश दिले. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी सुनावणी झाली.

सातारा जिल्ह्यात शिक्षणासाठी मुली जीवघेणा प्रवास करत आहे , हे वृत्त न्यायालयांनी संकेतस्थळावर बघितले. कोणीही तक्रार करण्यासाठी न्यायालयात न जाता न्यायालयाने स्वतः या बातमीची दखल घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलावीत आणि त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले. शाळेत जाण्यासाठी खिरवंडी गावातील मुली शिक्षणासाठी स्वतः होडी चालवून कोयना धरण पार करतात. त्यानंतर, घनदाट जंगल ओलांडून शाळेत पोहचतात. कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद होत्या. परंतु , या गावातील मुली दररोज शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करतात. या समस्येची दखल घेऊन याप्रकरणी याचिका दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here