Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»Jamner : रस्त्यावर काचा फोडणाऱ्या तरुणाला मंत्री गिरीश महाजनांनी ‘अनोखी अद्दल
    जामनेर

    Jamner : रस्त्यावर काचा फोडणाऱ्या तरुणाला मंत्री गिरीश महाजनांनी ‘अनोखी अद्दल

    saimatBy saimatApril 15, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     झाडू हातात देत रस्ता स्वच्छ करण्याची शिक्षा

    साईमत जामनेर प्रतिनिधी

    जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे रस्त्यावर काचेच्या बाटल्या फोडून दहशत निर्माण करणाऱ्या एका माथेफिरू तरुणाला राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या खास शैलीत अद्दल घडवली. या तरुणाला थेट झाडू हातात देऊन स्वतःच्या कृत्यामुळे झालेला कचरा साफ करण्यास भाग पाडण्यात आले. या घटनेची सध्या संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने दारूच्या नशेत कोल्ड्रिंक्सच्या सुमारे २० ते २५ काचेच्या बाटल्या भररस्त्यात फोडल्या होत्या. या प्रकारामुळे संपूर्ण रस्त्यावर काचेचे तुकडे पसरले होते. त्यामुळे वाहनांचे टायर पंक्चर होणे, तसेच पादचाऱ्यांना चालताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.

    योगायोगाने मंत्री गिरीश महाजन हे एका कार्यक्रमानिमित्त पळासखेडा येथे उपस्थित होते. रस्त्यावर पडलेला काचांचा खच आणि ग्रामस्थांची गैरसोय लक्षात येताच गावकऱ्यांनी त्यांचा ताफा थांबवून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर मंत्री महाजन यांनी तत्काळ गाडीतून उतरून घटनास्थळी पाहणी केली.

    परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्यांनी संबंधित तरुणाला तातडीने बोलावून घेतले. “ज्या काचा तू फोडल्या आहेत, त्या आधी स्वतः साफ कर,” असा स्पष्ट आणि कठोर आदेश त्यांनी दिला. तसेच पोलिसांना कळवण्यापूर्वी त्या तरुणाला झाडू हातात देण्यात आला.

    भररस्त्यात, ग्रामस्थ आणि उपस्थितांच्या समोर त्या तरुणाने स्वतः फोडलेल्या काचा झाडून रस्ता स्वच्छ केला. या अनोख्या शिक्षेमुळे काही वेळातच परिसर पुन्हा सुरक्षित आणि स्वच्छ झाला.

    रस्ता पूर्णपणे स्वच्छ झाल्यानंतरच संबंधित तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, मंत्री महाजन यांच्या या कृतीबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगाव जिल्ह्यात आठ नवीन ग्रामपंचायतींना शासनाची मान्यता

    April 7, 2026

    Jamner : फत्तेपूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मका शेत जळून खाक

    April 6, 2026

    Jamner : जुन्या वादातून महिलेवर विनयभंग; दोन भावंडांविरोधात गुन्हा

    April 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.