Author: saimat

शेतीसह संसार उद्ध्वस्त; पावरी कुटुंबावर संकटाचा डोंगर साईमत भुसावळ प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील तळवेल परिसरात रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास महामार्गालगत असलेल्या पाटील वॉशिंग सेंटर परिसरात भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. या आगीत पावरी कुटुंबाचे संपूर्ण झोपडीवजा घर आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, आईच्या प्रसंगावधानामुळे दोन चिमुकल्यांचे प्राण थोडक्यात बचावले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुऱ्हानपूर येथील निलेश चव्हाण (पावरी) हे कुटुंबासह येथे शेतमजुरीसाठी वास्तव्यास होते. घटनेच्या वेळी त्यांच्या पत्नी झोपडीत दोन लहान मुलांसह—दोन वर्षांचा मुलगा आणि सहा महिन्यांची मुलगी—गाढ झोपेत होत्या. अचानक झोपडीला आग लागल्याचे लक्षात येताच,…

Read More

 नंदुरबार शहरात खळबळ, उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल साईमत नंदुरबार प्रतिनिधी शहरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या भयंकर हल्ल्यात २५ वर्षीय तरुणाचा डोक्यात वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली असून उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सागर रमेश जाधव (कैकाडी), वय २५, रा. रायसिंगपुरा, नंदुरबार असे मृत तरुणाचे नाव आहे. तो नंदुरबार शहरातील तळोदा रोडवरील मंदाकिनी हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काही वर्षांपासून कार्यरत होता. फिर्यादी कुणाल सदाशिव मराठे (रा. श्रीजी कॉलनी, नंदुरबार) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदाकिनी हॉटेलचे मालक जय वळवी यांच्या खुनाच्या प्रकरणात कारागृहात असताना हॉटेल सुरू ठेवण्याच्या कारणावरून वाद निर्माण…

Read More

दुपारच्या वेळेत रस्ते ओस; उकाड्यात वाढ, हवामान खात्याने आणखी तापमान वाढीचा इशारा साईमत / जळगाव एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा संपताच जळगाव जिल्ह्यात उष्णतेने आपला कडाका वाढवला असून शहराने पुन्हा एकदा ‘हॉट शहर’ अशी ओळख ठळक केली आहे. गेल्या दोन दिवसांत तापमानात तब्बल ५ अंशांहून अधिक वाढ होऊन पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुलनेने सौम्य असलेली उष्णता आता प्रचंड तीव्र झाली आहे. गुरुवारी जळगावचे कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. मात्र अवघ्या ४८ तासांतच तापमानात मोठी वाढ होऊन शनिवारी ते ४१ अंशांवर पोहोचले. कोरड्या हवेमुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्र जाणवत आहेत. सकाळी १० वाजल्यानंतरच उन्हाचे चटके…

Read More

साईमत / बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील दगडवाडी येथे मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली. कारभारी नागरे यांच्या घराला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि घरात ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा घरात कोणीही उपस्थित नव्हते. मात्र शेजारील व्यक्ती बाहेर गेली असता त्यांना घरातून धूर आणि ज्वाळा दिसून आल्या. त्यांनी तातडीने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना सावध केले. त्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाले आणि मदतीसाठी धावले. स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला असता परिस्थिती अचानक गंभीर बनली. आगीच्या तीव्रतेमुळे घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे घरावरील टिनपत्रे व मोठे दगड दूरवर फेकले गेले…

Read More

६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास ८३ हजारांहून अधिक किमतीचा ऐवज गायब साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील कासमवाडी परिसरातील आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे बाजार परिसरात एकच खळबळ उडाली असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्युत कॉलनी परिसरातील रहिवासी बाली भरतसिंग राजपूत (वय ६२) या शनिवारी, ११ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५:३० वाजता कासमवाडी येथील आठवडे बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या. नेहमीप्रमाणे बाजारात मोठी गर्दी असल्याने चोरट्यांनी याच गर्दीचा अचूक फायदा घेतला. खरेदीदरम्यान अज्ञात चोरट्याने अत्यंत हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची…

Read More

केमिकल टँकरचा ताबा सुटल्याने सहा वाहनांना धडक; तिघे गंभीर जखमी साईमत धुळे प्रतिनिधी धुळे–शिरपूर महामार्गावर आज दुपारी झालेल्या भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली. नियंत्रण सुटलेल्या केमिकल टँकरने तब्बल सहा वाहनांना जोरदार धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाले असून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सोनगीर फाट्याजवळ घडलेल्या या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीचा अक्षरशः खोळंबा झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात दुपारी साधारण २ वाजण्याच्या सुमारास घडला. शिरपूरकडून धुळ्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या रसायनाने भरलेल्या टँकरचा चालकाचे नियंत्रण अचानक सुटले. त्यानंतर टँकरने उड्डाणपुलाखालील परिसरात अक्षरशः धडका देण्याची मालिका सुरू केली. या भीषण घटनेत टँकरने प्रथम एका शीतपेय विक्री केंद्राला…

Read More

शहरात बिबट्याचा धुमाकूळ पोलीस-वनविभाग सतर्क साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी  शहराच्या मध्यवर्ती भागात बिबट्या घुसल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली असून, या घटनेमुळे संपूर्ण मुक्ताईनगरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळपासूनच विविध भागांत बिबट्या फिरत असल्याच्या बातम्या व अफवा वाऱ्यासारख्या पसरल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काही ठिकाणी प्रत्यक्षदर्शींनी बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले आहे. काही भागांत त्याच्या हालचालींचे ठसे आणि संकेतही आढळून आले आहेत. ही माहिती समोर येताच नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले असून, बाजारपेठेतही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालक अधिक सतर्क झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी…

Read More

जगभर घुमणारा आवाज शांत आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली साईमत/ मुंबई/ प्रतिनिधी   भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या अद्वितीय आवाजाने आणि बहारदार गायकीने अजरामर ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वाने एक तेजस्वी तारा गमावला असून, ‘पडद्यावरचा आवाज’ कायमचा हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील Breach Candy Hospital येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या सायंकाळी ४ वाजता मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ८ सप्टेंबर १९३३ रोजी जन्मलेल्या आशा भोसले यांनी तब्बल सात दशकांहून…

Read More

 कार्ड सेवा विस्कळीत, रांगा लांबच लांब पिण्याच्या पाण्याअभावी प्रवासी त्रस्त साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर बसविण्यात आलेली एनसीएमसी (National Common Mobility Card) मशीन वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. डिजिटल सुविधांचा लाभ घेण्यासाठी बसस्थानकावर येणाऱ्या नागरिकांना मात्र प्रत्यक्षात त्रासदायक अनुभवाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. कार्ड काढणे, रिचार्ज करणे किंवा इतर सेवा घेण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने प्रवासी बस स्थानकावर येत असतात. मात्र मशीन वारंवार बंद पडत असल्याने संपूर्ण कामकाज ठप्प होते. परिणामी, नागरिकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत तासन्तास उभे राहिल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत…

Read More

फुले यांच्या विचारांना अभिवादन जळगावात उत्साहाचे वातावरण साईमत जळगाव प्रतिनिधी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे ११ एप्रिल रोजी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजप्रबोधन, शिक्षणाचा प्रसार आणि समतेचा संदेश देणाऱ्या फुले यांच्या कार्याला यावेळी अभिवादन करण्यात आले. शहरातील फुले मार्केट परिसरातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी फुले यांच्या कार्याची उजळणी करत त्यांच्या विचारांचे आजच्या समाजातील महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी सांगत, वंचित व शोषित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फुले यांनी केलेल्या कार्याचे स्मरण केले. कार्यक्रमात…

Read More