Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jalgaon : कट्टा-कोयत्याच्या जोरावर दहशत पसरवणारे दोघे जेरबंद
    क्राईम

    Jalgaon : कट्टा-कोयत्याच्या जोरावर दहशत पसरवणारे दोघे जेरबंद

    saimatBy saimatApril 15, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई

    साईमत जळगाव प्रतिनिधी


    शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतत सतर्क असतानाच, दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा आणि धारदार कोयता बाळगून फिरणाऱ्या दोन तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने अटक केली. या कारवाईत पोलिसांनी दुचाकीसह एकूण ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात दोन संशयित तरुण घातक शस्त्रांसह फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांना १४ एप्रिल रोजी प्राप्त झाली होती. या माहितीची तातडीने दखल घेत त्यांनी गुन्हे शोध पथकाला सापळा रचण्याचे आदेश दिले.

    सापळा रचून पाठलाग
    पोलिसांनी कासमवाडी ते नेरी नाका दरम्यान एकता चौकातील मोकळ्या मैदानात सापळा रचला. याच वेळी पल्सर दुचाकीवरून दोन तरुण येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा दिला असता, त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून दोघांनाही पकडण्यात यश मिळवले.

    शस्त्रांसह अटक; मुद्देमाल जप्त
    तपासणीदरम्यान आरोपींकडून एक गावठी बनावटीचा कट्टा, एक धारदार लोखंडी कोयता तसेच कट्ट्याचे रिकामे मॅगझिन जप्त करण्यात आले. पोलिसांनी रोहित गोपाळ कुंवर (वय २२, रा. कासमवाडी) आणि सागर रामा सोनवणे (वय २१, रा. मेहरूण परिसर) यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे २० हजार रुपयांचा कट्टा, ५० हजार रुपयांची दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    दरम्यान, न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत. शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम घालण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव महापालिकेत आनंदोत्सव; स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर जल्लोष

    April 15, 2026

    मोठी कारवाई! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, युपीची अट्टल ATM चोर टोळी जेरबंद

    April 15, 2026

    Jalgaon : जळगावात महामार्ग अतिक्रमणांवर महापालिकेचा मोठा ‘हातोडा’ अजिंठा चौकातील भंगार बाजार हटवण्याचा निर्णय

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.