Author: saimat

जळगावला दिलासा: टँकर नाही, पाणी-वीज सेवा सुरळीत ठेवण्यावर भर साईमत जळगाव प्रतिनिधी उन्हाळ्याच्या तीव्रतेत नागरिकांना पाणी व वीज या अत्यावश्यक सेवांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून अखंडित सेवा द्यावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील  यांनी दिले आहेत. जिल्हा नियोजन सभागृहात पाणीटंचाई व महावितरणशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री उपस्थित होते. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांचे पदाधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले की, पाणीपुरवठा योजनांच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित…

Read More

साईमत / जळगांव जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. गुरुवारी (१६ एप्रिल) मोसमातील सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र ही परिस्थिती अजून तीव्र होण्याची शक्यता असून पुढील ४८ तास अधिक कठीण ठरणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १७ आणि १८ एप्रिल रोजी तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. उष्णतेची ही लाट पुढील काही दिवसांनंतर हवामानातील बदलांसोबत कमी होण्याची शक्यता…

Read More

धक्कादायक प्रकार अंतिम सामन्यात थेट मैदानावर नांगर फिरवल साईमत धरणगाव प्रतिनिधीजळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे सुरू असलेल्या ‘जळगाव ग्रामीण आमदार चषक’ क्रिकेट स्पर्धेला रविवारी अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक वळण लागले. अंतिम सामना सुरू असताना अचानक एका व्यक्तीने ट्रॅक्टर घेऊन थेट मैदानात प्रवेश केला आणि हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळपट्टीवर नांगर फिरवून संपूर्ण सामना विस्कळीत केला. या घटनेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंतिम सामना अत्यंत चुरशीच्या वातावरणात सुरू होता. खेळाडू विजयासाठी पूर्ण ताकदीने झुंज देत होते, तर प्रेक्षक उत्साहात सामना अनुभवत होते. मात्र काही क्षणांतच एका ट्रॅक्टरने मैदानात प्रवेश करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुरुवातीला…

Read More

साईमत / वृत्तसंस्था इंडोनेशियामध्ये एक भीषण हेलिकॉप्टर अपघात घडला असून यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या सुमारे २४ तास आधीच हेलिकॉप्टरचा रडारशी संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मिळालेल्या व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरचे तुकडे झाल्याचे दिसून येत आहे. जंगलात कोसळल्यानंतर प्रशासनाने तत्काळ बचाव आणि मदतकार्य हाती घेतले. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, बोर्नियो बेटावरील पाम तेलाच्या मळ्यांवरून उड्डाण करत असताना ही दुर्घटना घडली. रडार संपर्क तुटल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. संबंधित हेलिकॉप्टर एअरबस H130 मॉडेलचे असून ते पीटी मॅथ्यू एअर नुसंतारा या कंपनीच्या मालकीचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हेलिकॉप्टर नेमके कुठे जात होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सीएनएन इंडोनेशियाच्या वृत्तानुसार, उड्डाणासाठी सुमारे…

Read More

साईमत / जळगांव राज्यातील एसटी प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने आज महत्त्वपूर्ण घोषणा करत येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापूर दौऱ्यात दिली. यासोबतच, एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल ८ हजार नव्या बसची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बस टप्प्याटप्प्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दाखल होणार असून त्यामुळे एसटी सेवेत लक्षणीय वाढ होणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे बस स्थानकांवरील कॅन्टीनमध्ये माफक दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे. आता कॅन्टीनमध्ये ३० रुपयांत चहा-नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे.…

Read More

लाचखोरी प्रकरणानंतर नाईक बडतर्फ, निरीक्षकांची तातडीने बदली साईमत जळगाव प्रतिनिधीशहरातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आणि त्यातच उघडकीस आलेल्या भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणामुळे शनिपेठ पोलीस ठाण्यावर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कठोर भूमिका घेत पोलीस नाईक विनोद अहिरे याला सेवेतून थेट बडतर्फ केले असून, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शनिपेठ परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनांमुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, पोलीस नाईक विनोद अहिरे याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले.…

Read More

सार्वजनिक जागेच्या वादातून रक्तरंजित हल्ला; सासू-सुनेवर कुऱ्हाडीने प्राणघातक वार साईमत जळगाव प्रतिनिधी   किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद कधी हिंसक वळण घेतो, याचे धक्कादायक उदाहरण जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे समोर आले आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक जागेवर कुंपण घालण्यावरून झालेल्या वादातून एका ६२ वर्षीय वृद्ध महिला आणि त्यांच्या सुनेवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगलबाई गोपीचंद सपकाळे (वय ६२, रा. नांद्रा खुर्द) यांनी आरोपी सचिन ज्ञानेश्वर सोनवणे याला ग्रामपंचायतीच्या येण्या-जाण्याच्या सार्वजनिक जागेवर कुंपण घालण्यास मज्जाव केला होता. “येथे कुंपण घालू नको,” असे…

Read More

शासनाच्या आरोग्य योजनांअंतर्गत गंभीर आजारांवरील उपचारासाठी मोठा दिलासा; राज्यभरात ४० हजारांहून अधिक रुग्णांना लाभ साईमत / जळगांव शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हा मोठा आधार ठरत आहे. जळगाव जिल्ह्यात या आर्थिक वर्षात तब्बल १६१० रुग्णांना सुमारे १३ कोटी ३३ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून या योजनेत जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया तसेच अर्जांचा तातडीने निपटारा यांसारखे महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मदत वितरण प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक झाली आहे. या योजनेत सामंजस्य करार, क्राउड फंडिंग तसेच धर्मादाय रुग्णालये…

Read More

साईमत / दिल्ली दिल्ली विमानतळावर मोठी धक्कादायक घटना घडली आहे. स्पाईसजेट आणि अकासा एअर या दोन विमानांच्या पंखांची टक्कर झाल्याने विमानसेवा काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकासा एअरचे QP 1406 हे विमान दिल्लीहून हैदराबादला जाण्यासाठी सज्ज होते. त्याच वेळी दुसऱ्या विमानामुळे या विमानाच्या पंखाला धडक बसली. ही घटना टॅक्सींगदरम्यान घडल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर तातडीने सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. विमानतळावरील उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली आहेत. अकासा एअरच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. त्यांना हैदराबादला पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. दुसरीकडे, स्पाईसजेटच्या…

Read More

जळगाव हादरले भोंदूबाबा आणि पोलीस पत्नीचा अघोरी पूजेच्या नावाखाली ११ लाखांचा गंडा साडेतीन वर्षांनंतरही आरोपी फरार साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरात अघोरी विद्या, करणी-बाधा दूर करण्याचे तसेच गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिला ग्राफिक डिझायनरची तब्बल ११ ते १२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील विशेष गंभीर बाब म्हणजे आरोपींमध्ये एका भोंदू बाबासोबतच त्याची पोलीस दलात कार्यरत असलेली पत्नीही सहभागी असल्याचे समोर आले आहे. गुन्हा दाखल होऊन साडेतीन वर्षे उलटली तरी आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे पीडित महिलेने थेट जळगाव पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला…

Read More