Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»प्रेमाचे नाटक, शोषणाचा खेळ! अमरावतीतील धक्कादायक प्रकरण उघड
    क्राईम

    प्रेमाचे नाटक, शोषणाचा खेळ! अमरावतीतील धक्कादायक प्रकरण उघड

    saimatBy saimatApril 14, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत / अमरावती

    अमरावती जिल्ह्यात धक्कादायक प्रकार समोर आला असून एका तरुणाने प्रेमाच्या बहाण्याने अनेक तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

    परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने अनेक तरुणींशी मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन केला आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करत लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जवळपास २०० मुलींचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल जप्त केला असून त्यामध्ये अनेक धक्कादायक व्हिडिओ आढळल्याची माहिती आहे. आरोपी स्वतःच हे व्हिडिओ चित्रित करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. हे व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले आहे.

    दरम्यान, या घटनेवरून राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार अनिल बोंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच, आरोपीला त्वरित अटक न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता.

    यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत आरोपीला अटक केली असून न्यायालयात हजर केले आहे. पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Nashik Crime : थरारक घटना! नाशिकमध्ये भरदिवसा महिलेकडून तरुणाचा खून; आधी दगड, मग कोयत्याने सपासप वार

    April 14, 2026

    Shirur : शिरूर बायपास परिसरात एमडी विक्रीप्रकरणी अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या जाळ्यात

    April 13, 2026

    Dombivali Crime : गाडी बाजूला घेण्याच्या वादातून कार चालक व मित्रावर दगडांनी प्राणघातक हल्ला

    April 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.