मध्यरात्री घडलेल्या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण; महिला प्रवाशांना लक्ष्य करत दागिन्यांची चोरी साईमत / सातारा काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील कराड येथे सह्याद्री एक्सप्रेसवर घडलेल्या दरोड्यासारखीच घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. यावेळी परभणी जिल्ह्यातील मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ काकीनाडा साईनगर एक्सप्रेस (गाडी क्रमांक १७२०६) वर दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्री ही गाडी परभणीच्या दिशेने येत असताना, अज्ञात चोरट्यांनी रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाड केल्याने सिग्नलचा लाल दिवा लागला आणि ट्रेन थांबली. ही संधी साधत दरोडेखोरांनी थांबलेल्या ट्रेनमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी जनरल आणि एस-४ डब्यात शिरून थेट प्रवाशांना लक्ष्य केले. विशेषतः महिला प्रवाशांकडील सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या…
Author: saimat
महामार्ग मोकळा करण्यासाठी कठोर पाऊल; कारवाईदरम्यान नागरिक संतप्त साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने गुरुवारी आक्रमक भूमिका घेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली. महानगरपालिका, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू केलेल्या या कारवाईमुळे शहरात दिवसभर खळबळ उडाली. मात्र, या मोहिमेदरम्यान ठिकठिकाणी वाद आणि गोंधळाचे प्रसंगही उभे राहिले. कारवाईची सुरुवात अजिंठा चौफुलीजवळील कब्रस्थान परिसरातून करण्यात आली. सुरुवातीलाच एका चारचाकी वाहनावर कारवाई करताना संबंधितांनी तीव्र विरोध दर्शविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पथकाने वाहन ट्रॅक्टरमध्ये टाकण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त नागरिकांनी आक्षेप घेतला. परिस्थिती…
PLFS अहवालातून धक्कादायक वास्तव; महिलांमध्ये बेरोजगारी जास्त, कामगार सहभागात घट साईमत / नवी दिल्ली जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर देशातील रोजगारस्थिती अधिकच चिंताजनक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI) यांच्या पिरिओडीक लेबर फोर्स सर्वे (PLFS) च्या ताज्या अहवालानुसार, मार्च महिन्यात बेरोजगारीच्या दरात वाढ नोंदवली गेली असून, त्यातही तरुण वर्ग सर्वाधिक प्रभावित झाल्याचे दिसून येते. अहवालानुसार, 15 ते 29 वयोगटातील बेरोजगारीचा दर मार्चमध्ये 15.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. फेब्रुवारीत हा दर 14.8 टक्के होता. म्हणजेच अल्पावधीतच बेरोजगारीत वाढ झाली असून, गेल्या नऊ महिन्यांतील हा सर्वोच्च स्तर ठरला आहे. याआधी जून 2025 मध्ये हा दर 15.3 टक्क्यांवर होता. एकूण…
जळगावात महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; संच वाटप केंद्रावर रंगेहात पकड साईमत जळगाव प्रतिनिधी लहानशी वाटणारी १०० रुपयांची लाच अखेर मोठ्या गैरप्रकाराचा पर्दाफाश ठरली. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळांतर्गत मिळणाऱ्या गृह उपयोगी वस्तूंच्या संचासाठी ‘केवायसी’ करण्याच्या नावाखाली लाच स्वीकारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या कारवाईत टेबलाखालून तब्बल ४१ हजार २५० रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आल्याने प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शासनाकडून बांधकाम मजुरांना गृह उपयोगी वस्तूंचे संच वाटप केले जातात. यासाठी तक्रारदाराने ९ एप्रिल रोजी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानंतर १५ एप्रिल रोजी चिंचोली (ता. जि. जळगाव) येथील केंद्रावर संच घेण्यासाठी…
जळगाव मनपात ७ नव्या स्वीकृत नगरसेवकांची एन्ट्री साईमत जळगाव प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या जळगाव शहर महानगरपालिकेतील ७ स्वीकृत नगरसेवक पदांचा राजकीय पेच अखेर सुटला असून, बुधवारी (दि. १५ एप्रिल) झालेल्या विशेष महासभेत सर्वपक्षीय उमेदवारांची एकमताने निवड करण्यात आली. या निर्णयामुळे महापालिकेतील राजकीय वातावरणात सुरू असलेली अनिश्चितता संपुष्टात आली आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष महासभेत भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवड प्रक्रियेत कोणताही विरोध नोंदवला न जाता सर्व सदस्यांची सहमतीने निवड झाल्याने ही सभा विशेष ठरली. नवीन नियुक्तीनुसार भारतीय जनता पक्षाकडून डॉ. राधेश्याम चौधरी,…
वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी महापालिका–पोलीस प्रशासनाची संयुक्त मोहीम; तीन दिवसांत मोठी कारवाई साईमत जळगाव प्रतिनिधी शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गांवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण झालेल्या गंभीर वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेत झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत या मोहिमेचे सविस्तर नियोजन करण्यात आले. या बैठकीला स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, उपायुक्त पंकज गोसावी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले, नगरसेवक अरविंद देशमुख, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा तसेच ‘NHAI’चे राहुल पाटील आणि अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर उपस्थित होते. महामार्गावरील नेरी नाका…
शालार्थ घोटाळ्याचा तपास वेगात १८ एप्रिलपर्यंत हजर राहण्याचे आदेश साईमत जळगाव प्रतिनिधी राज्यासह जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडवणाऱ्या शालार्थ घोटाळा प्रकरणात नाशिक एसआयटीने तपासाची गती अधिक तीव्र केली असून जळगाव जिल्ह्यातील ४८ शिक्षण अधिकारी व कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या सर्वांना १८ एप्रिलपर्यंत नाशिक विभागीय मंडळ कार्यालयात हजर राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण यांच्या मार्फत या नोटिसा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. यामध्ये जळगावच्या माध्यमिक शिक्षण विभागातील आजी-माजी शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २०२५ मध्ये…
विनापरवाना वाहन विक्रीचा धक्कादायक प्रकार उघड आरटीओ चौकशीची मागणी तीव्र साईमत भुसावळ प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात मोटार वाहन कायद्याचे उघड उल्लंघन करत काही वाहन विक्री शोरूम्स आणि डिलर्सकडून बेकायदेशीर दुचाकी विक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विनापरवाना व्यवसाय, ट्रेड सर्टिफिकेटशिवाय वाहनांचे प्रदर्शन आणि विक्री, तसेच नोंदणी पूर्ण होण्यापूर्वीच वाहनांची डिलिव्हरी दिली जात असल्याच्या तक्रारीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भुसावळ येथील प्रतिनिधींच्या माहितीनुसार, माहिती अधिकारातून मिळालेल्या तपशीलांच्या आधारे तक्रारदार मयुरेश निंभोरे यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत जिल्ह्यातील अनेक दुचाकी वितरक आणि शोरूम्स कोणताही वैध परवाना न घेता व्यवसाय करत असल्याचा आरोप करण्यात आला…
बॅटरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या शास्त्री टॉवर चौकातील बसस्थानकाजवळ बुधवारी (दि. १५ एप्रिल) दुपारी २ वाजेच्या सुमारास धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जागरूक नागरिक आणि तरुणांच्या तत्परतेमुळे कारमधील दाम्पत्याचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरातील हरिओम नगर येथे राहणारे प्रकाश चिंधा पाटील हे आपल्या पत्नीसह (क्रमांक एमएच १९ बीयू ७५६२) कारने जळगाव शहरातून छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या दिशेने जात होते. शास्त्री टॉवर चौकातून वाहन जात असताना अचानक कारच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. धूर दिसताच रस्त्यावरील…
साईमत / जळगाव जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानाचा पारा सलग काही दिवसांपासून ४२ अंश सेल्सिअसच्या वर स्थिर आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यातच उन्हाने तीव्र रूप धारण केल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते पूर्णपणे ओस पडत असून जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवू लागतो. विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाची तीव्रता अधिकच वाढत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. मागील २४ तासांत कमाल तापमान ४२.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून किमान तापमान २४.३ अंशांवर स्थिर आहे. त्यामुळे…