झाडू हातात देत रस्ता स्वच्छ करण्याची शिक्षा साईमत जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे रस्त्यावर काचेच्या बाटल्या फोडून दहशत निर्माण करणाऱ्या एका माथेफिरू तरुणाला राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या खास शैलीत अद्दल घडवली. या तरुणाला थेट झाडू हातात देऊन स्वतःच्या कृत्यामुळे झालेला कचरा साफ करण्यास भाग पाडण्यात आले. या घटनेची सध्या संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने दारूच्या नशेत कोल्ड्रिंक्सच्या सुमारे २० ते २५ काचेच्या बाटल्या भररस्त्यात फोडल्या होत्या. या प्रकारामुळे संपूर्ण रस्त्यावर काचेचे तुकडे पसरले होते. त्यामुळे वाहनांचे टायर पंक्चर होणे, तसेच पादचाऱ्यांना चालताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण…
Author: saimat
प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सात वर्षांपासून छळ; SOG पोलिसांकडून आरोपीला अटक साईमत / सूरत सूरत शहरातील सिटीलाइट परिसरातून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. जिममध्ये वर्कआउटसाठी जाणाऱ्या एका प्रतिष्ठित आणि श्रीमंत कुटुंबातील महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचा गैरफायदा घेत ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलिसांनी एका जिम ट्रेनरला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शब्बीर असगर ट्रंकवाला असे आरोपीचे नाव असून तो संबंधित जिममध्ये ट्रेनर म्हणून कार्यरत होता. त्याने महिलेचा विश्वास संपादन करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि सुमारे सात वर्षांपासून तिच्याशी संपर्क ठेवला. दरम्यान, या संबंधांमुळे महिलेच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाला. संशय वाढल्यानंतर पतीने संबंधित ट्रेनरशी संवाद साधण्याचा…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: जळगाव रेल्वे स्थानकावर अभिवादन सोहळा साईमत जळगाव प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे जळगाव रेल्वे स्थानक परिसरातील त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित समाजबांधवांनी बाबासाहेबांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक वंदन करत त्यांचे विचार आत्मसात करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच भारतीय संविधान निर्मितीतील महान योगदानाची सविस्तर आठवण करून देण्यात आली. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजात समानता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांची जोपासना करण्याचा सामूहिक संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. तसेच, कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा…
कराची–ओरमारा–ग्वादर किनारपट्टीवर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र चाचणीचा संशय; भारताने २४ तास आधीच समुद्रात वाढवली नजर साईमत / नवी दिल्ली अरबी समुद्रात पाकिस्तानकडून सुरू असलेल्या संशयास्पद लष्करी हालचालींवर भारताने तत्काळ आणि निर्णायक पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. पाकिस्तान एका गुप्त क्षेपणास्त्र चाचणीच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त होत असतानाच भारतीय नौदलाने अत्याधुनिक क्षेपणास्त्र ट्रॅकिंग प्रणालीने सुसज्ज असलेली युद्धनौका ‘आयएनएस ध्रुव’ अरबी समुद्रात तैनात करून संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. पाकिस्तानने १४ आणि १५ एप्रिलदरम्यान कराची, ओरमारा, ग्वादर आणि सोनमियानी या किनारपट्टी भागात विस्तृत सागरी क्षेत्र ‘प्रतिबंधित झोन’ म्हणून जाहीर केले होते. सुमारे ४१५ ते ४५० किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या लष्करी किंवा क्षेपणास्त्र…
एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतत सतर्क असतानाच, दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा आणि धारदार कोयता बाळगून फिरणाऱ्या दोन तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने अटक केली. या कारवाईत पोलिसांनी दुचाकीसह एकूण ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात दोन संशयित तरुण घातक शस्त्रांसह फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांना १४ एप्रिल रोजी प्राप्त झाली होती. या माहितीची तातडीने दखल घेत त्यांनी गुन्हे शोध पथकाला सापळा रचण्याचे आदेश दिले. सापळा रचून पाठलागपोलिसांनी कासमवाडी ते नेरी नाका दरम्यान एकता चौकातील मोकळ्या…
साईमत / नाशिक नाशिकमध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेमुळे शहर हादरले आहे. नाशिकच्या विल्होळी परिसरात एका तरुणाची भररस्त्यात दगडाने व कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एका महिला आणि एका पुरुषाने मिळून तरुणावर जीवघेणा हल्ला केला. सुरुवातीला तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्यात आली, त्यानंतर त्याला दगडाने ठेचण्यात आले आणि कोयत्याने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला…
साईमत / वृत्तसंस्था इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धबंदीबाबतची पहिली बैठक निष्फळ ठरल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, दुसऱ्या फेरीतील चर्चेत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात असून, या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा करत सांगितले की, दुसऱ्या शांतता चर्चेसाठी इराणकडून संपर्क साधण्यात आला आहे. तसेच अमेरिकेने इराणवर कडक आर्थिक नाकेबंदी लागू केली असून, कोणत्याही प्रकारचा व्यापार करण्यास मर्यादा घालण्यात आल्या आहेत. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, इराणकडे कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे असू नयेत, हीच अमेरिकेची भूमिका राहणार आहे. “जगाला ब्लॅकमेल करण्याची परवानगी कोणालाही दिली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी…
साईमत / ठाणे शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी खऱ्या अर्थाने ‘आधार’ ठरत आहे. ठाणे जिल्ह्यात आर्थिक वर्षात तब्बल २ हजार ५१४ रुग्णांना सुमारे २१ कोटी ७४ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया आणि अर्जांचा तातडीने निपटारा यांसारखे महत्त्वाचे सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. याशिवाय, सामंजस्य करार (MoU) आणि क्राउड फंडिंगच्या माध्यमातून विविध रुग्णालये, धर्मादाय संस्था व दात्यांचे सहकार्यही मिळत आहे. त्यामुळे निधी वितरणात पारदर्शकता वाढून मदतीचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. या निधीतून कॉक्लियर इम्प्लांट (२ ते…
साईमत / अमरावती अमरावती जिल्ह्यात धक्कादायक प्रकार समोर आला असून एका तरुणाने प्रेमाच्या बहाण्याने अनेक तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने अनेक तरुणींशी मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन केला आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करत लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जवळपास २०० मुलींचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल जप्त केला असून त्यामध्ये अनेक धक्कादायक व्हिडिओ आढळल्याची माहिती आहे. आरोपी स्वतःच हे व्हिडिओ चित्रित करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. हे…
साईमत / जळगांव गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. जळगावमधील सराफ बाजारात आठवड्याच्या सुरुवातीलाच दर घसरले होते, मात्र दुसऱ्याच दिवशी दोन्ही मौल्यवान धातूंनी जोरदार वाढ नोंदवली. या अचानक बदलामुळे लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याचे संकेत मिळाल्यामुळे सोने-चांदीला पुन्हा तेजी मिळाली आहे. यापूर्वी होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या निर्णयामुळे जागतिक स्तरावर तणाव वाढला होता, ज्याचा परिणाम म्हणून दरात घसरण झाली होती. मात्र आता परिस्थितीत सकारात्मक बदल दिसून येत आहे. आज मंगळवारी सकाळी बाजार उघडताच जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या…