बॅनर-झेंड्यांवरही कडक नियम जळगावात आंबेडकर जयंतीनिमित्त प्रशासन सक्रिय साईमत जळगाव प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी, १४ एप्रिल २०२६ रोजी जळगाव शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाचे निर्बंध लागू केले आहेत. या निर्णयामुळे शहरातील डेली बाजार तसेच काही भागांतील साप्ताहिक आठवडे बाजार पूर्णपणे बंद राहणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील प्रमुख रस्त्यांवरील डेली बाजार आणि हरी विठ्ठल नगर तसेच खंडेराव नगर परिसरातील आठवडे बाजार मिरवणुकीच्या दिवशी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचा आदेश उपायुक्त पंकज गोसावी यांनी जारी केला आहे. मिरवणुकीदरम्यान नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक सुरळीत राहणे आणि आपत्कालीन…
Author: saimat
कडाक्याच्या उन्हात २५० जार पाण्याचा दिलासा साईमत पाळधी प्रतिनिधी पाळधी रेल्वे स्थानक येथे तांत्रिक कारणांमुळे तब्बल तीन तास खोळंबलेल्या उधना-हसनपूर एक्सप्रेस मधील प्रवाशांसाठी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी तत्काळ पुढाकार घेत ‘माणुसकीचा आदर्श’ घालून दिला. कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या प्रवाशांना त्यांनी तातडीने २५० पाण्याचे जार उपलब्ध करून देत मोठा दिलासा दिला. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी स्थानकावर सकाळी ११ वाजता उधना ते हसनपूर दरम्यान धावणारी ही रेल्वे गाडी रेल्वे लाईन क्लिअर नसल्यामुळे थांबवण्यात आली होती. सुरुवातीला काही मिनिटांचा वाटणारा हा थांबा तब्बल तीन तास लांबला आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. उन्हाचा पारा चढलेला असल्याने लहान मुले, महिला…
साईमत / जळगांव भारतीय हवामान विभागाने (IMD) आज नैऋत्य मान्सून 2026 चा पहिला अधिकृत दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून, यावर्षी देशात सरासरीच्या सुमारे 92 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा अंदाज सरासरीपेक्षा कमी पावसाच्या श्रेणीत मोडतो. हवामान विभागानुसार 90 ते 95 टक्के पाऊस झाल्यास तो सामान्यपेक्षा कमी पाऊस मानला जातो. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. महाराष्ट्रातही कमी पावसाचा अंदाज : राज्यातही यावर्षी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या सर्व भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात 90 ते 95 टक्के पर्जन्य होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान स्थिती मिश्र राहणार :…
भुयारी गटार जोडणीत उदासीन नागरिकांवर दुप्पट दंड; मनपा ताफ्यात ‘इलेक्ट्रिक’ वाहनांचा समावेश साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका आता महसूल वाढवण्यासाठी आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारताना दिसत आहे. मोबाईल टॉवर कंपन्यांकडील तब्बल २८ कोटी रुपयांच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी थेट जप्ती आणि सीलिंगची कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात सोमवारी सकाळी ११ वाजता स्थायी समितीची विशेष सभा पार पडली. सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, सदस्य आणि विभागप्रमुख उपस्थित होते. मोबाईल टॉवर थकबाकीवर कठोर भूमिका शहरातील विविध मोबाईल…
साईमत / मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण ७ महत्त्वाचे आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विविध विभागांचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील प्रशासनिक सुधारणा, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, आरोग्य व्यवस्था आणि ग्रामीण विकासाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एमपीएससी भरती प्रक्रियेत मोठी सुधारणा : राज्य शासन सेवेतील पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध सेवांतील संवर्गांची संख्या ५३ वरून १५३ पर्यंत वाढविण्यात येणार आहे. संयुक्त परीक्षा योजनेत नव्या सेवांचा समावेश करून भरती प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येणार…
साईमत / शिरूर शिरूर बायपास परिसरात मेफेड्रोन (एमडी) विक्रीसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६.९४ ग्रॅम वजनाचा, अंदाजे १ लाख ३८ हजार ८०० रुपयांचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी (दि. ११) अमली पदार्थविरोधी मोहिमेदरम्यान करण्यात आली. शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बंद पडलेल्या नाना स्पॉट हॉटेलजवळ एमडी विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे अमली पदार्थ आढळून आला. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २१(ब) तसेच बीएनएस कलम ३(५)…
साईमत / जळगांव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा संपताच उन्हाने आक्रमक रूप धारण केल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या सुमारास रस्त्यांवर वर्दळ कमी होत असून अनेक ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. रविवारी तापमान ४१.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ठरले आहे. गेल्या वर्षी ९ एप्रिल रोजी ४३.७ अंश तापमानाची नोंद झाली होती. मात्र यंदा ११ एप्रिललाच पाऱ्याने ४० अंश ओलांडल्याने…
साईमत / डोंबिवली रस्त्यात गाडी उभी करण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. केवळ गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातून तिघांनी मिळून कार चालक आणि त्याच्या मित्रावर दगडांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना डोंबिवली पश्चिमेतील सत्यवान चौक परिसरात घडली. कार चालक अमित पाटील हे आपल्या कारने जात असताना रस्त्यात गप्पा मारण्यासाठी उभ्या असलेल्या तिघांना त्यांनी गाडी बाजूला घेण्याची विनंती केली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अमित पाटील यांनी दोन ते तीन वेळा हॉर्न वाजवल्यानंतर या तरुणांचा पारा चढला. संतापाच्या भरात तिघांनी अमित पाटील आणि त्यांचा मित्र यश म्हात्रे यांच्यावर अचानक हल्ला चढवला. रस्त्यावरील दगड…
शिवतीर्थ ते आकाशवाणी चौक मार्गावर झेब्रा क्रॉसिंग व लेन मार्किंगचे काम युद्धपातळीवर सुरू नागरिकांकडून उपक्रमाचे स्वागत साईमत जळगाव प्रतिनिधी शहराला अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुशोभित बनवण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेला आता प्रत्यक्ष गती मिळाली आहे. मुख्य रस्त्यांवर पांढरे आणि पिवळे पट्टे (झेब्रा क्रॉसिंग व लेन मार्किंग) टाकण्याच्या कामाला रविवार, १२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सुरुवात करण्यात आली. या कामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुसूत्र आणि सुरक्षित होणार असून, पहिल्याच टप्प्यात शिवतीर्थ चौक ते आकाशवाणी चौक या प्रमुख मार्गावर मार्किंगचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळेत वाहतूक तुलनेने कमी असल्याने कामाचा वेग…
साईमत / वृत्तसंस्थ चीनकडून इराणला शस्त्रास्त्रांचा पुरवठा होत असल्याच्या वृत्तानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला स्पष्ट आणि कठोर इशारा दिला आहे. जर चीनने इराणला शस्त्रास्त्र पुरवठा केला, तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसहून मियामीकडे रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, “जर चीनने असे केले तर त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.” मात्र त्यांनी याबाबत अधिक तपशील देण्यास नकार दिला. ‘सीएनएन’च्या अहवालानंतर हा इशारा देण्यात आला असून, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने इराणला येत्या काही आठवड्यांत चीनकडून नवीन हवाई संरक्षण प्रणाली मिळू शकते, असा दावा करण्यात आला आहे. तसेच…